Breaking News
Home / बॉलीवुड / रेखाला १७ वर्षानंतर लक्षात आली ती संपत्ती जिला ती विसरली होती, इतक्या पैश्यात अनेक परिवार जगू शकतात

रेखाला १७ वर्षानंतर लक्षात आली ती संपत्ती जिला ती विसरली होती, इतक्या पैश्यात अनेक परिवार जगू शकतात

बॉलिवूडमध्ये जितके सुद्धा स्टार्स, अभिनेते, कलाकार आणि इतर लोकं आहेत त्यांची प्रायॉरीटी खूपच वेगळी असते. त्यांच्यासाठी त्यांचा चित्रपट, त्यांची भूमिका, त्यांचे इंडस्ट्री मध्ये असलेली नाती ह्या गोष्टी त्यांच्यासाठी खूप महत्वाच्या असतात. वैयक्तिक गोष्टींसाठी त्यांच्याजवळ खूपच कमी वेळ असतो ज्यावर ते विचार करू शकतील. अशीच एक स्टार आहे रेखा, काय झालं तिच्यासोबत जी तिची वैयक्तिक ठेवणीतली संपत्ती होती, तिला ती विसरूनच गेली आणि ते सुद्धा तब्बल १७ वर्षांसाठी. आजच्या लेखात आपण बॉलिवूड अभिनेत्री रेखाच्या बाबतीत घडलेल्या ह्याच गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत. गोष्ट २००३ ची आहे, एके दिवशी रेखाला फोन येतो, आणि तो आवाज असतो कोर्टातून कोण्या व्यक्तीचा. आणि ती व्यक्ती रेखाला सांगते कि तुम्ही कोर्टात या, अर्जावर सही करा, आणि तुमचे ४८ वेगवेगळ्या प्रकारच्या सोनाच्या ज्वेलरी ठेवलेल्या आहेत, त्यांना येऊन घेऊन जा.

रेखा स्वतः हैराण होते कि इतके वर्ष ती कसे काय इतकी महत्वाची गोष्ट विसरली. खरंतर घडलं असं होतं कि १९८६ मध्ये रेखाच्या घरी चोरी झाली होती. आणि तिच्या घरातील खूप सोनं गेले होते. त्यानंतर तिने लगेच पोलिसांत तक्रार नोंदवली आणि ह्या घटनेवर केस केली. पोलिसांनी सुद्धा ह्या केसला हाय प्रोफाइल केस च्या नजरेतून पाहत वेगाने तपासाला सुरुवात केली. आणि शेवटी ४-५ महिन्यांतच चोराला पकडले. चोराचे नाव होते मोनीराज कणप्पा. त्याने रेखाच्या घरातील ४८ प्रकारच्या सोन्याच्या ज्वेलरी चोरल्या होत्या. नंतर कोर्टाने हि सर्व ज्वेलरी जप्त करून स्वतःजवळ ठेवली आणि चोराला शिक्षा सुनावली गेली. चोराला ५ ते ७ वर्षांची शिक्षा झाली. चोर आपली शिक्षा पूर्ण करून बाहेर सुद्धा आला.

परंतु इथे रेखा हि गोष्ट हळूहळू विसरूनच गेली कि, तिची ज्वेलरी कोर्टात कुठेतरी ठेवली गेली आहे. अचानक काही वर्षानंतर २०१३ मध्ये तिला कोर्टातून फोन आला, आणि तिला सांगितले गेले कि तू कोर्टात येऊन तुझी ज्वेलरी इथून घेऊन जा. रेखाने कोर्टाचे आभार मानले. ती कोर्टात गेली आणि तिथून आपली ज्वेलरी घेऊन आली. ह्या गोष्टीने रेखा स्वतः हैराण होती कि, ती कशी इतक्या मोठ्या गोष्टीला विसरली होती कि तिला लक्षातच नाही राहिले किंवा नंतर तिने त्या गोष्टीबद्दल विचारपूसच केली नाही कि, त्या ज्वेलरीचे नक्की काय झाले. तर अश्याप्रकारे ज्वेलरीची आवड असणारी रेखा, जी ज्वेलरी १७ वर्ष तिच्यापासून दूर होती, अश्याप्रकारे तिने तिला पुन्हा मिळवलं.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.