Breaking News
Home / जरा हटके / रेल्वे ब्रिजवर जाणूनबुजून उभी होती मुले आणि अचानक धावती ट्रेन आली, बघा त्यानंतर काय घडलं ते

रेल्वे ब्रिजवर जाणूनबुजून उभी होती मुले आणि अचानक धावती ट्रेन आली, बघा त्यानंतर काय घडलं ते

भारतात ट्रेनखाली आल्याने प्रत्येकवर्षी शेकडो लोकांचे जी’व जातात. रेल्वे प्रशासनाने अनेकदा ह्या विषयी सांगितलं आहे कि सामान्य जनतेने रेल्वे ट्रॅकवर उभे राहू नका. जिथे सुरक्षित नसेल तिथे रेल्वे क्रॉसिंग सुद्धा करू नका. परंतु काही बेपर्वा लोकं ह्या गोष्टी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देतात. आता बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील बेतिया मध्ये घडलेली हि घटनाच बघा ना. इथे काही मुलं नदीवर असलेल्या रेल्वे पुलावर अंघोळ करत होती. तेव्हा तिथे अचानक मालगाडी येते. त्यानंतर जे घडतं ते काळजाचा ठोकाच चुकवतो.

सध्या इंटरनेटवर एक व्हिडीओ खूप वायरल होत आहे. ह्या व्हिडीओ मध्ये दिसत आहे कि एका रेल्वे ब्रिजवर जवळपास १०-१२ मुले उभी आहेत. त्याचदरम्यान तिथून एक मालगाडी जाते. ट्रेनला आपल्या दिशेने येताना पाहूनसुद्धा मुलं तिथून ताबडतोब बाजूला होत नाहीत. त्यानंतर जशी रेल्वेगाडी मुलांच्या खूप जवळ येऊ लागते तेव्हा सर्व मुले पुलावरून खाली नदीमध्ये उद्या मारतात. नशिब बलवत्तर म्हणून ह्या संपूर्ण घटनेदरम्यान कोणत्याही मुलाला काही दुखापत वैगेरे झाली नाही. तरीसुद्धा अशाप्रकारचे स्टंट करणं खूपच धोकादायक आणि जीवावर बेतण्यासारखे आहे. जर मुलांचा उडी मारण्याच्या टायमिंगमध्ये थोडीसुद्धा चुकामुक झाली असती तरी त्यांच्या जीवावर बेतले असते. उडी मारतेवेळी कुणाचे पाय सुद्धा घसरू शकले असते. ह्याशिवाय वाहत्या नदीमध्ये इतक्या उंचीवरून उडी मारणंदेखील खूप धो’कादायक सिद्ध होऊ शकतं. हा व्हिडीओ केव्हा आणि कोणत्या ठिकाणाचा आहे ह्याबद्दल अजून स्पष्ट माहिती मिळाली नाही, परंतु असं सांगितलं जात आहे कि हे धो’कादायक स्टं’ट करणारी मुलं भेडिहारी गावातील आहेत. हे गाव पश्चिमी चंपारण मधील नरकटियागंज-रक्सोल रेलखंड मधील गोकुळा स्टेशन व भेडीहारी स्टेशन च्या मधोमध आहे.

स्थानिक लोकांच्या सवयीनुसार ह्या मुलांना रेल्वे पुलावर अश्या हरकती करायची सवय झाली आहे. जेव्हा ह्या घटनेचा व्हिडीओ वायरल झाला तेव्हा रेल्वे अधिकाऱ्यांनी ह्यासंबंधी तपास सुरु केला आहे. आरपीएफचे असिस्टंट कमांडंट एनके राय ह्यांच्या म्हणन्यानुसार ते घटनास्थळी तपास करून मुलांची ओळख झाल्यानंतर ह्यासंबंधित कारवाई करणार. ह्या व्हिडिओला अमित आलोक नावाच्या एका व्यक्तीने आपल्या अकाउंटवर शेअर केले आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शन मध्ये लिहिलं कि, ‘रेल्वे पुलावर चढलेल्या मुलांनी धावत्या ट्रेनसमोरून वाहत्या नदीमध्ये उड्या घेतल्या. ह्या घटनेदरम्यान जरासुद्धा चूक झाली असती तर त्यांनी जीव सुद्धा गमावला असता. बघा बिहारच्या बेतिया मधील ह्या घटनेचा व्हिडीओ’.

आमची मराठी गप्पा टीम कोणत्याही प्रकारे ह्या घटनेचे समर्थन करत नाहीत. ह्याउलट असे स्टं’ट करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रणच देण्यासारखे आहे. अशाप्रकारचे स्टं’ट करणं म्हणजे मूर्खपणाचेच लक्षण होय. त्यामुळे आमच्या टीमकडून हेच सांगणं आहे कि, कोणत्याही प्रकारचे स्टं’ट असो, ज्यामुळे तुमच्या जीवाला धो’का निर्माण होईल अश्या गोष्टीपासून चार हात लांबच राहा. परमेश्वराने इतके सुदंर जीवन दिले आहे, त्या जीवनाचा आनंद घ्या.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *