Breaking News
Home / मनोरंजन / रेल्वे रुळावरून वरून बाईक चालवत होता तरुण समोरून ट्रेन आली, अचानक बाईक पडली बघा मग काय घडलं पुढे

रेल्वे रुळावरून वरून बाईक चालवत होता तरुण समोरून ट्रेन आली, अचानक बाईक पडली बघा मग काय घडलं पुढे

आपली टीम जेव्हा विविध व्हिडियोज विषयी लिहिते तेव्हा सहसा ते मनोरंजन करण्यासाठी असतं. त्यातून आपल्याला काही क्षण आनंदाचे मिळवेत अशी अपेक्षा असते. पण काही वेळा हे सगळं मनोरंजन बाजूला ठेवून, ‘सांगेन गोष्टी युक्तीच्या चार’ ही भूमिका घ्यावी लागते. बरं यात वाचकांना शहाणपण शिकवण ही भूमिका नसून त्यांना सजग करणं, स्वतःची काळजी घेणं यासाठी प्रवृत्त करण्याकडे कल असतो. पण आपली टीम असं का करते? कारण जे व्हिडियोज आम्ही बघतो त्यातील असे काही व्हिडियोज हे असं करायला भाग पाडतात.

आज आपल्या टीमने पाहिलेला व्हिडियो ही तसाच आहे. अगदी अंगावर शहारे उमटावेत असा आहे. हा व्हिडियो आहे एका रेल्वे क्रॉसिंगचा ! याआधीही आपल्या टीमने याविषयी अनेक वेळा लेखन केले आहेच. काही वेळा सूचना म्हणून तर काही वेळा मयूर शेळके सारख्या बहाद्दराचं कौतुक करण्यासाठी हे लेख लिहिले आहेत. पण आजचा लेख मात्र सूचना देणारा आहे. होतं काय, तर व्हिडियो सुरू होत असताना आपल्याला रेल्वे क्रॉसिंग दिसतं. समोरच्या बाजूला अनेक जण बाईकवर असतात. तर आपल्या समोरच्या दिशेने अनेक जण चालत येत असतात. तेवढ्यात दोन बाईकस्वार आपल्या बाजूने या चालणाऱ्यांमधून पुढे येतात. एक जण डाव्या बाजूला जातो तर दुसरा उजव्या बाजूला जातो. पण ते असं करत असताना डाव्या बाजूचा बाईकस्वार येऊन एके ठिकाणी थांबतो.

बरं हा व्हिडियो आपण सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून बघतो पण एकच अँगल असतो. त्यामुळे हा डाव्या बाजूच्या बाईकस्वार पटकन दिसत नाही. पण उजव्या बाजूचा बाईकस्वार अगदी समोरच असतो. त्यामुळे त्याच्या हालचाली स्पष्टपणे दिसतात. त्यात या बाईकस्वाराला आपली बाईक थांबवता येत नाही. खरं तर पायाने बाईक थांबवण्याचा त्याचा प्रयत्न असतो की त्याला जोरात पुढे जायचं असतं की काय ते कळत नाही. पण काहीही कारण असलं तरी त्यात तो तेवढासा यशस्वी होत नाही. बाईकच्या वेगापुढे त्याला काही करायला जमत नाही. शेवटी तो अशा अशा स्थितीत असतो जिथे त्याला काय, कोणालाच असावं असं वाटणार नाही. काय असते ही स्थिती? तर अवघ्या एका सेकंदापेक्षा ही कमी वेळेत तिथून मेल जाणार असते. किंबहुना ती इतकी जवळ आलेली असते की या माणसाचा ग्रंथ आटोपतो अशीच अवस्था असते. तो ज्यांना ओलांडून आला आहे त्यांनाही काय होतंय हे लक्षात आलेलं असतं. त्यातील एक माणूस त्याला मदत करावी म्हणून पाठी वळतो ही, पण तेवढ्यात मेलचं ते धुड अगदी वेगाने पुढे निघून गेलेलं असतं. पण… म्हणतात ना, काळ आला होता पण वेळ आली नव्हती त्याचा प्रत्यय येतो. अगदी ऐन क्षणी त्या बाईकचा ताबा सोडून देत हा तरुण दुसऱ्या ट्रॅकवर स्वतःला झोकून देतो. बाईकचे अक्षरशः कपचे विखुरतात पण हा तरुण कसाबसा वाचतो.

दुसऱ्या ट्रॅकवर जोरात पडल्याने त्याच्या पाठीला लागलं असावं असं वाटतं. पण जीव जाण्यापेक्षा हे कधीही बरंच म्हणायला हवं. हे आम्हाला लिहायला आणि आपल्याला वाचायला जेवढा वेळ लागला त्याच्यापेक्षा कमी वेळात हे सगळं होतं. पण जे काही होतं ते थरारक असतं. तसेच आपले डोळे उघडणारं असतं. रेल्वे क्रॉसिंग जवळ अनेक जण कसे वागतात हे आपण कधी ना कधी बघितलेलं असतं. पण अशा ठिकाणी एरवीपेक्षा जास्त सावधानता बाळगणे कधीही महत्वाचे ठरते. अनेक वेळा चुक आपली नसेल ही पण आपल्या हातात असलेले यंत्र सांभाळता आले नाही तरी अंगावर बेतू शकतं याचं हे उत्तम उदाहरण आहे. या लेखाच्या निमित्ताने आपल्या सगळ्या वाचकांना स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन आमची टीम करू इच्छिते ! तसेच रेल्वे क्रॉसिंग जवळ वाहन असो वा स्वतः असो, वेग कमी ठेवणं आणि जास्तीची सावधानता बाळगणे हे अतिशय महत्वाचे आहे ही सूचना ही करावीशी वाटते. बाकी आपण सुज्ञ आहातच. तेव्हा या व्हिडियोतुन चला आपण सगळेच धडा घेऊया आणि आपली काळजी घेऊया !!!

चला मंडळी, आता लेख संपवतो आहोत. आपल्या टीमचा हा प्रयत्न आपल्या ही सजग करून गेला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *