सध्याचं वातावरण कसं आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही. आजूबाजूला ऐकायला येणाऱ्या आणि वर्तमानपत्रातील बातम्यांनी मन सु’न्न होऊन जातं. पुढे कसं होणार हा एक मोठा प्रश्न समोर उभा राहतो. पण तरीही मनात आशेचा किरण बाळगत आपण आपलं जीवन जगतोय. अशा काळात नुकतीच एक घटना घडली जी प्रत्येकाच्या तोंडी आहे. वांगणी स्टेशन वरील पॉइंट्समन मयूर शेळके यांनी जीवाची बाजी लावत ६ वर्षीय मुलाला वाचवलं, ही ती घटना. रेल्वे प्लॅटफॉर्म वरून चालत असताना एका अं’ध ताईंचा मुलगा रेल्वे ट्रॅक वर प’डला. ६ वर्षांचा असल्याने त्याला आणि या माउलीला काही करता येईना. तेवढ्यात समोरून मे’ल धडाडत येत असल्याचे दिसल्याने आता काही तरी अघटित होणार असं वाटत असताना मयूर शेळके हे पॉइंट्समन अगदी देवासारखे धावून गेले. त्यांनी एवढ्या वेगाने हालचाली केल्या आणि अवघ्या दहा सेकंदात त्या मुलाचा जी’व वा’चवला.
शेवटी म्हणतात ना – देव तारी त्याला कोण मा’री. कारण अतिशय अशक्यप्राय वाटणाऱ्या या प्रसंगात अतिशय धैर्याने मयूर यांनी जिवाची बाजी लावत त्या मुलाचे प्राण वाचवले. हा व्हिडियो बघताना अंगावर काटा आला नसेल असं कोणीही नसेल. त्यामुळे मयूर यांच्या या कार्याचं कौतुक समाजातील प्रत्येक स्तरातून झालं. सामान्य माणसं म्हणून आपण आपापल्या सोशल मिडियामधून कौतुक केलंच. आपल्या टीमनेही अगदी तत्परतेने लेख लिहीत या देवदूताचं कौतुक केलं. रेल्वे मं’त्री पियुष गोयल यांनीही या घटनेची दखल घेतली. आज कळलेल्या बातमीनुसार महिंद्रा कंपनीची उपकंपनी असणाऱ्या ‘जावा’ या मोटरसायकल ब्रँड ने सुद्धा मयूर यांना प्रोत्साहनपर स्वतःची बाईक भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच खुद्द रेल्वे बोर्डाने ही मयूर यांना ५० हजार रु’पये देण्याचं ठरवलं. ही बातमी ऐकून सगळ्यांनाच आनंद झाला.
पण या आनंदात कौतुकाची भर पडली जेव्हा अजून एक बातमी आली. ही बातमी म्हणजे मयूर याने आपल्याला मिळालेल्या ५० हजारांतून २५ हजार रु’पये या घटनेतील अंध ताईंना देण्याचा निर्णय घेतला आहे, असं कळतं. सध्याच्या परिस्थितीत पै न पै जपून ठेवण्याकडे लोकांचा कल असताना स्वतःला मिळालेल्या रक्कमेपैकी अर्धी रक्कम देण्याचा निर्णय घेणं हे कौतुकास्पद. त्यांच्या या निर्णायचं प्रत्येक स्तरातून कौतुक होताना दिसतं आहे. या कौतुकात मराठी गप्पाची टीमही सामील आहे. मयूर, तुम्ही केलेलं काम उल्लेखनीय आहेच पण सोबतच तूम्ही त्या ताईंना मदत करण्याचा घेतलेला निर्णय वंदनीय आहे. तुमच्या या निर्णयासाठी आणि धाडसासाठी मराठी गप्पाच्या टीमचा तुम्हाला मानाचा मुजरा.
मयूर यांचं काम स्पृहणीय आहे आणि त्यामुळे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचूद्यात. आपल्याला जमेल तेवढा हा लेख शे’अर करा. तसेच आपल्या टीमने लिहिलेले अन्य लेखही नक्की वाचा आणि शे’अर करा. आपल्या खंबीर पाठिंब्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद !!!