Breaking News
Home / जरा हटके / रोज खाऊ घालणारी आज्जी आजारी पडली हे पाहून माकडच आजीला भेटायला आले, बघा हा हृदयस्पर्शी व्हिडीओ

रोज खाऊ घालणारी आज्जी आजारी पडली हे पाहून माकडच आजीला भेटायला आले, बघा हा हृदयस्पर्शी व्हिडीओ

प्रेम ही अशी एक प्रबळ भावना आहे जी आपल्याला कोणत्याही परिस्थितीत आधार देण्यास सक्षम असते. या भावनेतून निर्माण होणारा जिव्हाळा आणि लागणारा लळा हा आपल्याला आनंद आणि समाधान देऊन जातो. बरं हे प्रेम आपल्याला जेव्हा प्राणी, पक्षी यांच्याकडून मिळतं तेव्हा होणारा आनंद हा अजून जास्त असतो. आपली भाषा न बोलता ही मनातली भावना ओळखणारे हे सजीव आपल्यावर निर्व्याज प्रेम करतात. याचीच खात्री पटावी असा एक व्हिडियो आपल्या टीमने पाहिला. केवळ ३६ सेकंदांचा हा व्हिडियो आहे. पण त्यातून जे निर्व्याज प्रेम दिसतं ते केवळ आनंद देणारं आहे. चला तर मग जाणून घेऊयात.

हा व्हिडीओ भारतातील कोणत्या भागातील आहे ह्याविषयी ठोस अशी माहिती उपलब्ध नाही. असो. जेव्हा व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला एका बिछान्यावर एक आजी विश्राम करताना दिसत असतात. त्यांची तब्येत बरी नसावी हे लक्षात येतं. तेवढ्यात त्यांच्या बाजूला लक्ष जातं तर एक वानर बसलेला आढळतो.

एखाद्या लहान मुलाच्या आकाराचा हा वानर आजींच्या एवढ्या जवळ असलेला पाहून आपल्याला अप्रूप वाटायला लागतं. आजी त्याच्या पाठीवरून मायेने हात फिरवत असतात. त्यास प्रतिसाद म्हणून मग तो आजींच्या डाव्या बाजूने त्यांना मिठी मारतो. मग सरळ बसतो. पुन्हा उजव्या बाजूने मिठी मारतो. एखाद्या लहान मुलाने करावं तसं त्याचं वर्तन असतं. जवळच एक ताई हात जोडून उभ्या असतात. त्यांच्या मनात चाललेले भाव शब्दातून नाही पण देहबोलीतून व्यक्त होत असतात. आपणही त्यांच्या या भावना नक्कीच समजावून घेऊ शकतो. इथे हे वानर मग हळूच आजींच्या केसाला हात लाऊन बघतं आणि मग त्याच्या काय मनात येतं ते निघून जातं. केवळ छत्तीस सेकंदात हे घडताना आपण पाहत असतो. म्हंटलं तर अतर्क्य वाटावी अशी ही घटना. पण सोशल मीडिया वर जिथे हा व्हिडियो सापडला तिथे असलेल्या कॅप्शन वरून असं कळतं की या आजी या वानराला नियमितपणे खाऊ घालत असत. त्याला माया लावीत. पण त्यांची तब्येत खराब झाली आणि त्या घराबाहेर काही दिवस जाऊ शकल्या नाहीत. पण मग हे वानरचं या माऊलीच्या भेटीस आलं. ह्या गोष्टीच्या बाबतीतली शहानिशा करण्याचं दुसरं माध्यम नाही. त्यामुळे या बाबीवर विश्वास ठेवून हा लेख लिहिला जातो आहे.

तसच हे खरं असेल तर एका अर्थी विलक्षण आहे. कारण आपल्या घरी असणाऱ्या पाळीव प्राण्यांनी आपल्याला लळा लावणं आणि आपणही त्यांना माया लावणं आपण बघतोच. पण एखाद्या अन्य प्राण्याने असं वागावं हे खरंच शब्दात वर्णन करता येण्यासारखं नाहीये. एक मात्र खरं की आजींनी या वानराला जी माया लावली ती अगदी निर्मळ मनाने लावली त्यामुळे तो ही अगदी त्यांना शोधत शोधत आला. आपण वायरल झालेले अनेक व्हिडियोज बघतो. पण काही व्हिडियोज वायरल होवोत अथवा न होवोत, त्यातील दृश्य आपल्याला नकळतपणे आनंद देऊन जातात हेच खूप असतं. हा व्हिडियो बघून आपल्या टीमचा दिवस तर उत्तमरीतीने सुरू झाला आहे आणि तो उत्तमरीत्या पार पडेल हे नक्की. आपलाही उर्वरित दिवस उत्तम जावो हीच सदिच्छा.

आपल्याला आपल्या टीमने या व्हिडियो वर लिहिलेला हा लेख कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की लिहून कळवा. पण तत्पूर्वी आपल्या टिमकडून आपल्या समस्त वाचकांचे आभार. आपण देत असलेल्या अमाप प्रतिसादामुळे आपल्या टीमला प्रोत्साहन मिळतं आहे. आपण जे प्रेम आपल्या लेखांच्या बाबतीत व्यक्त करत असता, त्यातून नवनवीन लिखाण करण्याची ऊर्जा मिळते. तेव्हा आपला हा पाठींबा आपल्या टीमला यापुढेही मिळत राहो ही सदिच्छा. लोभ असावा ही विनंती. धन्यवाद !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.