Breaking News
Home / बॉलीवुड / लगान चित्रपटातली आमीर खानची हि हिरोईन आता काय करते पहा

लगान चित्रपटातली आमीर खानची हि हिरोईन आता काय करते पहा

९० च्या दशकातील असो किंवा २००० च्या दशकातील असो, ज्या अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये काम केले आहे, त्यापैकी काही तर निनावी आयुष्य जगत आहेत, तर काहींनी लग्न करून करून संसार सांभाळत आहेत. त्याच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे ग्रेसी सिंग. जिने आमिर खान सोबत ‘लगान’ चित्रपटाने आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती. आमिर खानच्या ‘लगान’ चित्रपटातून आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात करणारी ग्रेसी सिंग आज चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. ग्रेसी त्या अभिनेत्रींपैकी आहे, जिने खूपच कमी काळात इंडस्ट्री मध्ये आपली ओळख बनवली होती. ‘लगान’ चित्रपटात ग्रेसीने गावातल्या मुलीची भूमिका उत्कृष्टरित्या निभावली होती. चित्रपटातील तिच्या अभिनयाची खूप प्रशंसा सुद्धा झाली होती. परंतु आता ग्रेसीला चित्रपटांत काम मिळत नाही आहे. ग्रेसी चा जन्म २० जुलै १९८० मध्ये नवी दिल्लीत झाला. ग्रेसीचे वडील स्वर्ण सिंह हे प्रायव्हेट कंपनीत काम करायचे तर आई वरजिंदर कौर शिक्षिका होत्या. ग्रेसीच्या आईवडीलांची इच्छा होती कि ग्रेसी डॉक्टर किंवा इंजिनिअर बनावी, परंतु ग्रेसीने मॉडेलिंगच्या जगात पाऊल ठेवले. ग्रेसी सिंगने बॉलिवूड व्यतिरिक्त साऊथ आणि पंजाबी चित्रपटांत सुद्धा काम केले. काम मिळत नसल्यामुळे तिने बी ग्रेड चित्रपटांत सुद्धा नशीब आजमावले. ह्या सर्वांव्यतिरिक्त तिने काही टीव्ही सीरिअल्स मध्ये सुद्धा काम केले आहे. काही काळापासून ग्रेसी बॉलिवूड इंडस्ट्रीपासून दूर आहे.

साल १९९७ मध्ये झी टीव्हीवर येणाऱ्या ‘अमानत’ ह्या लोकप्रिय सीरिअल मध्ये ग्रेसी सिंगने ‘डिंकी’ ची भूमिका निभावली होती. ह्यानंतर काही सीरिअल केल्यानंतरच तिला ‘लगान’ चित्रपटाची ऑफर मिळाली होती. निर्देशक आशुतोष गोवारीकर ‘लगान’ चित्रपटासाठी क्लासिकल डान्स करणाऱ्या अभिनेत्रीच्या शोधात होता आणि त्याचा हा शोध अमानत सिरियलची डिंकी वर येऊन थांबला. ऑडिशनसाठी जेव्हा ग्रेसी पोहोचली तेव्हा शेकडो मुलींमध्ये तिला निवडले गेले आणि ह्या चित्रपटानंतरतर तर असे वाटले कि तिचे करिअर झाले, आता ती सीरिअलमध्ये दिसणार नाही. कारण ‘लगान’ चित्रपट ब्लॉकबस्टर झाला होता आणि ग्रेसीच्या अभिनयाचे सुद्धा कौतुक झाले होते. एका मुलाखतीत ग्रेसी सिंगने सांगितले होते कि, तिला क्लासिकल डान्सर बनायचे होते, परंतु ती अभिनेत्री बनली. तिचे स्वप्न होते कि बॉलिवूडमध्ये कोरिओग्राफच्या रूपात तिचे नाव व्हावे. ह्यामुळे तिने लगान चित्रपटाचे ऑडिशन कोरिओग्राफर म्हणून दिले परंतु तिला ह्या चित्रपटासाठी मुख्य अभिनेत्री म्हणून निवडले होते. ग्रेसी सिंगने सांगितले कि प्रकाश झा च्या ‘गंगाजल’ चित्रपटात तिने अजय देवगण सोबत काम केले होते. परंत्तू ह्या चित्रपटात तिला खूप कमी रोल मिळाला होता, त्यामुळे खूप नुकसान झाले होते. साल २००४ मध्ये ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ मध्ये सुद्धा संजय सोबत ग्रेसी सिंग दिसली आणि ह्या रोलचा सुद्धा तिला काही फायदा झाला नाही.

चित्रपट न मिळाल्याने ग्रेसी सिंग ने बी ग्रेड चित्रपटात काम करणे चालू केले आणि २००८ साली तिचा कमाल खान सोबत ‘देशद्रोही’ चित्रपट आला. साल २०१५ मध्ये ग्रेसीला चुडियां (पंजाबी) ह्या शेवटच्या चित्रपटात पहिले गेले. चित्रपटात पुढे काम न मिळाल्यामुळे ग्रेसी सिंगने पुन्हा टीव्हीचा मार्ग धरला. आणि तिने अनेक वर्षानंतर संतोषी माँ सीरियलमध्ये मुख्य भूमिका मिळाली. आपल्या ह्या भूमिकेमुळे तिला ओळख मिळाली. तिने साल २०१५ मध्ये ‘संतोषी माँ’ सीरिअल मध्ये काम करणे चालू केले. हा सिरीयल २०१७ साली बंद झाला होता. आज लोकांच्या मनात प्रश्न आहे कि शेवटी ग्रेसी कुठे गायब झाली आहे. तुम्हांला सांगू इच्छितो कि, ग्रेसीने भरतनाट्यम आणि ओडिसी डान्स मध्ये प्रशिक्षण घेतले आहे आणि आजकाल ती डान्सिंग आणि स्टेज शोज करते. साल २००९ मध्ये ग्रेसी सिंगने एक डान्स अकॅडमी सुरु केली होती. जिथे मुलांना क्लासिकल डान्स शिकवले जाते. ग्रेसी अजूनही अविवाहित आहे. लग्नापासून ग्रेसी लांबच पळत आहे. लग्नाचा विषय काढला कि ती काढता पाय घेत टाळाटाळ करताना दिसते. ग्रेसीने स्वतः सांगितले कि तिचे स्वतःसाठी कोणता प्लॅन नाही आहे. घरातले लग्नासाठी विचारात असतात परंतु आता पर्यंत मी ह्या गोष्टीबद्दल विचार केला नाही आहे.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *