Breaking News
Home / मराठी तडका / लगीर झालं जी मधल्या गोट्याची बायको आहे खूपच सुंदर, गेल्या महिन्यातच झाले लग्न

लगीर झालं जी मधल्या गोट्याची बायको आहे खूपच सुंदर, गेल्या महिन्यातच झाले लग्न

प्रत्येक कलाकृतीत एखादा असा कलाकार असतो ज्याची मध्यवर्ती भूमिका नसून सुद्धा तो सगळ्यांच्या लक्षात राहतो. त्याच्यामागे त्याचं मनापासून काम आणि हरहुन्नरी असणं जबाबदार असतं. असाच एक अभिनेता आहे, किरण दळवी. मुळचा महाबळेश्वरचा असणारा किरण असाच हरहुन्नरी. अभिनय, दिग्दर्शन, लेखन या सगळ्यांमध्ये मुशाफिरी करणारा. बोलक्या बाहुल्यांचा उत्तम वापर करता येणारा कलाकार. “लागीरं झालं जी” या लोकप्रिय मालिकेमुळे प्रकाशझोतात आलेला. या मालिकेतील अजिंक्य, शीतल, भैय्यासाहेब, राहुल्य्या या भूमिका तर आजही स्मरणात आहेतच.

तशीच एक व्यक्तिरेखा म्हणजे गोट्या. मध्यवर्ती नसली तरी भाव खाऊन जाणारी. किरण दळवी ने पात्रच एवढ्या उत्तमरीतीने रंगवलं, कि सगळ्यांच्या लक्षात राहिलं. चर्चेत राहिलं. नुकताच तो पुन्हा चर्चेत आला तो एका सोशल मिडिया पोस्टमुळे. त्याने टाकलेल्या पोस्टची दखल ऑनलाईन वृत्तपत्रांनी पण घेतली. काय होती ती पोस्ट. ती होती त्याच्या लग्नाची पोस्ट. १७ ऑगस्ट ला त्याने आपल्या पत्नीबरोबरचा फोटो त्याच्या सोशल मिडियावर शेयर केला आणि त्याच्यावर शुभेच्छांचा पाउस पडला. त्याच्या पत्नीचे नाव मोनाली गायकवाड असे आहे. नवपरिणीत जोडप्याने अगदी आनंदात आपलं फोटोसेशन करून घेतलंय. दोघेही या फोटोसेशनमध्ये अगदी मस्त दिसले आहेत.

लागीरं झालं जी मधली भूमिका असो वा त्याच्या बाकीच्या कलाकृती. तो त्यांच्यामध्ये जीव ओतून काम करतो. तर अशा या हरहुन्नरी कलाकाराला आणि त्यांच्या पत्नीला पुढच्या वाटचालीसाठी मराठीगप्पा कडून हार्दिक शुभेच्छा !

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.