Breaking News
Home / मनोरंजन / लग्नमंडपात आल्या आल्या नवरीने असा अप्रतिम डान्स केला कि सर्वजण पाहतच बसले, बघा व्हिडीओ

लग्नमंडपात आल्या आल्या नवरीने असा अप्रतिम डान्स केला कि सर्वजण पाहतच बसले, बघा व्हिडीओ

आपल्याकडे विविध क्षणांचा आनंद घेण्यासाठी विविध सण आणि समारंभ करण्याची परंपरा आहे. त्यातही लग्नासारखं एखादं महत्वाचं शुभकार्य असेल तर विचारायलाच नको. अर्थात वेळेनुसार या समारंभात विविध बदलही घडत आलेले आहेत. त्यातही एक खास दिसून येणारा बदल म्हणजे स्वतःच्या लग्नात मस्त धमाल मस्ती करत नाचात येणारे वधु वर. खरं तर एरवी स्वतःच्या लग्नात एका ठिकाणी बसून राहणारे वधू वर हे चित्र गेल्या काही वर्षांत बदललं आहे आणि हे बदल आपणही अगदी आवडीने स्वीकारलेले आहेत हे आपण पाहिलं असेल. याचीच प्रचिती देणारा एक वायरल व्हिडियो आपल्या टीमने पाहिला. मग काय, आम्ही व्हिडियो पाहिला आणि तुमच्यासाठी त्यावर लिहिलं नाही असं होईल का ? चला तर मग जाणून घेऊयात या व्हिडियोविषयी ! हा व्हिडियो आहे एका वधूचा, जी स्वतःच्या लग्नात अगदी मस्त नाचत, धमाल करत प्रवेश करते. या वधुचं नाव आहे झरना आणि तिच्या नवऱ्याचं नाव आहे जैमीन.

या दोघांच्या लग्नाच्या व्हिडियोला आजपर्यंत जवळपास ८५ लाखांहून अधिकांनी हा व्हिडियो बघितला आहे. व्हिडियो सुरू होतो तेव्हा ही नववधू झरना मैत्रिणींच्या घोळक्यात उभी असलेली आपल्याला दिसते. या सगळ्या जणी हळूहळू सरकत पुढे येताना आपल्याला दिसतात. तिचं सुंदर असं व्यक्तिमत्व, त्यास साजेसे राजेशाही कपडे आणि दागिने यांमुळे तिचं व्यक्तिमत्व अजून खुलून दिसत असतं. व्हिडियो पुढे सरकत जातो तसतसं आपल्या कानावर लग्नात वाजवल्या जाणाऱ्या संगीताचे सूर कानी पडू लागतात. तोपर्यंत वधू आणि तिच्या मैत्रिणी अगदी अलगद अलगद पुढे येत असतात. तोपर्यंत आपल्याला हा व्हिडियो अगदी शांतपणे पुढे सरकतो आहे असं वाटतं. त्याचवेळी अचानक काही बदल होतात. नवऱ्या मुलाचा फेटा अगदी क्लोज अप मध्ये आपल्याला दिसतात. व्हिडियोचा शांत टोन बदलला जाणार याची ही नांदी असते. या व्हिडियोचं शांत रुपडं आता बदललेलं असतं. आता ही नववधू आणि तिच्या मैत्रिणी सगळ्या गॉगल लावून कॅमेऱ्यासमोर अवतरलेल्या असतात.

सोबत एक तडकतं फडकतं गाणं लागलेलं असतं. ‘मेरे सैयां सुपरस्टार’ हे ते गाणं. गेल्या काही काळात आपण लग्नाचे असे व्हिडियोज पाहिले असतील तर त्यात हे गाणं वाजवलेलं आपण हमखास ऐकलं असेल. या गाण्यावर ही वधू आणि तिच्या मैत्रिणी एकदम मस्त मस्त अशा स्टेप्स करतात. त्यावरून या सगळ्यांना डान्स करण्याची सवय असावी हे कळून येतं. पण लग्न समारंभातील गाणं असावं, त्यावर नवरी डान्स करत असावी आणि नवरा मुलगा असू नये हे कसं शक्य आहे. त्यामुळे व्हिडियो संपता संपता हा नवरा मुलगा ही समोर येतो. दोघेही एकमेकांसोबत मस्त डान्स करतात आणि काही वेळाने हा व्हिडियो संपन्न होतो. झरना आणि जैमीन हे दोघेही या व्हिडियोत अगदी रुबाबदार दिसतात आणि त्याला साजेसा असा डान्सही करतात. त्यामुळे या व्हिडियोला एवढी लोकप्रियता मिळाली आहे असं म्हंटल्यास वावगं ठरू नये.

आपण हा व्हिडियो पाहिला असेल तर आपल्याला हा व्हिडियो आवडला असणारच. सोबतच आपल्या टीमने या लोकप्रिय व्हिडियोवर केलेलं वृत्तांकन आपल्याला आवडलं असणार हा विश्वास आहे. आपण आमचे लेख नेहमीच शेअर करत असता. त्यातुन आम्हाला प्रोत्साहन मिळत असतं. आपल्या या पाठिंब्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद. आपला लोभ कायम असावा !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.