स्वतःच्या लग्नात नवरा नवरीने मस्त धडाक्यात नाचण्याचा, गाण्याचा ट्रेंड तसा काही अगदीच नवीन नाही की अगदी जुना नाही.गेला काही काळ आपण यापद्धतीने स्वतःचं लग्न साजरं करणारी जोडपी अनेक वेळेस व्हिडियोज मधून बघितली आहेत. पण बहुतेक वेळेस यात आपल्याला एक जोडी आणि त्यांचा एक व्हिडियो असं समीकरण दिसतं. पण आपल्या टीमला नुकताच एक व्हिडियो असा गवसला आहे की ज्यात हे समीकरण खोडुन निघताना दिसतं. यात आपल्याला एकापेक्षा जास्त जोडप्यांच्या व्हिडियोचा मिलाफ दिसून येतो. ज्यांनी हा व्हिडियो बनवला आहे त्यांच्या मेहनतीला आणि कलात्मकतेला सलाम. आता तुम्ही म्हणाल की मेहनत ठीक आहे पण कलात्मक असं काय आहे यात ? सगळे डान्स तर नवरा नवरीने केलेले असतील. यात गंमत अशी की या व्हिडियोतील चारही जोडपी विविध भाषेतील गाण्यांवर थिरकताना दिसतात.
जसं की पहिली जोडी आपल्याला ‘मेरे सैयां सुपरस्टार’ या हिंदी बॉलिवूड गाण्यावर थिरकताना दिसते. त्यातही या व्हिडियोतील नवरीचा बिनधास्त अंदाज भाव खाऊन जातो. भावोजी त्यामानाने जरा शामळू वाटतात. पण आपली ताई मात्र मस्त नाचून घेते आणि मजा करते. ती इतकी उत्साहित असते, की त्या भरात वऱ्हाडयांच्या पुढे जाऊन तिचा डान्स सूरु असतो. तिच्या सारखीच मस्त डान्स करते ती आपली दुसरी ताई. ती डान्स करत असते ते एका मस्त पंजाबी गाण्यावर. यात तिला साथ मिळते ती अर्थात भावोजींची. तिचं आगमन होतं तेव्हा भावोजी अगदी गुडघ्यावर बसून तिला प्रपोज केल्यासारखं करतात. मग तिच्या लयीत लय मिळवत नाचण्याचा प्रयत्नही उत्तम. मग येते ती आपली तिसरी ताई. सगळ्यांत उत्साही. एका इंग्रजी गाण्यावर डान्स करत करत तिचा मंडपात प्रवेश होत असतो. तिच्या सोबत असणारे मात्र तिचा उत्साह पाहून थक्क असतात. तिचा उत्साह आणि ऊर्जा कौतुक करण्याजोगी असते.
आपण एकदम उत्तम डान्सर असो वा नसो, डान्सची मजा घेता आली पाहिजे हे तिच्या डान्स मधून कळतं. मस्त नाचत नाचत शेवटी ती तिच्या आहोंना पण डान्स करायला बोलवत असते, पण तेवढ्यात शेवटचा भाग सुरू होतो आणि या भावोजींची भेट काही होत नाही. तसं तर शेवटच्या भागातही एका ताईच्या डान्सचीच हवा असते. एव्हाना आपण एका दाक्षिणात्य लग्नात आलेले असतो. दाक्षिणात्य लग्न कोणाला आवडत नाहीत. मस्त मस्त दागिन्यांनी सजलेले आणि नटलेले वर्हाडी आणि नवरा नवरी. त्यात डान्स म्हणजे मजाच. तर ही आपली ताई सुदधा मस्त डान्स करत करत मंडपात प्रवेश करती होते. तिच्या पाठीशी असणारा जनसमुदाय तिच्या आनंदात सहभागी असतो. इतका की एक काका तर थेट मध्यभागी येऊनच नाचायला लागतात. यात अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला दोन दाक्षिणात्य गाण्यांवर ही ताई डान्स करताना पाहायला मिळते. तर असा हा व्हिडियो आहे चार जोडप्यांच्या डान्स चा.
पण भाव खाऊन जातात त्या आपल्या चारही ताया. एका पेक्षा एक डान्स परफॉर्मन्स करत त्या आपापली लग्न मस्त एंजॉय करत असतात. त्या मजा घेत घेत डान्स करतात म्हणून आजूबाजूची मंडळी सुद्धा मजा घेत असतात. याचा एकत्रित परिणाम म्हणजे आपणही या चारही परफॉर्मन्स चा आनंद लुटतो. ज्यांची लग्न व्हायची आहेत, त्यांना तर यातून छान कल्पना सुचत असणार हे नक्की. असा हा सहा ते सात मिनिटांचा व्हिडियो आपल्याला आनंद देऊन जातो.
या व्हिडियो प्रमाणे आपल्या या लेखानेही आपल्याला आनंद झाला असेल अशी सार्थ अपेक्षा आहे. कारण आपल्या वाचकांना आनंद व्हावा असे विविध विषय आपली टीम वेळोवेळी आपल्या लेखातून आपल्या वाचनासाठी घेऊन येत असते. आपणही कौतुक आणि प्रोत्साहन म्हणून आमच्या टीमचे लेख अगदी १०० % शेअर करत असता. आपला लोभ यापुढे ही कायम रहावा ही सदिच्छा !! आपल्या खंबीर पाठिंब्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद !!
बघा व्हिडीओ :