Breaking News
Home / मनोरंजन / लग्नमंडपात एंट्री घेत असताना नवरदेवाची आई नवरदेवाला चपलेने मारू लागली, बघा नक्की काय घडलं ते

लग्नमंडपात एंट्री घेत असताना नवरदेवाची आई नवरदेवाला चपलेने मारू लागली, बघा नक्की काय घडलं ते

लग्न म्हंटलं की बराच मोठा गोतावळा एकत्र येणं हे ओघाने आलंच. अगदी थोडक्यात जरी लग्न करायचं म्हंटलं तरी बऱ्यापैकी माणसं जमातात. आणि या सगळ्यांत कोणी ना कोणी मजा मस्ती करणारी व्यक्ती ही असतेच. अनेकवेळा तर खुद्द नवरा वा नवरी हे स्वतः गमत्या स्वभावाचे असतात. त्यामुळे धमाल होत असते. बरं ही धमाल जेवढी अनपेक्षित असते तेवढीच त्यातील मजा जास्त असते. कारण कोणालाच असं काही होईल असं वाटत नसत. मग त्यातून जो हशा पिकतो तो मात्र सगळ्यांचा मूड अगदी आनंदी करून जातो.

पण नाण्याच्या दोन बाजू असतात. त्यामुळे सकारात्मक आणि मजेशीर पण अनपेक्षित घटना मनाला आनंद देतात. तर अनपेक्षित आणि लग्नात विघ्न आणणाऱ्या घटना , भयंकर त्रास करून जातात. जे घडलं ते घडायला नको होतं असं वाटून जातं. आता हेच बघा ना, काही दिवसांपूर्वी एक बातमी बघण्यात आली होती. कारण हे एका वायरल व्हिडियोचं होतं. या वायरल व्हिडियोत आपल्याला नवरा आणि नवरी एका सजवलेल्या ठिकाणी उभे असलेले दिसतात. छान सजावट केलेली असते. तसेच ही सजावट छान अशी फिरत असते. त्यामुळे त्या आत उभे असलेले नवरा बायको सुद्धा फिरत असतात. हा सगळा प्रकार वऱ्हाडी मंडळी, उत्सुकतेने पाहत असतात. तेवढ्यात एक व्यक्ती या सजावटीजवळ जाण्याचा प्रयत्न करताना दिसते. डोक्यावर पांढरा फडका गुंडाळून ही आकृती जिने चढायचा प्रयत्न करत असते. तिथेच उभ्या असलेल्या फोटोग्राफरला बाजूला सारू पाहत असते.

शेवटी एकदाची ती यशस्वी होते आणि त्या जोडीपर्यंत जाण्यात यशस्वी होते. फरक इतकाच की ती सजावट फिरत असते आणि कमळाच्या पाकळ्यांचा देखावा असतो. त्यामुळे त्या व्यक्तीला आत जाता येत नाही. परिणामतः त्या व्यक्तीला आता दुसरा काही पर्याय उरत नाही. म्हणून मग ती व्यक्ती आपल्या पायातील चप्पल आतील जोडप्याला फेकून मारण्याचा प्रयत्न करते. एवढं सगळं होत असताना बाकीची मंडळी धावपळ करत तिला कसंबसं बाहेर घेऊन जातात. थोडी माहिती घेतल्या नंतर कळतं की ही तर चक्क त्या नवऱ्या मुलाची आई आहे. खरं तर तिचा आणि नवऱ्या मूलाकडच्यांचा या लग्नाला विरोध असतो. पण तरीही या दोघा प्रेमी जीवांचं ठरलेलं असतं. तसेच बहुधा मुलीकडच्यांचा याला पाठिंबा असतो असं कळतं. याविषयी अजून माहिती नसल्याने ठोस काही सांगता येत नाही. असो. तर हा सगळा विरोध झुगारून हे दोघेही लग्न करतात. मग मुलीकडच्या मंडळींकडून रिसेप्शनचं आयोजन केलं जातं. त्यासाठी मग वर उल्लेख केलेली सगळी सजावट असते. तसेच फिरता मंच असतो. पण त्याचवेळी नवऱ्या मुलाची आई निषेध करण्यासाठी म्हणून हजर होते आणि जे पुढे घडतं ते आपण वाचलं आहेच.

आपण कदाचित हा व्हिडियो पाहिला ही असेल. खरं तर असे अनपेक्षित क्षण कोणाच्याच आयुष्यात न येवो ही सदिच्छा. पण काही वेळा असे प्रसंग सहज घडून येतात. आमच्या टीमने हा व्हिडियो बघितला. नेहमीच्या व्हिडियोपेक्षा यातील विषय वेगळा वाटला आणि म्हणून यावर लिहावं अस ठरलं आणि त्यातून हा लेख लिहिला गेलेला आहे.

आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.