Breaking News
Home / मनोरंजन / लग्नमंडपात ग्रँड एंट्री करणे नवरा नवरीला चांगलेच महागात पडले, बघा व्हिडीओ

लग्नमंडपात ग्रँड एंट्री करणे नवरा नवरीला चांगलेच महागात पडले, बघा व्हिडीओ

सध्याचा काळ लग्नाचा आहे हे आपल्याला माहिती आहेच. किंबहुना गेल्या एक दोन आठवड्यात अनेक ओळखीच्या व्यक्तींच्या लग्नांना आपण हजेरी ही लावून आलेले असाल. येत्या काही दिवसांत ही हा सिलसिला सुरूच राहील म्हणा. जोपर्यंत हे चालत राहील तोपर्यंत आपणही (सगळयाच नाही पण निवडक) लग्नांना जाऊच. कारण नाही म्हंटलं तरी आपल्या ओळखिच्यांच्या लग्नाला जाणं म्हणजे आनंद असतोच. तसेच नाही म्हंटलं तरी आपल्या साठी ही दगदगीतून काही काळ विश्रांती असते. त्यात हल्लीचे लग्न संस्कार आणि इतर कार्यक्रम एकत्र केले असता हे समारंभ केवळ समारंभ न राहता सोहळे होतात.

त्यात कुठचाही सोहळा म्हंटलं म्हणजे मजा, मस्ती, धमाल असते. सोबत खर्च एकदम दणक्यात केला असेल (जो सहसा केलेला असतो) तर मग मनोरंजनाची रेलचेल असते. मग त्यात कुठे डान्स फ्लोअर आणि डीजेची व्यवस्था असते तर कुठे घसा ओला करू इच्छिनाऱ्यांची व्यवस्था ही असते. या सोबतच लग्नातील बाकीच्या विधी आणि कार्यक्रम ही अगदी राजेशाही होतील याची काळजी घेतलेली असते. अगदी व्यवसायिक इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या यासाठी सातत्याने कार्यरत असतात. त्यांच्यामुळे लग्नासारखी महत्वाची घटना ही मोठया प्रमाणात साजरी ही होते आणि अविस्मरणीय सुद्धा ठरते. पण असं असलं तरीही काही अनिश्चित आणि अनैच्छिक घटना कधी होतील याचा नेम नसतो.

आपण कुणीच याबद्दल काही ठोस सांगू शकत नसतो. पण या घटना घडतात तेव्हा मात्र काय करावं हे कळत नाही. पण दैव बलवत्तर असेल तर फारसं नुकसान न होता गोष्टी मार्गी लागतात ही. हे सगळं सांगायचं कारण म्हणजे काही दिवसांपासुन वायरल झालेला एक व्हिडियो होय. हा व्हिडियो छत्तीसगड राज्यातील रायपूर भागातील एका लग्नाचा व्हिडियो आहे. हे लग्न अतिशय थाटामाटात होत असतं. अगदी एखाद्या पुरस्कार सोहळ्याला टक्कर देईल अशी सगळी व्यवस्था असते. त्यात मस्त सजवलेला रंगमंच असतो. त्यावरची सजावट तर अप्रतिम असते. सोबत काही डान्सर्स हे बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध गाण्यावर डान्स करत असतात. या सगळ्यांच्या केंद्रस्थानी असतात ते नवरा नवरी. मस्त सजवलेल्या एका प्लॅटफॉर्म वर हे दोघेही उभे असतात. हा प्लॅटफॉर्म मस्त सजवलेला असतो. त्यांच्या बहुधा परफॉर्मन्स चालू असतो. या परफॉर्मन्सचा भाग म्हणून ते उभे असलेला पाळणा वर जाऊ लागतो. नवरा नवरी उभे असतात. सगळ्यांनाच हा फिल्मी टच आवडून जात असतो. पण तेवढ्यात अनिश्चित अशी घटना घडते. हा पाळणा धरून ठेवणारी एक दोरी किंवा जिला हार्नेस म्हणू ही तुटते आणि हा पाळणा एका बाजूने खाली येतो. त्यामुळे ही जोडी तब्बल दहा ते बारा फुटांवरून खाली येते. झाला प्रकार सगळ्यांनाच धक्का देऊन जातो हे नक्की. अनेक प्रथितयश वृत्तसंस्थांनी सुद्धा झाल्या प्रकाराची दखल घेतली आहे.

अर्थात हा लग्नसोहळा मॅनेज करणाऱ्या कंपनीने झाल्या प्रकाराबद्दल दिलगीरी व्यक्त केल्याचं कळतं आहे. तसेच नवरा नवरी सुखरुप असल्याचं ही कळतं आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना या कंपनीतील एका व्यक्तीने पुढील सोहळा आणि त्यातील सगळे विधी आणि कार्यक्रम सुरळीत झाल्याचं म्हंटलं आहे. अर्थात त्याविषयी आपल्याकडे इतर माहिती उपलब्ध नसल्याने जास्त काही लिहीत नाही आहोत. असो. पण झाल्या प्रकारानंतर जर नवपरिणीत जोडपं सुरखरुप असेल आणि उर्वरित कार्यक्रम चांगला झाला असेल छानच आहे. आपल्या टीमने हा व्हिडियो पाहिला आणि आपल्या वाचकांना याविषयी सांगावं अस वाटलं आणि त्यातूनच आजचा हा लेख लिहिला गेला आहे.

तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *