Breaking News
Home / मनोरंजन / लग्नमंडपात नवरीची अशी ध’माकेदार एंट्री तुम्ही ह्याअगोदर क’धी पाहिली नसेल, बघा हा वायरल व्हिडीओ

लग्नमंडपात नवरीची अशी ध’माकेदार एंट्री तुम्ही ह्याअगोदर क’धी पाहिली नसेल, बघा हा वायरल व्हिडीओ

आपण भारतीय किती उत्सवप्रेमी असतो याची आपल्याला कल्पना आहेच. छोट्या छोट्या क्षणांपासून ते अगदी मोठमोठ्या उत्सवांत आपण अगदी उत्साहाने सामील होत आनंद लुटत असतो. या सगळ्या क्षणांमधील एक प्रसंग म्हणजे लग्न. या प्रसंगी वधु आणि वर आणि त्यांचे अगदी निकटवर्तीय हे जसे आनंदात असतात तसेच तणावा खाली सुद्धा. सगळं व्यवस्थित व्हावं ही सगळ्यांची मनीषा असते आणि त्याचा ताण अनेक वेळेस त्यांच्या वागण्या बोलण्यातून दिसून येतो. अनेक वेळेस वधू वर यांना च’क्कर आल्याचं ऐकतो ते याचमुळे. पण काही वधूवर असेही असतात की त्यांना आलेला ताण ते त्यांच्या उत्साही वृत्तीमुळे दूर करण्यात यशस्वी होतात. आमच्या टीमने काही दिवसांपूर्वी केलेल्या एका वायरल व्हिडियोचं उदाहरण घ्या ना. पुण्याच्या एका ताईने तिच्या लग्नात असा भन्नाट डान्स केला होता की नवरदेवाने तिची दृ’ष्ट काढली होती. तसेच कोणी तरी तिचा हा डान्स व्हिडियो सोशल मीडियावर शेअर केल्याने वायरल ही झाला होता.

असाच एक व्हिडिओ जवळपास नऊ वर्षांपूर्वी युट्युबवर अपलोड झाला होता आणि आज त्या व्हिडियोला जवळपास ४ करोड लोकांनी पाहिलं आहे. हा व्हिडीओ आहे एका दाक्षिणात्य लग्नाचा. दाक्षिणात्य लग्न अगदी साग्रसंगीत पद्धतीने साजरी होतात. त्यामुळे त्यांच्या विषयी आकर्षण हे नेहमी असतंच. हे लग्नही असंच होतं. एकंदर मंडप व्यवस्था उत्तम दिसून येते. या मंडप व्यवस्थेत चार चांद लावते ती नववधू. या नववधूला नृत्याची आवड असल्याने ती स्वतःच्या लग्नातली एन्ट्री सुद्धा एकदम धमाकेदार करते. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला सगळी मंडळी लग्न मंडपात बसलेली दिसतात. प्रत्येक जण वधूची वाट बघत एकमेकांशी गप्पाटप्पा करताना दिसत असतो. तेवढ्यात गाण्याची धून वाजते आणि आपल्यासकट सगळ्या मंडळींचं लक्ष हॉल च्या दरवाज्याकडे जातं. तिथे काही मुली या गाण्यावर डान्स सुरू करतात. उपस्थित ही त्यांना दाद देतात आणि पुढे येते ती नववधू. मग एकच जल्लोष होतो आणि ती आपल्या डान्स स्टेप्स करणं सुरू करते. तिच्या स्टेप्स पाहूनच कळतं की तिला नृत्याची किती प्रचंड आवड आहे ते. गाण्याचे बोल दाक्षिणात्य असल्याने कळत नाहीत खरे पण ही नववधू आणि तिच्या डान्स पार्टनर्समुळे आपणही नकळत या गाण्याची मजा घ्यायला लागतो.

हा चमू थोडा पूढे सरकतो आणि मग गाणं काहीसं बदलतं. मग एन्ट्री होते ती काही मुलांची. त्यात टोपी घातलेला मुख्य मुलगा असतो तर बाकीचे सहाय्यक. पण काही म्हणा या सगळ्यांत भाव खाऊन कोण जात असेल तर ती असते ही नववधू. तिचा उत्साह, तिची ऊर्जा, तिचे स्टेप्स सगळेच आपल्याला प्रसन्न करून जातात. तिचं खास कौतुकही वाटतं. हे कौतुक तिने जडजवाहिरे आणि लग्नाचा सगळा पोशाख सांभाळून केलेल्या डान्स मुळे. एरवी लग्नात साड्या आणि दागिने आणि मुलं आणि नवरे सांभाळता सांभाळता नाकी नऊ येतात. पण ही नववधू मात्र अगदी सहजतेने हा डान्स परफॉर्मन्स देते. तिच्या या सहज कौशल्यासाठी मराठी गप्पाच्या टिमकडून तिचं विशेष कौतुक तसेच सुखी आयुष्यासाठी शुभेच्छा !

आपल्याला हा वायरल व्हिडियो वरचा लेख आवडला असेल तर आमच्या टीमने केलेले वायरल व्हिडियोज वरील इतर लेखही आवडतील. आपण वे’बसाई’टवरील स’र्च ऑप्शनचा वापर करून त्या लेखांचा ही आनंद घ्या. आपल्याला फक्त वायरल असं लिहून सर्च करायचं आहे. आपल्याला विविध लेख उपलब्ध होतील. आपल्या पाठिंब्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद !

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.