Breaking News
Home / मनोरंजन / लग्नमंडपात नवरीची इतकी भन्नाट एंट्री तुम्ही ह्याअगोदर क’धी पाहिली नसेल, बघा व्हिडीओ

लग्नमंडपात नवरीची इतकी भन्नाट एंट्री तुम्ही ह्याअगोदर क’धी पाहिली नसेल, बघा व्हिडीओ

आपली टीम वायरल व्हिडियोज वर लेख लिहिते हे आपण जाणताच. सोबतच अन्य विषयांवरील लेखही आपण वाचत असता. पण वायरल व्हिडियोज ची मजाच वेगळी आहे. खासकरून लग्नातील वायरल व्हिडियोजची मजा तर काही औरच. सध्याच्या परिस्थितीत अगदी लग्नसोहळा होत नसला तरीही आटोपशीर लग्न होत आहेत. पण हे वायरल व्हिडियोज बघितले की लग्नसमारंभांमधील ती ऊर्जा, प्रसन्नता, उत्साह पुन्हा अनुभवायला मिळतो असं वाटतं. हाच उत्साह आपल्या वाचकांसमवेत शेअर करण्यासाठी आपली टीम या लेखांचा घाट घालत असते. आजही आपल्या टीमने एक मस्त व्हिडियो पाहिला आहे. आजच्या लेखातून त्याच्याविषयी थोडंसं. तर हा व्हिडियो आहे सेजल आणि अक्षय या जोडप्याच्या लग्नाचा. आपली टीम त्यांना वैयक्तिक रित्या ओळखत नाही. पण त्यांच्या लग्नातील आनंद बघून आपल्या टीमलाही आनंद झाला.

हा व्हिडियो आहे सेजल लग्नमंडपात येण्याच्या वेळेचा. सेजल यांचं आगमन अगदी थाटमाटात होतं. खास सजवलेल्या पालखीवर बसून सेजल येत असतात. सोबत पालखीचे भोई असतातच. पण एवढ्या राजेशाही पद्ध्तीने स्वागत होत असताना नृत्य न होताच स्वागत कसं होईल ? तेव्हा सेजल आणि अक्षय यांच्या स्नेह्यांतील मिळून काही जणी अगदी मस्त डान्स सादर करतात. सुरुवातीला गाणं वाजतं ते अजय अतुल या जोडीचं लगीनगीत. ‘नवरी आली’ या नावाने प्रसिद्ध असलेलं गीत आपण अनेक वेळेस आवडीने ऐकलं असेल. आज त्यावरचा सुंदर डान्स बघण्यास मिळतो. लग्नसराईत या जोडीला एक गाणं हमखास वाजतं. ‘इंग्लिश विंग्लिश’ चित्रपटातील ‘नवराई माझी नवसाची गं’ हे ते गाणं. याप्रसंगी सुदधा दुसरं वाजणारं गाणं हेच असतं. स्टेप्स थोड्या बदलतात. उपस्थितही या सगळ्या जणींचं कौतुक करत असतात.

यात एक छोटी मुलगी ही दिसून येते. तिचाही उत्साह कौतूक करण्यासारखा असतो. मग तेवढ्यात अचानक तिसरं गाणं वाजायला लागतं. मुंबई पुणे मुंबई २ या चित्रपटातलं ‘बँड बाजा’ हे ते गाणं. चित्रपटात ते स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्यावर चित्रित झालेलं आहे. तर या मंगलप्रसंगी सेजल आणि तिच्या संख्यांवर हे गाणं चित्रित झालेलं दिसतं. मग चौथं गाणं सुरू होतं. मुंबई पुणे मुंबई ३ मध्ये पिंजरा चित्रापटातील ‘आली ठुमकत नार’ हे ते गाणं. एवढा वेळ पालखी घेऊन उभे असलेले भोई आता पुढे सरकत असतात. त्यांनी एवढा वेळ दाखवलेल्या संयमाचं खरंच कौतुक. तसेच हे गाणं पालखी पुढे जात असताना वाजवलं जाईल हे पाहत असताना कोरिओग्राफी ही त्यानुसार बदलते हे ही कौतुकास्पद. एकदा नववधू ची ही पालखी पुढे सरकली की सगळे जण मग या डान्स मध्ये सामील होतात. पुढेही गाणी वाजतात पण आपल्यासाठी मात्र हा व्हिडियो येथेच संपतो.

एकंदर तीन मिनिटांचा हा व्हिडियो. त्यात चार गाण्यांचा समावेश आणि त्यासोबत मस्त डान्स. यांमुळे ही तीन मिनिटं कधी संपतात हे कळत नाही. ज्यांना लग्नसमारंभांना जायला आवडतं आणि त्यात असं मस्तपैकी डान्स करायला वगैरे आवडतं त्यांच्यासाठी हा व्हिडियो म्हणजे पर्वणीच. ज्यांची लग्न करोना परिस्थिती स्थिरस्थावर झाल्यावर होणार आहेत त्यांनी या व्हिडियोपासून काही प्रेरणा घेण्यास हरकत नाही. पण ज्यांची लग्नं येत्या काही दिवसांत होणार आहेत त्यांनी स्वतःची, कुटुंबाची आणि लग्नाला उपस्थित असणाऱ्यांची काळजी घेऊनच लग्नं करावीत ही विनंती. स्वतःला आणि आप्तस्वकियांना जपा. आपल्याला हा लेख आवडला असेल अशी सार्थ अपेक्षा आहे. आपणसुद्धा आपल्या टीमला आमचे लेख शेअर करत, त्यावर सकारात्मक कमेंट्स करत प्रोत्साहन देत असता, त्याबद्दल धन्यवाद. आपला लोभ आमच्या टीमप्रति यापुढेही कायम असावा ही विनंती.धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *