Breaking News
Home / मनोरंजन / लग्नमंडपात नवरीने अशी धमाकेदार एंट्री मारली कि सगळेजण पाहतच बसले, बघा हा अप्रतिम व्हिडीओ

लग्नमंडपात नवरीने अशी धमाकेदार एंट्री मारली कि सगळेजण पाहतच बसले, बघा हा अप्रतिम व्हिडीओ

स्वतःच्या लग्नात नवऱ्या मुलाने आणि मुलींनी डान्स करत एन्ट्री घेणं हा ट्रेंड सुरू होऊन काही वर्षे झाली. असं असलं तरीही या ट्रेंडची जादू आजही कायम आहे. अजूनही युट्युबवर आपल्याला काही लाखांमध्ये व्ह्यूज मिळालेले व्हिडियोज रेकमेंड होत असतात. असाच एक व्हिडियो आपल्या टीमलाही रेकमंड झाला. आपल्या टीमला ही तो आवडला. मग काय, आपल्या वाचकांना याविषयीचा लेख नक्की आवडेल असा विचार करून आजचा हा लेख लिहिला जातो आहे. हा व्हिडियो आहे दक्षिण भारतातील एका लग्नाचा. देवभूमी केरळ मधल्या एका नववधूच्या लग्नातील एंट्रीचा हा व्हिडियो आहे. या एन्ट्रीच्या वेळी सुरुवातीची काही सेकंद आपल्याला नववधू आपल्या सखींसकट प्रवेश करताना दिसते. सोबत एका प्रसिद्ध तामिळ गाण्याचे म्युझिक कानावर पडत असतं. मग दिसतो तो नवरदेव.

त्याचं एकटक लक्ष त्याच्या पत्नीवर खिळलेलं असतं. जवळच एक दादा त्याला काही सांगत असतात. पण नवरा मुलगा त्याच्या नवरीला बघून अगदी सातवे असमान पे गेलेला असतो. नंतरचा बहुतेक वेळ आपल्याला ही उत्साही, नृत्यनिपुण वधू दिसत राहते. या गाण्यावरच्या परफॉर्मन्सची तिने खूप तयारी केली असणार आणि तिला मुळातच डान्स आवडत असणार हे ती करत असलेल्या स्टेप्स वरून कळून येतं. यासोबतच तिचे चेहऱ्यावरचे भाव ही अगदी मस्त असतात. ती ज्या गाण्यावर नाचत असते ते गाणं असतं ‘मलेयीरू’ हे सुप्रसिद्ध गाणं. या गाण्याला आजवर अनेक दशलक्ष लोकांनी पाहिलं आहे आणि पसंत ही केलेलं आहे. तसेच अनेक लग्नात नव वधू डान्स करताना या गाण्यावर डान्स करताना आणि मंडपात प्रवेश करताना दिसतात. जसं उत्तरेकडे सहसा ‘मेरे सैय्यां सुपरस्टार’ हे गाणं लग्नात एन्ट्री घेताना प्रसिद्ध आहे, तसंच हे मलेयीरू हे गाणं दक्षिणेत प्रसिद्ध असलेलं दिसून येतं.

गंमत म्हणजे हे गाणं आताचं नसून जवळपास दशकभरापूर्वी आलेल्या मंमबटीयां या चित्रपटाचं भाग आहे. सुप्रसिद्ध गायिका मेघना यांनी हे गाणं गायलं आहे. तर अशा या लोकप्रिय गाण्यावर आपल्या या ताईने केलेला डान्स अगदी अप्रतिम म्हणावा असाच. तिच्या या डान्सने नवरामुलगा तर विरघळून गेलेला असतो. त्याच्या डोळ्यातलं कौतुकच सगळं सांगून जात असतं. आपल्या टीमला तर हा व्हिडियो भन्नाट आवडला. तुम्हालाही हा व्हिडियो खूप आवडला असणार. त्याचप्रमाणे आपल्या टीमने लिहिलेला हा लेखही आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपल्या वाचकांना वैविध्यपूर्ण विषयांवरचं लेखन वाचायला मिळावं म्हणून आपली टीम वेगवेगळे विषय हाताळत असते. माहिती मिळवत असते. त्यामुळे तुम्ही जेव्हा जेव्हा प्रोत्साहन देणाऱ्या कमेंट्स करता, किंवा अगदी लेख शेअर करता तेव्हा आपसूक एक नवीन उत्साह निर्माण होतो. तेव्हा आपलं प्रोत्साहन आम्हाला सतत मिळत राहो हीच सदिच्छा. लोभ असावा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.