आपल्या टीमने वायरल व्हिडियोज वर लिहायला सुरुवात केली त्याला आता बराच काळ लोटला आहे. या काळात आपल्या टीमने अनेक वायरल व्हिडियोज बघितले आहेत आणि त्यावर लेख लिहिले आहेत. पण अस असलं तरी दर वेळी जेव्हा जेव्हा आपली टीम वायरल व्हिडियोज बघते तेव्हा नवीन काही तरी बघायला मिळतं. नवीन म्हणजे वायरल व्हिडियोज मध्ये नवीन. बरं त्यातही हे लग्नाचे व्हिडियोज असतील की काय बघायलाच नको. कारण लग्नाचे व्हिडियोज आपल्या सगळ्यांनाच बघायला आवडतात.
याची कारणं अनेक असू शकतात. काही वेळेस फक्त मजा म्हणून हे व्हिडियो पाहिले जातात. तर कधी कधी या व्हिडियोज मधून आपल्या लग्नात राहिलेल्या हौसे मौजेची मजा मनोमन घेतली जाते. काही वेळेस तर ज्यांच्या कडे येत्या काळात लग्न होणार आहे त्यांना अनेक बाबतीत नवीन काही तरी शिकता येतं. हे व्हिडियोज बघण्यात बरीच कारणं दडलेली असतात आणि त्यामुळेच आपल्याला ते आवडतात. बरं त्यातही डान्स आणि मजा मस्ती असेल तर अजून धमाल. सोबतच नवरा नवरीची जबरदस्त एन्ट्री असेल तर सोने पे सुहागा.
पण सहसा ना, ही एन्ट्री एखाद्या गाण्यावर आधारलेली असते. त्यातही काही गाणी ही तर ऐकायलाच मिळतात. त्यामुळे जर आपण हे व्हिडियोज वारंवार पाहिले तर एकप्रकारे तोचतोचपणा येतो. आता तोचतोचपणा आला की तो कंटाळा ही घेऊन येतो. पण यावरचा उपाय म्हणजे वेगळं काही बघणं. पण त्यासाठी तुम्हाला स्वतःहून काही करण्याची गरज नाही. कारण त्यासाठी आपली टीम आहे ना. नवनवीन गोष्टींविषयी आपली टीम लिहीत असतेच. आजही आपल्या टीमने पाहिलेला व्हिडियो हा असाच काहीसा आहे. आता एवढा वेळ लग्नाचे वायरल व्हिडियोज विषयी तुम्ही वाचता आहात तर हा व्हिडियो कशा विषयी आहे हे तुम्हाला कळलं असेलच. अर्थातच लग्नाविषयी. त्यातही लग्नातील नवरा नवरीच्या एन्ट्री विषयी. या लग्नात आपल्याला नवरा नवरीची एन्ट्री ही कोणत्याही गाण्यावर दिसत नाही. उलट ही एन्ट्री एखाद्या राजेशाही जोडप्याचं आगमन व्हावं अशीच वाटते. आजूबाजूला आतषबाजी होत असते. पाहुण्यांच्या नजरा नवरा नवरीवर खिळलेल्या असतात. ती दोघेही अगदी राजेशाही पद्ध्तीने दाखल होतात. त्याआधी जणू स्वर्गीय वातावरण वाटावं यासाठी स्मोक म्हणजे कृत्रिम धुराचा वापर केला जातो. त्याला कोल्ड फायर अस ही म्हणत असावेत.
असो. पण हा नजारा बघण्यासारखा असतो. एखाद्या सिनेमात शोभून दिसावा असाच सिन म्हणायला हवा हा. आपण जर हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला नक्की पटेल. आतापर्यंत नसेल बघितला तरी हरकत नाही. पण यावेळी ही संधी चुकवू नका. कारण माहितीच्या महापुराच्या या काळात एखादी सुंदर संकल्पना बघितली की छान वाटतं. तसेच काही व्हिडियोज बघितल्यावरच त्यांची मजा अजून छानपैकी घेता येते.
असो. तर मंडळी, हा होता आपल्या टीमने लिहिलेला आज पाहिलेल्या एका वायरल व्हिडियो वरील लेख. हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :