Breaking News
Home / मनोरंजन / लग्नमंडपात ह्या मराठमोळ्या स्त्रियांनी केला अप्रतिम लेझीम डान्स, बघा व्हिडीओ

लग्नमंडपात ह्या मराठमोळ्या स्त्रियांनी केला अप्रतिम लेझीम डान्स, बघा व्हिडीओ

आपण सगळ्यांनीच, जे एव्हाना सोशल मीडियावर ‘जुने’, जाणते(?) झालेले आहोत त्यांनी लग्नातील डान्स चे व्हिडियोज वायरल होताना बघितले असतील. आपल्यापैकी काहींनी तर यात सक्रिय सहभाग घेतलेला असू शकतो. यातूनच एक गोष्ट तर आपण सगळेच मान्य करूयात की वायरल व्हिडियोज च्या दुनियेत लग्नातील डान्सच्या व्हिडियोज चा दणका गेली काही वर्षे चालू आहे. बरं यात अनेक वेळेस वाजणारी गाणी आणि होणारे डान्स काहीसे सारखे वाटतात असंही वाटतं. पण या सगळ्या मांदियाळीत स्वतःचं वेगळेपण जपणारे काही व्हिडियोज आहेत. त्यातलाच एक आपल्या टीमने पाहिला आणि त्याविषयी लिहावं असं ठरलं. कारण जे वेगळं आणि उत्तम असतं ते आपली टीम आपल्या वाचकांच्या भेटीसाठी आणत असते आणि यापुढेही आणत राहील. त्यातलंच हे एक लेखपुष्प.

तर मंडळी हा व्हिडियो आहे एका मराठी कुटुंबातील लग्नातला. यातील डान्सच्या सोबतच एक गोष्ट नजरेत भरते ती म्हणजे या लग्नात असणारी मस्त राजेशाही अशी फुलांची सजावट. अगदी प्रशस्त वाटतं. तर अशा या फुलांनी सजवलेल्या मंडपात असतात काही सखी. या सगळ्या आपल्या ताई, माई आणि आयांच्या वयाच्या स्त्रिया. या लग्नाच्या निमित्ताने आपला परफॉर्मन्स सादर करून आधीच असलेल्या आनंदी वातावरणात त्या भरच घालणार असतात. व्हिडियो सुरू होतो तेव्हा साऱ्या जणींच्या हातात लेझीम असते. गाणं सुरु होतं आणि या सगळ्या जणी हातातील लेझीम वापरत आपला परफॉर्मन्स देत असतात. गाणं असतं, ‘खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली’. हे गाणं आपल्या मराठी जणांमध्ये किती प्रसिद्ध आहे ते वेगळं सांगायला नको. तर अशा या लोकप्रिय गाण्यावर वेगवेगळ्या स्टेप्स करत या सगळ्या जणींचा परफॉर्मन्स पुढे सरकत असतो. कधी कधी आहेत त्याच जागेवर तर कधी जागा बदलत त्यांचा परफॉर्मन्स उत्तमरीत्या पुढे जात असतो.

आजूबाजूला लग्नाची लगबग असते पण आपलं लक्ष मात्र या सगळ्यांवर असतं. त्यांच्या परफॉर्मन्स सोबतच आपल्याला अप्रूप वाटत असतं, ते त्यांनी केलेल्या विचारांचं. कारण लग्नात बॉलिवूड गाणी वाजतात आणि त्यावर डान्स होतो हे आपण नेहमी पाहत आलो आहोत. पण लेझीम सारखा पारंपरिक खेळ वापरून एका मराठमोळ्या गाण्यावर सादरीकरण करण्याचा कोरिओग्राफरचा विचार खूप आवडून जातो. नाविन्याची कास धरताना सोबतच आपल्या मराठी संस्कृतीतील एका खेळाची व्यवस्थित सांगड घातली जाते हे खूप छान वाटतं. आपल्या डोक्यात हे विचार घोळत असताना इथे या सगळ्या जणी फेर धरत लेझीमचं सादरीकरण करत असतात. त्यांच्या या स्टेप ला विशेष करून उपस्थितांचा प्रतिसाद मिळतो हे विशेष. या स्टेप नंतर पुन्हा एकदा त्या फेर धरतात तो उलट्या बाजूने आणि काही सेकंदात त्यांचा परफॉर्मन्स संपतो. तसेच व्हिडियो सुद्धा.

वर उल्लेख केल्याप्रमाणे या परफॉर्मन्समुळे नाविन्याची कास धरताना मराठी संस्कृतीतील एका छान खेळाची घातलेली सांगड आवडून जाते. या परफॉर्मन्सला बसवणाऱ्यांनी अजून काही चांगला कलात्मक विचार केला असेलच. या सगळ्या विचारांना या सादरीकरणात सामील झालेल्या माऊल्या उत्तमरीत्या लेझीम खेळून छान साथ देतात. त्यांचं एकमेकांसोबत असलेलं सहकार्य आपल्याला जाणवतं. त्यांच्यातील ट्युनिंगचं कौतुक वाटतं. आपल्या टिमकडून तर या सगळ्यांना मानाचा मुजरा. आपल्याला हा व्हिडियो आवडला असेलच. तसेच आपल्या टीमने लिहिलेला हा लेखही आपल्याला आवडला असेल अशी आशा आहे. आपण वाचक म्हणून आपल्या टीमने लिहिलेल्या लेखांवर अतिशय प्रेम करता. अगदी आवडीने हे लेख शेअर करत राहता. त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपल्या या पाठिंब्यामुळे आपल्या टीमला नवनवीन विषयांवर लेखन करण्याचा उत्साह येतो. तेव्हा आपला हा पाठिंबा असाच वाढता राहू देत ही सदिच्छा. आमच्या टीमवर आपला कायम लोभ असावा. धन्यवाद.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *