Breaking News
Home / मनोरंजन / लग्नवरातीतला नवरा नवरींचा हा अफलातून डान्स होतोय वायरल, बघा व्हिडीओ

लग्नवरातीतला नवरा नवरींचा हा अफलातून डान्स होतोय वायरल, बघा व्हिडीओ

वायरल व्हिडियोज वरील लेख वाचण्याचं आपलं हक्काचं ठिकाण म्हणजे मराठी गप्पा. मराठी गप्पाची आपली टीम सातत्याने विविध विषयांवरील लेख आपल्यासाठी प्रसिद्ध करत असते. या लेखांमध्ये सगळ्यांत जास्त प्रसिद्धी कोणत्या लेखांना मिळत असेल तर ती लग्नातील गंमती जंमती अधोरेखित करणाऱ्या लेखांना. आता लग्नकार्यांवर बरीच बंधने को’विडमुळे आली आहेत म्हणा. पण निदान या लेखांतून तरी आपल्याला लग्नातील गंमती जंमती अनुभवायास मिळतात, याचा आम्हाला आनंद आहे. या आनंदात भर घालणारा एक वायरल व्हिडियो आमच्या टीमने काही काळापूर्वीच पाहिला होता. पण त्यावर लेख लिहिणं राहून गेलं होतं. पण आज मात्र आपण त्या व्हिडियोवरील लेखाचा आनंद घेणार आहोत. हा वायरल व्हिडियो आहे आपल्या सांगली जिल्ह्यातील लग्नघराचा. लग्न म्हंटलं म्हणजे वरात आणि त्यातला भन्नाट डान्स आलाच. पण वरातीत सहसा नाचतात ते लग्नाला आलेली मंडळी.

ज्यांचं लग्न असतं ते सहसा यात सामील असतातच असे नाही. पण ज्यांना डान्स करायला आवडतो त्यांना मात्र ही एक पर्वणीच असते. आणि जर नवरा नवरीला डान्स करायला आवडत असेल तर. कदाचित याचंच उत्तर आपल्याला या व्हिडियोत मिळतं. या व्हिडियोत नवपरिणीत जोडपं अगदी भन्नाटपणे डान्स करताना आपल्याला दिसतं. त्यातही आपली ताई तर एकदम रंगात येऊन डान्स करत असते. तर आपले दादा स्वतःचा पोशाख सांभाळत ताईच्या सारखं नाचत असतात. किंबहुना तसा प्रयत्न करत असतात. पण भाव खाऊन जाते ती ही ताईच. हा व्हिडियो बऱ्याच चॅनेल वर पाहता येतो. त्यामुळे असेल कदाचित पण या व्हिडियो चे दोन भाग आपल्याला पाहायला मिळतात. एका भागात आपल्याला हे दोघे डान्स करत असताना हलगी वाजत असल्याचं जाणवतं. तर दुसऱ्या भागात आपल्याला साजन-विशाल या सुप्रसिद्ध जोडीचं ‘सायकल सायकल माझी सोन्याची सायकल’ हे गाणं ऐकायला मिळतं. मूळ गाणंही एवढं उत्तम आहे आणि म्हणूनच लोकप्रिय सुद्धा. यात भर पडते ती आपल्या ताई दादांनी केलेल्या डान्सची.

त्यातही गाण्यातील शब्दांना चपखल बसतील अशा ताईच्या स्टेप्स असतात. केवळ काही सेकंदांचा हा व्हिडियो, पण यातला आनंद त्या पेक्षाही मोठा असतो. याचं कारण यात कुठलाही कृत्रिमपणा जाणवत नाही. मनापासून, डान्सचा आनंद घेत घेत तयार झालेला हा व्हिडियो असल्याने पुन्हा पुन्हा पाहून आपल्याला कंटाळा येत नाही. उलट आपल्यातले काही जण जे डान्सचे चाहते आहेत, ते सुद्धा जागेवरच डुलायला लागतात. आपल्याच टीमचं उदाहरण घ्या ना. असो.

आपल्याला हा लेख आवडला असेल अशी आम्हाला खात्री आहे. नेहमीप्रमाणे हा लेखही शेअर करा आणि आपल्या क’मेंट्स मधून आपल्या प्रतिक्रिया ही आपल्या टीमला कळू द्यात. आपल्या अखंड आणि सातत्यपूर्ण पाठिंब्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *