आता पर्यंत आपण वायरल व्हिडियोज वरील लेखांमध्ये अनेक विषयांवर लिखाण केलं. त्यातून लहान मुलं, लग्नातील गंमती जंमती आणि डान्स हे वाचकांचे सगळ्यांत जास्त आवडते विषय असल्याचं लक्षात आलं. या आधी आपण अफलातून डान्स करणारी मुलं याविषयावर लिहिलं आहेच. पण लग्नात अफलातून डान्स करणारी मुलं हा विषय आपल्याकडे पहिल्यांदाच होत असावा. होय, आज आपल्या टीमने पाहिलेला व्हिडियो अगदी भन्नाट आहे. हा व्हिडियो आहे दोन लहान मुलांचा. बहीण भाऊ असावेत. ही बहीण भावांची जोडी जाते एका लग्नात. बरं लग्नात लहान मुलांचं कौतुक होतंच. खासकरून त्यांनी काही विशेष करून दाखवलं तर अजूनच. वर उल्लेख केलेल्या लहान भावा बहिणीच्या बाबतीतही असंच काहीसं होत असतं. लग्नासाठी असलेला बँड वाजत असताना हे चिमुकले नाचायला लागतात. त्यांची डान्स स्टाईल भन्नाट असते.
त्यामुळे मग या दोघांना घोळक्याच्या मध्ये उभं करून नाचावलं जातं. एकदा डान्स करून झाल्यावर त्यांना एक व्यक्ती घेऊन जायला येते. पण त्या व्यक्तीला थांबवलं जातं. मग वेगळी धून वाजायला लागते. आजूबाजुच्यांकडून प्रोत्साहन मिळत असल्याने हे दोघेही नाचायला सुरुवात करतात. सुरुवातीला अगदी हलके हलके डान्स सुरू असतो. लोकं ही मजा घेत असतात. मग मध्येच कोणी तरी या दोन्ही मुलांना काही पैसे देतो. मग डान्सचा वेग वाढल्याचं आपल्या लक्षात येतं. दोघेही धमाल नाचत असतात. त्यांचा डान्स बघून मग एका दादांनाही राहवत नाही. ते ही पुढे येत मग आपले पाय थिरकवतात. मस्त नाचत नाचत पुढचा डान्स पूर्ण करतात. मग काही वेळ पुन्हा गती मंदावते. पण यावेळी कोणी पै’से द्यायला येत नाही किंवा डान्स करायला सुद्धा येत नाही. येतात त्या साक्षात माऊली. या दोन्ही मुलांच्या पालक वाटणाऱ्या या माऊली येतात आणि दोघांनाही घेऊन जातात. त्या जशा या मुलांना घेऊन जातात तसा हा व्हिडियो संपतो.
अर्थात पुढे काय घडतं यासाठी व्हिडियो पाहण्याची आवश्यकता नसावी. काय घडलं असेल याची आपण कल्पना करू शकतो. पण एक मात्र खरं की मुलं नाचतात मात्र धमाल. काही क्षण का होईना पण त्यांच्यामुळे विरंगुळा अनुभवायला मिळतो. खटकते ती एकच गोष्ट की लहान मुलं नाचत असताना त्यांना पैसे देणं. अर्थात ज्यांचा त्यांचा प्रश्न असल्याने याविषयी जास्त काही भाष्य करता येत नाही. असो.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला क’मेंट्समध्ये लिहून कळवा. तसेच तुमच्या साठी खास खास लेखांची मेजवानी आपली टीम आणत असते. या लेखांचा आनंद घ्या. हे लेख शेअर करा आणि आनंद द्विगुणित करा. शेवटी आनंद वाटल्यानेच तर वाढतो. आमचे लेख वाचत राहा, आनंद राहा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :