लग्न समारंभात डान्स करतेवेळी हृदयविकाराचा झटका आला. लगोलग ४० वर्षीय मनोजला हॉस्पिटलयामध्ये नेण्यात आले, परंतु त्याचा जीव वाचू शकला नाही. ह्या घटनेमुळे कुटुंबातील लोकं आणि नातेवाईक दुःखात आहेत. सर्वांचे म्हणणे आहे कि मनोजला कोणतीही समस्याच नव्हती. नाचतेवेळी मनोज जिमनीवर पडला होता.
वाराणसीत एका तरुणाचा डान्स करतेवेळी जीव गेला. आता ह्या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. ह्यामध्ये दिसून येत आहे कि तरुण काही लोकांसोबत डान्स करत आहे. तेव्हा अचानक तो थांबतो आणि जमिनीवर पडतो. बेशुद्धीच्या अवस्थेत कुटुंबातील लोकं त्याला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले.
परंतु तरुणाची तपासणी केल्या नंतर डॉक्टरांनी त्याला मृ’त घोषित केले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तरुणाचा मृ’त्यू हृदय विकाराचा झटका आल्यामुळे झाला. मिळालेल्या माहितीनुसार वाराणसीतील पिपलानी येथे २५ ऑक्टोबरला एक लग्न होते. ह्यात सहभागी असलेला वर्षीय मनोज विश्वकर्मा नातेवाईकांसोबत नाचत होता.
सर्व जण एन भरात नाचत होते इतक्यात मनोज डगमगू लागतो आणि एकाएकी जमिनीवर पडतो. मनोजला पडलेलं पाहून तिथे उपस्थित महिला आरडा ओरडा पाकृ लागतात. सर्वांच्या लक्षात येताच तातडीने मनोजला हॉस्पिटलमध्ये नेले जाते. परंतु मनोजची तपासणी केल्यानंतर डॉक्टर त्याला मृ’त घोषित करतात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हृद्यकविकाराचा झटका आल्यामुळे मनोजचा मृ’त्यू झाला. मनोजच्या मृ’त्यूनंतर कुटुंबावर शोककळा पसरली. कोणालाच विश्वास बसत नाही आहे कि मनोज आता त्यांच्यात नाही आहे.
नाचतेवेळी अगोदर सुद्धा गेला आहे जीव :
डान्स करतेवेळी अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृ’त्यू झाल्याचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. राजस्थान मध्ये लग्न समारंभात स्टेजवर डान्स करतेवेळी तरुणाचा हृद्यविकारामुळे जीव गेला होता.
बघा व्हिडीओ :