मित्र असावेत तर जिगरी असावेत, नाही तर नसावेत. तुम्हाला काय वाटतं? बरोबर ना? पण मग जिगरी मित्र ओळखायचे कसे? अगदी सोप्पं आहे. एकतर त्यांना तुमचे सगळे दुर्गुण, सगळी लफडी, तुमच्या चांगल्या गुणांएवढीच माहिती असतात. दुसरं म्हणजे आपली खेचण्यात सगळ्यांत आघाडीवर असणारी हीच मंडळी असतात आणि जर तुम्ही सिंगल असाल, त्यांचं एक कायमस्वरूपी मागणं असतं, ते म्हणजे ‘भावा लग्न कर… आम्हाला तुझ्या लग्नात नाचायचं आहे’. आपलं जसं लग्न होतं तेव्हा ही जिगरी मित्रांची पलटण आपली मनोकामना पूर्ण करून घेते आणि लग्नात डान्सचा पूर्ण आनंद लुटून घेते. अशाच एका पलटणीचा धमाल व्हिडियो आपल्या टीमच्या हाती लागला. मस्त मजा आली तो व्हिडियो पाहताना.
हा व्हिडियो एका दाक्षिणात्य जोडप्याच्या लग्नाचा वाटतो. तसा जुनाच आहे. त्यामुळे लग्नात बक्कळ माणसं दिसून येतात. स्टेज वर असतातच. पण या सगळ्यांमध्ये उठून दिसतात ते नवरोबाचे मित्र. कारण एकंच. त्यांनी फुल टू दणक्यात केलेला डान्स. व्हिडियोची सुरवात होते तेव्हाच या मस्तीला सुरुवात झालेली असते. गळ्यात वरमाल घातलेला नवरा स्वतः मध्यभागी येऊन डान्स करत असतो. त्याच्या जोडीला त्याचे सात आठ जिगरी दोस्त असतात. काय नाचतात हो. चित्रपटाचे हिरो लाजावेत.अगदी धम्माSSSSल. त्यांच्या काही स्टेप्स ठरवल्या सारख्या वाटतात. तर काही स्टेप्स मात्र अगदी त्याच क्षणी सुचल्यासारख्या असतात. त्यातही नवरदेवासोबत नाचणारा त्याचा मित्र सगळ्यांत जास्त भाव खाऊन जातो. अगदी झकास स्टेप्स करत असतो. बाकीचेही त्याच्या अवतीभवती नाचत असतात. तब्बल एक मिनिटभर नवरदेव पण जीवाची मजा करून घेतो. उद्यापासून नाचायला मिळेल की नाही याची शाश्वती नसल्यासारखा नाचतो. पण त्याने केलेल्या स्टेप्स ही भन्नाट असतात, नाचात जान ओततात.
मग काही वेळाने मात्र त्याचे मित्र नवरदेवाला नवपरिणीत वधू सोबत सोडून येतात. पण म्हणून डान्स थांबतो का काय. अजिबात नाही राव. पुन्हा सुरू होतात ही मंडळी. या वेळी अजून एक दोन नवीन मंडळी येऊन दाखल होतात. शेवटची १५ सेकंद तर फुल्ल ऑन मस्ती, दंगा चालू असतो. पण ही दोन मिनिटं आपल्याला अगदी आवडून जातात. एखाद्या सेट डान्स परफॉर्मन्स पेक्षाही हा डान्स भाव खाऊन जातो. कारण त्यात जिगरी मित्रांनी एकत्र येत जान ओतलेली असते. केवळ आनंद घेण्यासाठी ते नाचत असतात. या सगळ्यांची मैत्री अशीच अबाधित राहो हीच मराठी गप्पाच्या टीमची सदिच्छा.
आपल्याला हा लेख आवडला असल्यास नक्की शेअर करा. तसेच आपल्या टीम मधील लेखक मित्रांनी लिहिलेले नवनवीन लेख आपण वाचता आणि सोशल मीडियावर शेअर करता. त्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रोत्साहनामुळे आम्हालाही नवनवीन विषयांवर लिहिण्याची ऊर्जा मिळते. आपली ही मैत्री अशीच टिकून राहू दे. आपल्या पाठिंब्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :