प्रत्येकाचे हे स्वप्न असते कि त्याचे लग्न धुमधडाक्यात व्हावे. लग्नात खूप जास्त वराती असावे, खूप जास्त कार्यक्रम असावे ज्याने लग्नाला आयुष्यभर संस्मरणीय बनवले जाऊ शकते. परंतु आताच्या को’रोना काळातील गोष्ट कराल तर लग्नासोहळ्याबाबतीत खूप मर्यादा आलेल्या आहेत. हा काळ साधारणतः लग्न-विवाहाचा असतो, परंतु को’रोनाच्या उद्रेकामुळे लग्न विवाहाचे कार्यक्रम कमी करावे लागत आहेत. अश्यामध्ये कोणी नवरदेव एकटा सायकलवर जाऊन लग्न करत आहे, तर कोणी दोन-चार वरातींना सोबत घेऊन होणाऱ्या बायकोला निरोप घेऊन आणत आहे. लग्नविवाह सोहळ्याचे कार्यक्रम को’रोना काळाच्या अगोदर खूप थाटामाटात होत होते. परंतु को’रोना काळात ते फक्त विधी पुरताच मर्यादित राहिले आहेत. ह्या दरम्यान एका लग्नाची चर्चा होत आहे. जिथे वरात सुद्धा सजली होती, नवरदेव सुद्धा तयार होता, परंतु ह्यादरम्यान फोनची एक बेल वाजली आणि मग काय नवरदेवाच्या स्वप्नांवर पाणी पडायला वेळ लागला नाही. चला जाणून घेऊया काय आहे नेमकी घटना.
हि घटना उत्तरप्रदेश येथील आहे. जिथे को’रोनाच्या वाढत्या घटनांमुळे लॉकडाऊन लावलेला आहे. उत्तरप्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील एका तरुणाची वरात निघणार होती. सर्व तयारी झाली होती, सनई वाजणारच होती. चोहोबाजूंना आनंदी वातावरण होते. ह्याच दरम्यान एक फोनची बेल वाजली, मग काय? फोनच्या दुसऱ्या बाजूने को’रोना पॉजिटीव्ह व्हायची बातमी मिळाली. ज्यानंतर नवरदेव आपल्या स्वप्नांच्या राणीला निरोप द्यायच्या अगोदरच क्वारंटाईन सेंटरला पोहोचण्याच्या तयारीला लागतो आणि लग्न करण्याच्या त्याच्या इच्छेला आवर घालावा लागतो.
मिळालेल्या माहितीनुसार हमीरपूर जिल्ह्यातील मौदहा विकासखंडच्या सिसोलार ठाणे क्षेत्राच्या आत बक्छा गावातील रहिवासी जंग बहादूर सिंह चा मुलगा धर्मेंद्रचे २४ मे रोजी लग्न होणार होते. धर्मेंद्रची वरात महोबा च्या असगहा (तमौरा) गावी जाणार होती.वरातीची तयारी चालू होती. घरात नातेवाईक जमले होते, कुटूंब आणि शेजाऱ्यांसोबत नातलगांतील सर्व महिला लग्नाच्या विधीमध्ये व्यस्त होत्या.
ह्याच दरम्यान कोण्या गावातील व्यक्तीने नवरदेवाची को’रोना संक्रमित होण्याची सूचना आरोग्य विभागाला दिली. सूचना मिळताच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लगोलग पुढील कामाला सुरुवात केली. मौदहा एसडीएम च्या निर्देशानुसार आरोग्य विभागाची टीम तातडीने सिसोलार ठाण्याच्या पो’लिसांसोबत बक्छा गावी पोहोचली. गावी पोहोचलेल्या टीमने नवरदेवाच्या घरी चालू असलेल्या लग्नाच्या सर्व कार्यक्रमाला स्थगित केले गेले आणि संक्रमित नवरदेवाला ऍम्ब्युलन्समधून सुमेरपूर येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवले गेले.
आरोग्य विभागाच्या टीमने सोबतच ह्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व लोकांची को’रोना टेस्ट केली आणि आयसोलेट करण्याचे आदेश सुद्धा दिले गेले. दुसरीकडे, वधूपक्षातील लोकांना हि माहिती मिळाल्यावर सगळे हैराण झाले. वैवाहिक सोहळ्यासाठी आलेल्या पाहुण्यांमध्ये सुद्धा असमजंसपणाची स्थिती बनली. नवरदेवाच्या को’रोना संक्रमित होण्याच्या बाबतीत मौदेहा सामाजिक आरोग्य केंद्राच्या अधीक्षक डॉक्टर अनिल सचान ह्यांनी सांगितले कि धर्मेंद्रने २२ मे रोजी येथे को’रोना टेस्ट केली होती. डॉक्टर सचान ह्यांच्या म्हणण्यानुसार धर्मेंद्रचा को’रोना टेस्टचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आला होता. को’रोना पॉजिटीव्ह असलेल्या व्यक्तीला कमीत कमी १० दिवसांपर्यंत आयसोलेट राहावे लागते.