Breaking News
Home / मनोरंजन / लग्नाची धामधूम, गाण्यांवर नाचत होती लोकं… नाचून दमल्यावर खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीचा अचानक जीव गेला

लग्नाची धामधूम, गाण्यांवर नाचत होती लोकं… नाचून दमल्यावर खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीचा अचानक जीव गेला

कर्नाटकमधील उडुपी जिल्ह्यातील एका लग्नसमारंभाचे रूपांतर दुखवट्यामध्ये झाले. मेहंदी कार्यक्रमाच्या दरम्यान समारंभामध्ये नाचणाऱ्या व्यक्तीला दम लागला म्हणून खुर्चीवर बसून डान्स बघत असताना अचानक हृदय विकाराचा झटका आला आणि काही मिनिटांतच त्याचा मृ’त्यू झाला. आता ह्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वायरल होत आहे. माणसाचं म’रण कधी येणार ह्याची माहिती कोणालाच नसते. एक असंच हैराण करून सोडणारा व्हिडीओ कर्नाटक येथून समोर आला आहे, जिथे एका लग्न कार्यक्रमाचे दुखवटामध्ये रूपांतर झाले. मेहंदी कार्यक्रमादरम्यान नातेवाईकांचा डान्स बघत असलेल्या व्यक्तीला खुर्चीवरच हृ’दयविकाराचा झटका आला आणि तिथेच त्यांची प्राणज्योत मावळली.

हा हैराण करून देणारा व्हिडीओ कर्नाटक येथील उडुपी जिल्ह्यातील आहे, जिथे गणपती आचार्य नावाच्या व्यक्तीचे मेहंदी समारंभात डान्स बघत असताना निध’न झाले. नाचता नाचता दम लागल्यामुळे ते खुर्चीवर बसले होते. परंतु काही कळायच्या आतच त्यांची शुद्ध हरपली. आणि त्यांचा मृ’त्यू झाला. ते ५६ वर्षाचे होते.

सूत्रांच्या माहितीनुसार त्यांचे नि’धन हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाल्याचे समजते. हि संपूर्ण घटना कार्य्रक्रमाचा व्हिडीओ रिकॉर्डिंगच्या दरम्यान कॅमेरामध्ये कैद झाली. गणपती आचार्य हे व्यवसायानुसार सोनार होते. कार्यक्रमाच्या दरम्यान खुर्चीवरून पडल्यानंतर त्यांना नातेवाईकांनी मणिपाल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु डॉक्तरांनी तिथे त्यांना मृत घोषित केले. आता ह्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वायरल होत आहे. सध्या हे माहिती नाही पडले आहे कि हि घटना कधीची आहे ते.

गुजरात मध्ये सुद्धा घडली आहे अशाप्रकारची घटना

गेल्या महिन्यात गुजरातमधील सुरत मध्ये सुद्धा अशीच एक घटना समोर आली होती. वरात निघायच्या अगोदर मित्रांसोबत डीजेवर डान्स करतेवेळी नवरदेवाला हृदयविकाराचा झटका आला होता. लगोलग घरातल्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते, तिथे डॉक्टरांनी त्याला मृ’त घोषित केले. हि घटना सुरत जिल्ह्यातील मांडवी तहसील विभागातील अरेठ गावातील होती. ३३ वर्षाचे मितेशभाई चौधरीची वरात बालोड तहसील येथील धामोंडला गावी जाणार होती. वरात जायच्या अगोदरच्या बहुतेक विधी पूर्ण झाल्या होत्या.

थोड्या वेळातच वरात निघणार होती. सुखाच्या ह्या मंगल प्रसंगी नातेवाईक आणि नवरदेवाचे मित्र डीजेवर नाचत होते. मित्र नाचत आहेत हे पाहून नवरदेव मितेश स्वतःला रोखू शकला नाही आणि तो सुद्धा डीजेच्या तालावर नाचायला पोहोचला. ह्या दरम्यान डान्स करणाऱ्या मितेशला त्याच्या मित्रांनी आपल्या खांद्यावर बसवले आणि नाचू लागले. तेव्हा अचानक मितेशच्या छातीत दुखू लागले आणि त्यादरम्यानच त्याचा मृत्यू झाला.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *