Breaking News
Home / ठळक बातम्या / लग्नाची विधी चालू होती, नवरीने फोन लावून थांबवले लग्न, कारण पाहून तुम्हीही स्तुती कराल

लग्नाची विधी चालू होती, नवरीने फोन लावून थांबवले लग्न, कारण पाहून तुम्हीही स्तुती कराल

जसे कि तुम्हांला माहितीच आहे कि, प्रत्येक गोष्टीची एक ठराविक वेळ असते. जर वेळेवर गोष्टी झाल्यातर परिणाम खूप चांगला येतो, परंतु जर अवेळी कोणते निर्णय घेतले तर त्याचा निर्णय सुद्धा तुम्हाला नकारात्मक मिळेल. जर आपण लग्न विवाहासारख्या नात्याबद्दल बोलाल तर हे आयुष्यभर चालणारे नाते असते, लग्न जीवनाचा अविभाज्य भाग मानला जातो. आणि हे सात जन्मापर्यंत असणारे नाते आहे. जर व्यक्ती योग्य निर्णय घेतो तेव्हा त्याच्या आयुष्यात सुखद परिणाम होतात. आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल कि आम्ही लग्न विवाहसारख्या गोष्टी का करत आहोत. खरंतर, एक अशी घटना समोर आली आहे जिथे एका मुलीने आपल्या मंडपातून एक फोन करून स्वतःचे लग्न थांबवले, तिने एक फोन केला आणि तिची लग्नाची वरात निघायची थांबली.

हि घटना डबरा गावातील असून जिथे एका अल्पवयीन मुलीचे लग्न होत होते. परंतु लग्नाच्या अगोदरच ह्या अल्पवयीन मुलीने धाडस दाखवले आणि आपले लग्न थांबवले. डबरा येथील पिछोर क्षेत्रातील ग्राम पंचायत गढी येथील आदिवासी पाड्यातील एका अल्पवयीन मुलीच्या विवाहाच्या सर्व विधी चालू होत्या. मुलीचे लग्न होईल ह्या अगोदरच मुलीने वरातीला आपल्या घरी येऊ दिले नाही.

अल्पवयीन मुलीने हिम्मत करून थांबवले लग्न
लग्न करण्यासाठी एक ठराविक वयाची सीमा ठेवलेली आहे. परंतु ज्या मुलीचे लग्न होणार होते ती अल्पवयीन होती, ह्या मुलीने आपल्या घरच्या लोकांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. वेळोवेळी ह्या मुलीने लग्न करण्यास नकार दिला. परंतु तिच्या घरच्या लोकांनी तिचे ऐकले नाही. मुलीच्या मनाविरुद्द असूनसुद्धा तिच्या आई वडिलांनी अल्पवयीन मुलीचे लग्न ठरवले होते. मंगळवारी ह्या मुलीचे लग्न होणार होते, लग्नाच्या सर्व विधी होत होत्या, मुलीच्या घरी वरात येणारच होती, परंतु त्या अगोदरच मुलीने धाडस दाखवले आणि तिने कलेक्टरला फोन लावून आपल्या लग्नाबद्दल सूचना दिल्या. सूचना मिळताच कलेक्टरने नियमाविरुद्द होत असलेल्या ह्या विवाहाला खूप गंभीरतेने घेत तातडीने ऍक्शन घेतली आणि महिला बाळ विकास विभागाच्या सुपरवाईजरला पोलिसांसोबत लग्न थांबवण्यासाठी तातडीने पाठवले.

पोलीस आणि महिला बालविकासच्या सुपरवाईजर शिल्पा सिंग अल्पवयीन मुलीच्या घरी पोहोचली आणि घटनेच्या तपासाला सुरुवात केली. पोलीस आणि सुपरवाईजर ह्यांनी अल्पवयीन मुलीच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केली. ह्या पडताळणी मध्ये हे समोर आले कि ज्या मुलीचा विवाह होणार होता, तिचे वय केवळ १६ वर्षे १० महिने होते. विवाहासाठी हे वय खूप कमी असल्यामुळे हे लग्न थांबवले गेले. पोलीस आणि सुपरवाईजर ह्यांनी अल्पवयीन मुलीच्या आईबाबांना समजावले कि आता तुमच्या मुलीचे वय लग्नायोग्य झालेले नाही, अजून तुमची मुलगी अल्पवयीन आहे. त्यामुळे तिचे लग्न होऊ शकत नाही. खूप समजावल्या नंतर अल्पवयीन मुलीचे घरातले हि गोष्ट ऐकण्यास तयार झाले. परंतु आता प्रश्न मुलाच्या घरच्यांचा होता. त्यांना ह्याबद्दल कसे सांगणार. तेव्हा बाल विकासच्या सुपरवाईजर शिल्पा सिंग ह्यांनी नवऱ्याच्या मंडपातूनच मुलाच्या घरच्यांना फोन केला आणि त्यांना सर्व माहिती दिली. सुपरवाईजर शिल्पा सिंगने मुलाच्या नातेवाईकांना समजावत सांगितले कि ते मुलीच्या घरी वरात घेऊन जाऊ शकत नाही.

तसे पाहिले तर अल्पवयीन मुलीने योग्य वेळी धाडस दाखवत हो निर्णय घेतला त्याची जितकी प्रसंशा केली जाईल तितकं कमीच आहे. आम्ही तिच्या ह्या धाडसाचे कौतुक करतो.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.