Breaking News
Home / मनोरंजन / लग्नाच्या अगोदर नवरीने घरातल्यांसोबत केला इमोशनल डान्स, व्हिडीओ पाहून रडू आवरणार नाही

लग्नाच्या अगोदर नवरीने घरातल्यांसोबत केला इमोशनल डान्स, व्हिडीओ पाहून रडू आवरणार नाही

कोणतंही लग्न म्हंटलं म्हणजे आनंदाचे , उत्साहाचे आणि अगदी रुसव्या फुगव्यांचे क्षण अनुभवायला मिळतात. यात थोडं कमी अधिकपण असू शकतं. पण एक वेळ अशी येते की प्रत्येक जण भावुक झालेला असतो आणि नकळतपणे त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिलेले असतात. हा क्षण म्हणजे जेव्हा नववधू आपल्या सासरी जायला निघते ती वेळ. एव्हाना लग्न समारंभ झालेला असतो आणि जड अंतःकरणाने वधूचे आई वडील तिला निरोप देत असतात.

एरव्ही लग्नातील डान्सचे वायरल व्हिडियोज हे चर्चेत असतात. पण काही काळापासून एक व्हिडियो असाही चर्चेत राहिला ज्यात एक नववधू आपल्या ‘बिदाई’ प्रसंगी नृत्य करत स्वतःला व्यक्त करताना दिसली. आपल्या टीमने ही हा व्हिडियो पाहिला. आपल्या वाचकांना याविषयी थोडक्यात कळालं तर नक्की आवडेल असं वाटलं. त्यातूनच हा लेख आकारास येत आहे. तर जेव्हा हा व्हिडियो सुरू होतो तेव्हा नववधू आणि बाकीची मंडळी उभी असलेली दिसून येतात. जवळच बुम बॉक्स असतो, ज्याचा वापर गाणी स्पीकरवर ऐकण्यासाठी केला जातो. त्यावर एक गाणं सुरू होतं आणि आपली नववधू ताई नृत्य करायला लागते.

‘यहां आना ना दोबारा… तेरा यहां कॊई नहीं’ हे गाणं सुरू असतं. लता दीदी मंगेशकर यांच्या आवाजात रेकॉर्ड झालेलं हे गीत. या गीतावर आपली ताई नाचत असते. हा डान्स ठरवलेला नसतो. त्यामुळे स्टेप्स अशा फारशा दिसून येत नाहीत. पण तिच्या देहबोलीतून ती बरच काही सांगून जाते. घर सोडून जाताना तिला होणारं दुःख कळून येतं. तिच्या जवळच उभे असणारे तिचे वडीलही भावनाविवश झालेले असतात. त्यांच्या भावना एवढ्या अनावर होतात की एकवेळेस आपली ताई नाचता नाचता जवळच उभ्या असलेल्या एका स्त्रीच्या गळ्यात पडते. तत्क्षणी तिचे वडील ही भावनाविवश होत पाठच्या भिंतीचा आधार घेताना दिसत असतात. मग काही वेळाने ते तिच्या सोबत गाण्यात सहभागी होतात. त्यांच्या परीने या डान्समध्ये सहभागी होत आपल्या भावना व्यक्त करतात. तेवढ्यात मगाशी ज्या स्त्रीच्या गळ्यात पडून ताई रडली ती स्त्री पूढे येते. मग दोघीही काही स्टेप्स एकत्र करतात. त्या क्षणी त्यांना ज्या प्रकारे व्यक्त व्हावंसं वाटतं, त्याप्रमाणे व्यक्त होत असतात. त्यात कुठचाही कृत्रिमपणा जाणवत नाही. यात अजून एका स्त्रीची थोड्या वेळाने भर पडते. एका क्षणी तिघीही एकत्र फेर धरत डान्स करतात.

हा प्रसंग सगळ्यांनाच हेलावून टाकेल असा. त्यात या ताईंचा दादा कसा सुटेल. त्याच्याही डोळ्यात नकळत अश्रू आलेले असतात. तो ही आपल्या भावना व्यक्त करतो. पुढची काही सेकंद तो ही डान्स करत आपल्या भावना व्यक्त करत राहतो आणि मग व्हिडियो संपतो.

हा संपूर्ण व्हिडियो आपल्यालासुद्धा भावुक करतो. आपल्या पैकी काहींनी स्वतःच्या लग्नात अशा कठीण प्रसंगांना तोंड दिलेलं असेल. तर काही जण या अशा प्रसंगांमध्ये त्या स्त्रीच्या भूमिकेत असतील जिने ताईला आधार दिलेला दिसून येतो. एकूणच काय तर व्हिडियो काही मिनिटांचा आहे, पण आपल्या आठवणी जागृत करणारा व्हिडियो आहे. आपल्या वाचकांना या व्हिडियो विषयी वाचायला आवडेल असं वाटलं आणि हा लेखप्रपंच घडला. आपल्या टीमचा हा प्रयत्न आपल्याला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये लिहून कळवायला विसरु नका. तसेच नेहमीप्रमाणे हा लेखही मोठ्या प्रमाणात शेअर करा. शेवटी आपण जे प्रोत्साहन देता, त्यातूनच आम्हाला नवनवीन विषय हाताळण्याची ऊर्जा मिळत असते. तेव्हा येत्या काळातही आपला पाठिंबा आपल्या टीमच्या पाठीशी कायमस्वरूपी असू द्या. लोभ असावा ही विनंती. धन्यवाद !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *