असं बोलतात जोड्या परमेश्वरच बनवतो. तोच ठरवतो कि तुमचे लग्न केव्हा, कधी आणि कुणासोबत होणार ते. कधी कधी आयुष्यात असं काही नकळत आणि काही क्षणभरात घडून जातं कि आपला स्वतःचा त्या गोष्टीवर विश्वास ठेवणं मुश्किल होऊन बसतं. आता चिकमंगलुर जिल्ह्यातील तरिकीरे तालुक्यातील गावातील घटनाच घ्या ना. इथे एक व्यक्ती पाहुणा बनून आला होता, परंतु लग्नामध्ये असं काही घडलं कि त्याला स्वतःवर विश्वास होत नसेल. खरं तर लग्नाच्या दिवशीच नवरा पळून गेला होता. अश्या मध्ये पाहुणा बनून आलेला ह्या व्यक्तीच्या आयुष्यात एक वेगळीच घटना घडली, जी त्याच्यासाठी खूपच अनपेक्षित अशी होती. चला तर आपण ह्या एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला साजेश्या घटनेबद्दल विस्ताराने जाणून घेऊया.
खरंतर, अशोक आणि नवीन हे दोन भाऊ रविवारी एकाच ठिकाणी लग्न करणार होते. ह्यातील नवीन नावाच्या व्यक्तीचे लग्न सिंधु नावाच्या मुली सोबत होणार होती. लग्नाच्या आदल्या दिवशी म्हणजे शनिवारीच दोघांनी एकत्र फोटोज सुद्धा काढले होते. लग्नासाठी आलेल्या सर्व नातेवाईकांनी आदल्या दोघांना आशीर्वाद सुद्धा दिला होता. परंतु जेव्हा लग्नाचा दिवस उजाडला तेव्हा नवराच पळून गेला होता. शोध वैगेरे घेतल्यावर माहिती पडलं कि त्याच्या प्रेयसीच्या सांगण्यावरून तो लग्नातून पळून गेला आहे. खरंतर, नवीनला त्याच्या प्रेयसीने ध’मकी दिली होती कि जर तो लग्न करेल तर त्याची प्रेयसी लग्नमंडपात येऊन वि’ष खाऊन जीव देईल. ह्या गोष्टीमुळे भीत नवऱ्याने लग्नमंडपातून पळ काढली. त्याने प्रेयसीला तुमकुरू मध्ये भेटण्यासाठी सांगितले. त्यानंतर त्याची कोणतीच माहिती मिळू शकली नाही. तर दुसरीकडे जेव्हा लग्नाच्या दिवस नवरा शोधून पण मिळत नसल्यामुळे सिंधू आणि तिच्या घरचे खूप टेन्श’नमध्ये आले.
नवीनचा भाऊ अशोकने तर त्या लग्नमंडपात सात फेरे घेतले परंतु सिंधू मात्र लग्न न झाल्यामुळे रडत होती. अशामध्ये तिच्या घरच्यांनी एक निर्णय घेतला कि ते लग्नामध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांमध्ये तिच्यासाठी एक योग्य वर शोधतील. अशामध्ये पाहुणा बनून आलेल्या चंद्रप्पा ह्या गोष्टीसाठी राजी झाला. तो व्यवसायाने बीएमटीसी कंडक्टर आहे. त्याने वधूसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. मग काय होतं, दोन्ही कुटुंबाच्या सहमती नंतर गोष्टी जुळून आल्या. चंद्रप्पा आणि सिंधू ह्यांनी सात फेरे घेतले. आणि आयुष्यभरासाठी एकमेकांचे झाले. आता सोशिअल मीडियावर जेव्हा हि घटना वायरल होत आहे तेव्हा जो कुणी चंद्रप्पाचे कौतुक करत आहे. इतक्या ताबडतोब कुणासोबत लग्नाचा निर्णय घेणं सोपी गोष्ट नाही, परंतु चंद्रप्पाने असं करून वधू आणि तिच्या कुटुंबाला दुःखाच्या क्षणामधून सुखाच्या क्षणात परावर्तित केले. आता चंद्रप्पा आणि सिंधू दोघेही खूप खुश आहेत.