Breaking News
Home / मनोरंजन / लग्नाच्या वरातीत पैश्यांच्या नोटा हातात धरून नाचत होता तरुण, परंतु मित्रांनी असं काही केले जे पाहून हसू आवरणार नाही

लग्नाच्या वरातीत पैश्यांच्या नोटा हातात धरून नाचत होता तरुण, परंतु मित्रांनी असं काही केले जे पाहून हसू आवरणार नाही

लग्नाचा दिवस तर प्रत्येकासाठीच खास असतो. आणि तो संस्मरणीय बनवण्यासाठी लोक सहसा काय काय नाही करत? जसा लग्नाचा सिझन चालू झाला आहे तसतसे सोशल मीडियावर लग्नाशी संबंधित अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. यातील काही व्हिडीओ हसायला लावणारे आहेत तर काही पाहून थक्क करणारे आहेत.

त्याच वेळी, काही व्हिडिओ आपल्याला बर्याच वेळा काहीतरी शिकवत असतात आणि ज्यामध्ये अनेक जुन्या चालीरीतींशी निगडीत अनेक गोष्टी असतात. परंतु लग्नात काही वराती सुद्धा तितकेच मजेशीर असतात आणि ते सुद्धा लग्नाची मजा वाढवण्यात, लग्नात नाचून त्या लग्नाची शोभा वाढवण्यात त्यांची महत्वाची भूमिका निभावतात. आणि त्यांच्या नाचण्याचा काही व्हिडिओ तर इतके मजेदार असतात की ते काही क्षणातच व्हायरल होऊन जातात.

असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर ट्रेंड होत आहे. आणि हा व्हिडिओ एका वरातीत नाचणाऱ्या माणसाचा आहे. आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हसणे थांबवणे तुमच्यासाठी कठीण होणार आहे. तर या ट्रेंड होणाऱ्या व्हिडिओ मधे तुम्ही बघूच शकता की काही वराती गाण्याच्या तालावर नाचत आहेत आणि त्यांच्यामध्ये एक व्यक्ती हातात पैशांच्या नोटा धरून नाचत आहे.

परंतु तो व्यक्ती नाचण्यात मग्न असतानाच तिथले काही लोक त्याच्याभोवती जमा होऊन नाचू लागतात आणि त्यांच्यापैकी एक जण त्या व्यक्तीच्या हातातील पैसे घेऊन त्याच्या समोर ते वर उडवतो आणि तो व्यक्ती बिचारा अचानकपणे असे झाल्याने गडबडून त्या पैश्यांकडे बघत ते गोळा करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु त्या आधीच तिथे असलेल्या लोकांनी ते पैसे त्यांच्या ताब्यात घेतलेले असतात आणि तो व्यक्ती सगळ्यांकडे केविलवाण्या नजरेने बघत असतो.

या व्हिडिओ मधे त्या व्यक्तीची झालेली फजिती पाहून तुम्हाला नक्कीच मजा आली असेल. आणि हा व्यक्ती आता कोणत्याही लग्नात जाण्याच्या आधी दहा वेळा विचार करेल हे मात्र नक्की…! आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने फिरतोय. आणि आतापर्यंत या व्हिडिओ ने लाखो व्ह्यूज मिळवले आहेत आणि या माणसाची झालेली फजिती बघून या व्हिडिओ वर अनेकजण भन्नाट कमेंट्स सुद्धा करत आहेत.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.