Breaking News
Home / मनोरंजन / लग्नात नवरदेवाला इतके आहेर मिळाले कि आहेर उचलून नेणाऱ्यांचीच वरात निघाली, बघा हा अतरंगी व्हिडीओ

लग्नात नवरदेवाला इतके आहेर मिळाले कि आहेर उचलून नेणाऱ्यांचीच वरात निघाली, बघा हा अतरंगी व्हिडीओ

सध्या आपल्या सोशल मीडिया अकाउंटला लॉग इन केलं की कोणी ना कोणी लग्न केल्याची बातमी दिसतच असते. अगदीच काही नाही, तर ज्यांनी लग्न केलंय त्यांच्या हनिमूनला जाण्याचे फोटोज तर हमखास पाहायला मिळतात. पण गंमत अशी की जातानाचे फोटो व्हिडियो असतात पण येताना मात्र एकही नसतो. असो. गंमतीचा भाग सोडला तर खरंच सध्या सगळीकडे लग्नाचा माहोल अगदी जोरात आहे. ज्यांचं लग्न जमायला ही उशीर झालाय अशांची ही लग्न होतायत. एकूणच काय, तर सध्या लग्न समारंभांमुळे का होईना गेल्या काही काळातील कटुता थोडी कमी होतेय.

त्यात लग्न म्हणजे आनंदाचे क्षण हमखास असतात. आणि आपले मित्रमंडळी जर अतरंगी असतील तर मग त्यांचे एकेक उपक्रम बघायलाच नको. मुद्दामहून असं काही तरी करून जातात की सगळीकडे हशा पिकवतात. त्यात हुकुमी एक्का असतो तो म्हणजे अतरंगी गिफ्ट्स आहेर म्हणून देणं. काय एकेकाची चॉईस म्हणावी. बाळाच्या बॉटल पासून ते लाटण्यापर्यंत सगळ्या गोष्टी ही मंडळी देतात. आपणही नाही म्हणू शकत नाही. तेवढीच मजा मजा असते. पण एरवी आहेर घेणं आपण टाळतो. म्हणजे अगदीच काही सगळे आहेर टाळावेसे वाटत नाहीत. पण काही वेळा आहेर अपेक्षेपलीकडे गेले की त्यांचं करायचं काय हा प्रश्न पडतो. बरं दुसऱ्यांना द्यावेत तर ते ही बरं दिसत नाही. तसेच पाठीमागून चर्चा होणार ती वेगळीच.

असो. अर्थात काही एक मर्यादा ही आहेर आणण्यावर ही असतेच. पण प्रत्येक गोष्टीला अपवाद हे असतातच. असाच एक अपवादात्मक व्हिडियो आमच्या टीमने आज बघितला. व्हिडियो दोन मिनींटांपेक्षा अंमळ जास्त वेळेचा आहे. पण त्यापेक्षा जास्त वेळ घेत नाही. पण या उण्यापुऱ्या वेळेत ही आपल्याला एका लग्नातील इतका आहेर बघायला मिळतो की आश्चर्यचकित व्हायला होतं. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला एका गावातून वरात जाताना दिसते. सुरुवातीला अर्थातच नवपरिणीत नवरा बायको असतात. पण काहीच सेकंद. पुढचा पूर्ण वेळ केवळ आणि केवळ आहेर वाहून नेणारी मंडळी आपल्याला दिसत राहतात. बरं यात पारंपारिक भांडी जशी आहेर म्हणून असतात तसेच अगदी मोठ्या मोठ्या वस्तू ही असतात. एक गोदरेजचा फ्रीज ही दिसून येतो. अहो एवढंच काय तर काही पोरं खांद्यावर बेड घेऊन जाताना दिसतात. बरं तो बेडच आहे सोफा नाही असं वाटतं कारण पाठीमागून अजून दोन जणं बेडवरची गादि घेऊन जात असतात. आपल्याला कदाचित अतिशयोक्ती वाटेल. पण आपण स्वतः हा व्हिडियो बघून खात्री करून घेऊ शकता.

आपल्या वाचकांसाठी हा व्हिडियो आपली टीम या लेखाच्या शेवटी शेअर करेल. आमच्या टीमने हा व्हिडियो बघितला आणि काही वेळ काय लिहावं हेच सुचेना. पण म्हंटलं नुसतं लिहिलं तर लोकांना वाटेल, थूकपट्टी लावताहेत. त्यापेक्षा मूळ व्हिडियोच शेअर करू. त्यामुळे सदर व्हिडियो शेअर केलेला आहे. असो.

बरं तर मंडळी, हा होता, आपल्या टीमने लिहिलेला लेख ! आजचा हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. यासोबतच आपल्या टीमने लिहिलेले अन्य लेखही वाचा. कारण आपली टीम आपल्या वाचकांसाठी अगदी शोधून शोधून विषय निवडत असते. काही तरी नवीन, अतरंगी आपल्या वाचकांना कळावं हा त्यामागे हेतू असतो. तसेच आमची लिहायची आणि आपली वाचायची आवड यासाठी आम्ही हे अगदी मनापासून करत असतो. पुढेही करत राहू. गरज आहे ती आपल्या खंबीर पाठिंब्याची ! तो कायम मिळत राहू दे ही सदिच्छा ! लवकरच एका नवीन विषयासह भेटूच. तोपर्यंत काळजी घ्या, आमचे सगळे लेख वाचा आणि आठवणीने शेअर करा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *