Breaking News
Home / मनोरंजन / लग्नात नवरदेव ओव्हर कॉन्फिडन्स करायला गेला आणि स्वतःचीच फजिती करून बसला, व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

लग्नात नवरदेव ओव्हर कॉन्फिडन्स करायला गेला आणि स्वतःचीच फजिती करून बसला, व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

यंदा कर्तव्य आहे म्हणत प्रत्येक घरात कधी ना कधी लग्नाची धावपळ सुरू होते. या नंतर येते ती सगळी तयारी. तेव्हा ‘लग्न पाहावे करून’ ही म्हण आठवते. ही म्हण अगदी लग्न सोहळा संपूर्ण होइपर्यंत आठवतच असते. पण नवरा नवरीच्या गळ्यात वरमाला पडतात आणि तेव्हा कुठे घरच्यांच्या जीवात जीव येतो. मग थोडं हायसं वाटून सगळे जण सैलवतात.

पण याच काळात जर नवरा किंवा नवरी अवखळ आणि अति आत्मविश्वासपूर्ण असतील तर हे सैलावण फार काळ टिकत नाही. या दोघांपैकी एकाने किंवा दोघांनी काही तरी घोळ घालून ठेवलेला असतो. अर्थात प्रत्येक वेळी कपाळावर हात मारून घेण्याची वेळ येत नाही. काही वेळा कशाला उगीच हुशारी म्हणत सगळेच हसत सुटतात. याचा अगदी प्रत्यय आज आपल्या टीमने बघितलेल्या व्हिडियोत आला. खरं तर व्हिडियो आहे अगदीच छोटा, त्यामुळे आपला जास्त वेळ बघण्यात जात नाही. पण त्या दुप्पट वेळ हसण्यात मात्र जातो. आता होतं काय, तर बहुतेक नवरा नवरी रिसेप्शनसाठी तयार होऊन उभे असतात. बरं हल्ली थाटमाटात लग्न म्हणजे जरा वेगळीच व्यवस्था असते. त्यामुळे हे नवपरिणीत जोडपं एका उंच रॅम्पवर उभं असतं.

आता फक्त या जोडप्याने उभं राहावं यासाठी हा रॅम्प असतो. पण तेवढ्यात नवऱ्या मुलाच्या मनात काही तरी कल्पना येते. लग्न नाही तरी (सहसा) एकदाच होतं. त्यामुळे काही तरी वेगळं करावं असं प्रत्येकाला वाटतं. पण स्थळ आणि काळ चुकला की फजिती होतेच होते. इथेही तसच काहीसं घडतं. आपल्या नवपरिणीत सुविद्य पत्नीला उचलून घ्यावं असं या नवऱ्याला वाटतं. बरं या नवऱ्या मुलीला यात काहीही रस नसतो. म्हणजे निदान त्या ठिकाणी जिथे जागा कमी आहे तिथे हे सारं करावं असं तिला वाटत नसावं. कारण पुढची काही सेकंद ती त्या रॅम्पचा कठडा पकडून उभीच असते. तिच्या मनाची तयारी होतच नसावी. त्यामुळे नवरा मुलगा तिला उचलून घ्यायला बघत असतो. पण ती मात्र तिच्या मतावर ठाम असते. शेवटी शेवटी तर डोळे बंदच करून घेते ही ताई. कदाचित पुढे काय होणार आहे हे तिच्या लक्षात आलेलं असतं. पण आता नवरोबा ऐकत नाहीत म्हंटल्यावर तिचा नाईलाज होतो. शेवटी ती त्याला परवानगी देते आणि मग…. जे काही होतं ते मात्र आपण व्हिडियोतच बघावं. कारण आता शब्दांत घडलेली घटना सांगितली तर त्याची मजा कदाचित निघून जाईल. तेव्हा आपली टीम हा व्हिडियो शेअर करेलच त्याची स्वतःहून मजा घ्या.

कदाचित आपण याची मजा आधीच घेतली असेल. पण नसेल घेतली तर हा व्हिडियो एकदा पहा. आपण नक्कीच मनसोक्त हसाल. अर्थात झाल्याप्रकाराबद्दल त्या नवरोबला ही दोष देता येत नाही. काही वेळा उत्साहात माणूस बरंच काही करून जातो. काही वेळा इतरांच्या सांगण्यावरून ही काही गोष्टी होतात. काही यशस्वी होतात. तर काही वेळा पचका होतो. पण अस असलं तरी लग्न म्हणजे किस्से हे समीकरण नेहमी लक्षात ठेवावं आणि झाल्या प्रकारची मजा तिथेच घेऊन सोडून द्यावी. आमच्या टीमने ही तेच केलेलं आहे. फक्त हा व्हिडियो थोडा विनोदी वाटला म्हणून त्याविषयी लिहिलं इतकंच. असो.

आपल्याला आमच्या टीमचा हा प्रयत्न आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपल्या टीमकडून नेहमीच उत्तम असे लेख लिहिले जात असतात. त्याला आपला उत्तम प्रतिसाद ही मिळत असतो. आपलं हे प्रेम आम्हाला यापुढेही मिळत राहू दे ही सदिच्छा. आम्हीही विविध विषयांवर उत्तम लेख आपल्या साठी लिहीत राहू याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य लेख वाचा आणि आठवणीने शेअर करा ! आनंद वाटत राहा ! धन्यवाद !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *