भारतात लग्न कोणत्याही सणांपेक्षा कमी नाही. इथे प्रत्येक धर्माची आणि जातीची खास विधी आणि परंपरा असते. खासकरून उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या लग्नात एक मोठी सामान्य रीत आहे. जेव्हा कोणत्या मुलाचे लग्न असते तेव्हा तो नवरदेव बनून नवरीच्या घरी घोडीवर बसूनच जातो. या घोडीच्या मागे आणि पुढे नवऱ्याचे नातेवाईक आणि मित्र चालतात. यादरम्यान घोडीला खूप सुंदर सजवले जाते. नंतर बँड बाजा आणि नाचत नवरा आपल्या नवरीच्या घरी जातो. या प्रक्रियेला वरात घेऊन जाणे असेही म्हणतात. तुम्ही सुद्धा खूप वेळा नवरदेवाला घोडी वर चढताना पाहिलेले असेल. अशात कधी तुमच्या मनात विचार आला का कि, नवरदेव लग्नाच्या वेळी घोडीवरच का बसतो? आज आम्ही या गोष्टीच्या मागचे कारण तुम्हाला सांगायला जात आहोत.
लग्नात नवरदेवाची घोडी वर बसण्या संबंधित खूप कारणे आहेत. सगळ्यात पहिले कारण हे कि, हिंदू धर्म आणि संस्कृती मध्ये घोडे नेहमी महत्त्वपूर्ण आहेत. अश्वमेघ यज्ञ असो नाहीतर श्री कृष्णाने अर्जुनाचा रथ चालवणे असो. अशा प्रकारे घोडा चालवण्याचा अर्थ असाही होतो कि त्या व्यक्ती ने आपल्या बालपणाचा त्याग केला आहे आणि ती व्यक्ती आत वयस्कर बनून जबाबदारी सांभाळण्याच्या परिस्थितीत आहे. या कामा नंतर त्याच्या जीवनाचा एक नवीन पर्व सुरु होतो. घोडा चालवणे ह्याच गोष्टीला दर्शवतो, यासाठीच लग्नात नवरदेवाला घोडी वर बसवले जाते. आता खूप लोकांच्या मनात हा विचार येईल कि, नवरदेव घोडी वरच का बसतो? घोड्यावर का नाही? खरंतर, घोडी घोड्याच्या तुलनेत जास्त चंचल असते. अशात तिच्यावर नियंत्रण ठेवणे कठीण होते. म्हणून लग्नात घोडी चा वापर करून असे दाखवले जाते कि नवरा आता येणाऱ्या प्रत्येक संकटासाठी तयार आहे.
पंजाबी लग्नात तर घोडीला सगळ्यात जास्त सजवले जाते. या सजावटी दरम्यान घोडीच्या शेपटीला ‘मौली’ बांधण्याची रीत आहे. त्या बरोबरच लग्नात नवऱ्याची बहीण घोडीला चणे खायला देते. या व्यतिरिक्त घोडे राजे-महाराजांच्या काळात शौर्य आणि वीरतेचे प्रतीक समजले जात. शूरवीर लोक नेहमी घोड्यावर बसलेले दिसायचे. हेच कारण आहे कि, लग्नात नवरदेवाला घोडी वर बसवले जाते. तसे तर आता काळ खूप बदलला आहे. अशातच काही लोकांना घोडी वर बसायला आवडत नाही. त्याचे कारण हे कि लग्नात वापरल्या जाणाऱ्या घोडीवर या दरम्यान खूप मानसिक व शारीरिक अ-त्या-चार होतात. एकदा तुम्ही घोडीला न सजवता बघा तिच्या शरीरावर तुम्हाला खूप जखमा दिसतील. ते लग्नात घोडीला ला सजावण्यामुळे होतात. या बरोबरच फटाके आणि बँड बाजाच्या आवाजाने या जनावरांवर नकारात्मक प्रभाव पडतो. लग्नात घोडी वर होणाऱ्या अ-त्या-चार संबंधित तुम्हाला कित्येक व्हिडीओ आणि फोटो मिळतील.