काही वर्षांपूर्वी जेव्हा इंटरनेट आणि सोशल मीडिया एवढा फोफावला नव्हता तेव्हा टीव्ही हेच आपलं मनोरंजनाच साधन असे. आजही ते आहे आणि यापुढेही राहील. पण त्या जुन्या काळात आपल्याला जेवढं दिसतंय त्यावर समाधान मानावे लागे. अर्थात त्या काळातही गंमत आणणारे कार्यक्रम होतेच. भारतीय कार्यक्रम तर होतेच, तसेच परदेशी कार्यक्रम ही असतं. अगदी आता आतापर्यंत चाललेला तकेशिज कासल असेल किंवा मग अगदी अमेरिकाज फनियेस्ट होम व्हिडियोज ही शृंखला असेल. खरं तर यापेक्षा ही अनेक होतेच. पण या शोज मधून मिळणारं मनोरंजन काही और असे.
कारण यात एक धमाल गेम शो होता. तर दुसरा हा अमेरिकन दैनंदिन आयुष्यातील गंमतीशीर घटनांचा कार्यक्रम ! या दोन्ही मध्ये असे अनेक प्रसंग येत ज्यात एखादी व्यक्ती काही तरी।अतरंगी वागल्याने वा बोलल्याने वा पडल्याने, धडपडल्याने वा चुकल्याचं दिसे आणि हसता हसता डोळ्यांत पाणी येई. आता आपण स्वतः पडलो तरी डोळ्यात पाणी येतच. पण ते आपलं अंग जोरात आपटल्याचं असतं. पण हीच बाब दुसऱ्यांच्या बाबतीत झाली की मात्र हसायला येतं.
जरा विचित्रच आहे पण काय करणार आपला मानावांचाच स्वभाव आहे. असो. तर यातील फनियेस्ट व्हिडियोज मध्ये तर दैनंदिन आयुष्यातील मजेशीर घटना दिसत. आजही हा कार्यक्रम बघितला तरी हसायला येईल. अर्थात हळूहळू काळ बदलला आणि आता याच सगळ्या गोष्टी इंटरनेट वर दिसायला लागल्या. बरं, हे माध्यम इतकं बहुप्रसवा आहे की यात जगभरातील व्हिडियोज बघता येतात. बरं ज्यांच्या बाबतीत हे किस्से घडले आहेत, अनेकवेळा त्यांच्याकडूनच सदर घटना ही शेअर केली जाते. अगदीच नाही तर बाकीची मंडळी असतातच. कारण सोशल मीडियावर लाईक्सचा पाऊस कोणाला नको असतो. सगळे कौतुकाचे भुकेले असतातच. पण यातूनच मग जबरदस्त म्हणावे असे व्हिडियोज ही समोर येतात. त्यात हल्लीचा काळ हा शॉर्ट व्हिडियोजचा आहे. त्यामुळे छोट्यातली छोटी मजेशीर घटना ही चित्रित करून शेअर केली जाते. आता आज आपल्या टीमने बघितलेल्या व्हिडियोचं उदाहरण घ्या. हा मूळ व्हिडियो दहा सेकंदाच्या पेक्षाही कमी वेळेचा आहे. पण नंतर त्यात याच व्हिडियोचं स्लो मोशन व्हर्जन ही समाविष्ट केलंय. त्यामुळे त्याची लांबी वाढते. पण एका अर्थाने जे केलंय ते चांगलंच केलंय आणि मजेशीर ही आहेच.
यात आपल्याला एका लग्नातील म्हणायला गेलं तर छोटी पण हसायला लावणारी घटना घडते. होतं काय तर नवरा नवरी मंचावर आसनस्थ झालेले असतात. म्हणजे बहुधा लग्नाचे विधी उरकून आता रिसेप्शनची वेळ असते. आणि रिसेप्शन म्हंटलं की कोणाची जास्त मर्जी चालते ? अर्थातच मित्र परिवाराची ! इथेही तोच प्रकार असतो. नवऱ्याचे दोन मित्र मंचावर असतात..नवरा नवरीच्या दोन्ही बाजूला उभे राहून नवरदेवावर पैसे टाकत असतात. आता असं काही होत असलं की माणूस अगदी रंगात असतो. अगदी झोकात चालतो, बोलतो आणि नेमक्या अशाचवेळी काही ना काही फजिती होऊ घालते. कारण एरवी आपण जी काम लक्ष देऊन करतो ती आता लक्ष देऊन करण्याकडे आपला कल नसतो. त्या मस्तीत लक्ष भरकटत आणि माणूस घसरन पडतो. आता काय ते समजून घ्या. आम्ही तर म्हणतो फक्त समजता कशाला? बघाच की ! आपल्या।वाचकांसाठी आपली टीम हा व्हिडियो खाली शेअर करेल. हा लेख संपल्यावर आपल्याला तो बघता येईल. त्यामुळे काही क्षण का असेना पण आपलं मनोरंजन होईल हे नक्की. बाकी वर उल्लेख केल्याप्रमाणे आपल्याला असंख्य मजेशीर व्हिडियोज इंटरनेट वर बघता येतात. पण काही वेळा एवढं सगळं बघायला वेळ ही नसतो आणि प्रत्येक गोष्ट आवडेल याची शाश्वती ही नसते. पण अशावेळी आमची टीम कामास येते.
आमची टीम सदैव उत्तमोत्तम विषयांवर आणि त्यातही वायरल व्हिडियोज वर लिहीत असते. आपण नियमित वाचक असाल तर आपल्याला हे माहिती असेलच. पण नवीन असाल तर आमची वेबसाईट बुकमार्क करून ठेवा आणि मस्त मस्त लेखांचा आनंद घ्या. त्यासोबत वेळोवेळी व्हिडियोज असले तर त्यांचाही आनंद आपल्याला घेता येईल. असो. सध्या इथेच थांबू.
आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :