Breaking News
Home / मनोरंजन / लग्नात नवरीने वरमाला नीट घातली नाही म्हणून नवऱ्याला आला राग, बघा पुढे काय केले ते

लग्नात नवरीने वरमाला नीट घातली नाही म्हणून नवऱ्याला आला राग, बघा पुढे काय केले ते

आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या घटना घडत असतात आणि आपल्याला घडवत असतात. पण या आयुष्याला एक वेगळाच आयाम देण्याची ताकद काही घटनांमध्ये असते. यातील काही तर आपण स्वतःच स्वतःच्या बाबतीत घडवून घेत असतो. एक घटना तर अशी आहे ज्यात आपल्याला रस असो वा नसो पण आपल्या घरातील जेष्ठ मंडळी याची तजवीज करत असतात. त्याला अगदी सोहळ्याच रुपडं असतं. होय, आपल्या डोक्यात जे आलं तीच ही घटना – लग्न. आयुष्याला खरंच वेगळं वळण आणि आयाम देण्याची ताकद असलेली घटना.

कदाचित याचमुळे याचा आनंद ही तितक्याच मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. इतका की काही वेळा त्यात किस्सेच किस्से घडत असतात. काही किस्से तर नेहमी लक्षात राहावे असेच असतात. त्यात ज्यांचं लग्न होत आहे ते नवरा नवरी ही दडपणाखाली असतात. असणारच म्हणा. पण बहुतेकवेळा याच तणावामुळे त्यांच्या हातून किस्से घडत असतात. बरं आधीच्या काळात हे किस्से केवळ एकदा बघायला मिळत. मग ज्यांनी बघितला त्यांच्याकडून ऐकीव स्वरूपात अनुभवायला मिळत. त्यात त्यांचा स्वतःचा मिर्च मसाला आणि फोडणी असे.

पण हल्लीचा काळ हा सोशल मीडिया आणि वायरल व्हिडियोजचा आहे. त्यामुळे असे किस्से स्वतः मोबाईल वा कम्प्युटर वर बघायला मिळतात. आता आज आपल्या टीमने बघितलेल्या व्हिडियोच उदाहरण घ्या. हा व्हिडियो आहे तीन-चार वर्षांपूर्वीचा. पण त्यातील मजा मात्र आजही कायम आहे. असणारच म्हणा. कारण यातील दोघेही नवरा बायको एकमेकांना अगदी पूरक आहेत असच वाटतं. खासकरून हा व्हिडियो बघून तर खात्रीच पटते. बरं एक सूचना आहे. सुरुवातीला काही सेकंद काहीच घडत नाही. म्हणजे नवरा नवरी समोर उभे असतात. जवळच नेहमीप्रमाणे लगबग करणाऱ्या करवल्या असतात. त्यांचीच लगबग सुरुवातीला पहावयास मिळते. त्यामुळे हा भाग थोडा नाही पाहिलात तरी चालेल. पण मग मात्र पुढच्या काहीच क्षणांत मजा येते. सुरवात होते नवरी मुलीपासून. असे व्हिडियो बघताना नेहमी एक गोष्ट लक्षात घ्यावी, की नवरीला वरमाला घाल सांगणारी एखादी व्यक्ती असतेच. आता हे वाक्य ऐकून काय होतं माहीत नाही. कदाचित की ‘आला तो क्षण’ असं दडपण येत असावं. त्यामुळे कदाचित नवरीचा नेम चुकतो. यावेळी ही तसच होतं. नेम चुकतो आणि वरमाला जणू एखाद्या सौंदर्य स्पर्धेचा सॅश असावा तसा नवरदेवाच्या गळ्यात पडतो. एवढा वेळ गंभीर वाटणारा नवरदेव ही गालातल्या गालात खुदकन हसतो.

आता हे या नवरीने मुद्दामहून केलं की काय असं वाटायला लागतं. पण आपल्या त्याविषयी माहिती नसल्याने त्यावर भाष्य करणे योग्य नव्हे. पण यानंतर नवरा जे करतो ते मात्र मुद्दामहून केल्यासारखं वाटतं. आता तो काय करतो हे मात्र आपल्याला व्हिडियो बघून कळून घ्यावं लागेल. कारण त्याच शब्दांत इथे वर्णन केलं तर मजा निघून जायची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपल्या मजेत अडथळा येऊ शकतो. त्यापेक्षा आपली टीम हा व्हिडियो या लेखासोबतच शेअर करेल. त्याची मजा आपण जरूर घ्या. व्हिडियो तसा कमी वेळेचा आणि हलका फुलका आहे. त्यामुळे निदान काही क्षण तरी आपलं मनोरंजन होऊन जातं हे नक्की. आपण कदाचित याचा आस्वाद घेतला असेल. नसेल घेतला तर एकदा जरूर बघा. आपल्याला आवडून जाईल.

असो. तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *