एखाद्या गोष्टीचा ट्रेंड आला आणि तो लोकप्रिय ठरला की मग ती गोष्ट करण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. यात जी मंडळी अगदी सहजतेने हे ट्रेंड आत्मसात करतात की सगळ्यांच्या कौतुकास पात्र ठरतात. नजीकच्या काळातला एक लोकप्रिय ट्रेंड म्हणजे लग्नात बॉलिवूड थीम असणं. अनेकांनी याचा अवलंब केलेला दिसून येतो. त्याचे अनेक व्हिडियोज वायरल ही झाले आहेत. पण यातील अतिशय लोकप्रिय ठरलेल्या व्हिडियोपैकी एक व्हिडियो पुन्हा बघण्याचा योग आला. हा व्हिडियो जवळपास सहा कोटी लोकांनी बघितला आहे आणि त्यातील अनेकांनी यावर आपल्या पसंतीची मोहोर उमटवली आहे.
हा व्हिडियो आहे रोहन निगम आणि त्यांची पत्नी प्रिया यांच्या लग्नातला. हे लग्न म्हणजे एक देखणा सोहळाच. यात अनेक कार्यक्रमांची रेलचेल होती. त्यातही रंगला तो ‘संगीत’ सोहळा. त्यातील नववधू म्हणजे प्रिया यांनी रोहन यांच्या साठी केलेला डान्स फारच लोकप्रिय ठरला. वर उल्लेख केल्याप्रमाणे जवळपास ६ करोडहुन अधिकांनी हा व्हिडियो पाहिला आहे.
संगीत या सोहळ्यात प्रिया यांना रोहन यांच्या साठी काही तरी स्पेशल करावं असं वाटत होतं. एका छान गाण्यावर डान्स हे त्यावरचं उत्तर. मग काय प्रिया लागल्या तयारीला आणि त्यांनी एक उत्तम डान्स साकारला. व्हिडियो सुरू होतो तेव्हाच आपल्याला याची चुणूक यायला लागते. एव्हाना गाण्याचे सुरुवातीचे म्युझिक ऐकायला येत असते. प्रिया ठरल्याप्रमाणे स्टेप्स घेत आपल्या जागेवर येत पाठमोऱ्या उभ्या राहतात. मग टाळ्या वाजवण्याचा आवाज गाण्यात असतो तो ऐकायला येतो. इथे कौतुक वाटतं ते प्रिया यांचं. प्रत्येक बिट पकडत त्या टाळ्यांचा आवाज आपल्या स्टेप्स नी पकडतात. तेव्हाच लक्षात येतं, त्यांनी या डान्स साठी कसोशीने मेहनत घेतली आहे. आपला अंदाज पुढे पूर्ण व्हिडियो भर बरोबर येतो. पुढे जस जसा व्हिडियो पुढे जातो, तस तश्या त्यांच्या एक एक छान स्टेप्स बघायला मिळतात. प्रत्येक स्टेप मध्ये एक पूर्णत्व दिसून येतं. तसेच बिट्स पकडण्याची हातोटी ही उत्तम आहे. तसेच हस्तमुद्रा पण छान वाटतात. अजून एक गोष्ट भाव खाऊन जाते ती म्हणजे मान हलवत केल्या गेलेल्या स्टेप्स. अगदी पिक्चर परफेक्ट.
पण एवढं असलं तरी ज्यांच्या साठी प्रिया एवढा छान डान्स करतात ते कुठे असतात असा प्रश्न पडतो. त्याच उत्तर शेवटच्या दहा सेकंदात मिळतं. रोहन शेवटच्या दहा सेकंदात येतात. पण एक मात्र खरं. प्रिया यांनी कदाचित त्यांना हा डान्स आश्चर्याचा धक्का म्हणून केलेला असतो. हा सुखद आणि गोड धक्का रोहन यांना सुखावून गेलेला दिसून येतो. आपणही जेव्हा हा व्हिडियो बघतो तेव्हा आपल्याला ही हा व्हिडियो आवडतोच. आपल्या टीमला ही आवडलाच. सोबतच याविषयी आपण आपल्या वाचकांसाठी लेख लिहिला तर त्यांना आवडेल असं वाटलं. म्हणून हा सगळा लेख प्रपंच.
आपल्या टीमने, आपल्या वाचकांसाठी म्हणून केलेला हा लेखप्रपंच आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला आपल्या कमेंट्सद्वारे कळत असतातच म्हणा. यावेळीही आपल्या प्रतिक्रिया कळू द्या. त्यांतून नवनवीन सुधारणा आणि नवीन विषय ही कळतात. तसेच आपण जेव्हा आमचं कौतुक करता, सकारात्मक कमेंट्स करता तेव्हा समाधान वाटतं. आपलं हे प्रेम यापुढेही आपल्या सोबत कायम राहावं ही सदिच्छा. लोभ कायम असू द्या. आपल्या पाठिंब्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!
बघा व्हिडीओ :