Breaking News
Home / मनोरंजन / लग्नात नवर्याच्या मित्रांनी केला अप्रतिम डान्स, एकदा बघाच हा व्हिडीओ

लग्नात नवर्याच्या मित्रांनी केला अप्रतिम डान्स, एकदा बघाच हा व्हिडीओ

लग्न म्हंटलं की काही गोष्टी या ठरलेल्या असतात. मग त्यात रीतिरिवाज, जेवणाच्या शेवटी आईसक्रीम असणं आणि प्रत्येक गोष्टीत शेवटपर्यंत धाकधूक वाटणं या बाबी आल्याच. सोबत अजून एक गोष्ट असते, ती म्हणजे आपल्या जिगरी मित्र आणि मैत्रिणींनी केलेली मजा मस्ती. खासकरून नवऱ्या मुलाला आणि नवरी मुलीला एक सुखद धक्का म्हणून दिलेला डान्स परफॉर्मन्स तर म्हणजे अहाहा, क्या बात. असाच ‘क्या बात, क्या बात’ म्हणायला लावणारा परफॉर्मन्स आपल्या टीमने एका व्हिडियोत पाहिला. नवऱ्या मुलाच्या मित्रांनी त्याच्यासाठी आणि त्याच्या पत्नीसाठी खासकरून केलेला हा परफॉर्मन्स होता. या लेखातून चला जाणून घेऊयात या परफॉर्मन्स विषयी. व्हिडियोची सुरुवात होते तेव्हा आपल्याला पहिल्याच फ्रेम मध्ये दुपट्टा घेऊन बसलेले पाच जण दिसतात. ही मंडळी पुढची चार मिनिटं आणि पाच सेकंद धुमाकूळ घालणार हे आपल्याला त्याचक्षणी कळतं.

हे एवढं वाटत असताना कानावर गाण्याचे स्वर पडतात. देवदास चित्रपटातलं लोकप्रिय गाणं वाजत असतं. पण मूळ गाणं आणि हा परफॉर्मन्स यात फरक असतो. कारण परफॉर्मन्स मधून गंमत जंमत केलेली आहे. खासकरून ‘हम पे ये किसने हरा रंग डाला’ या कडव्यावर केलेली पान थुंकण्याची स्टेप म्हणजे कहर. पण हे गाणं संपत न संपत तो पर्यंत दुसरं गाणं सुरू होतं. करण अर्जुन चित्रपटातलं ‘गुपचूप गुपचूप’ हे ते गाणं. या गाण्यावर पुन्हा एकदा धमाल परफॉर्मन्स देण्यात ही मित्रमंडळी यशस्वी होतात. त्यांचं यश उपस्थितांच्या डोळ्यातून कळून येत असतं. या दोन धमाकेदार गाण्यांनंतर मग वेळ असते काहीशा नवीन गाण्याची. गुड न्युज चित्रपटातलं ‘सौदा खरा खरा’ हे गाणं वाजायला लागतं. एव्हाना या मित्रांनी आपापल्या जागा बदलून डान्स करायला सुरवात केलेली असते. या गाण्यातील सिग्नेचर स्टेप करत करत हे गाणंही अगदी मनोरंजक पद्ध्तीने सादर केलं जातं. आपण अगदी सुरुवातीस बांधलेली अटकळ अगदी खरी असते. पोरं अगदी धमाल उडवून देतात.

पण त्यांची एक हळवी बाजूही दिसायची असते. ती शेवटच्या गाण्यातून दिसून येते. ‘तेरे जैसा यार कहां…’ या गाण्याच्या नवीन व्हर्जनला आपण ऐकत असतो. एव्हाना धमाल मस्ती करणारे सगळे मित्र एकत्र आलेले असतात. तसेच त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या नवरदेवालाही त्यांनी मंचावर आणलेलं असतं. पुढचं मिनिटभर हे गाणं चालतं. पण कोणतीही स्टेप केली जात नाही. केवळ एकमेकांच्या खांद्यावर खांदा ठेऊन उभे असलेले मित्र आपण पाहतो. नकळत त्या सगळ्यांमध्ये आपल्याला आपले जिगरी दोस्त दिसू लागतात. आतापर्यंत मजा मस्ती करणारं वातावरण अगदी शांत आणि भावुक झालेलं असतं. या सगळ्यांची ही अतूट मैत्री बघून नववधू चे डोळे पाणावलेले असतात. आपणही भावनिक होऊन जातो. फार कमी व्हिडियोज मध्ये असं होतं की केवळ त्या शेवटच्या भागासाठी आपण अख्खा व्हिडियो पुन्हा पुन्हा पाहतो. त्यात काही तरी अनामिक पण आपल्या जवळचं आपल्याला गवसलेलं असतं. याच नोटवर आपण आजचा हा लेख संपवूयात. ती मैत्रीपूर्ण भावना अनुभवूयात.

पण त्यासोबतच, आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की कळवा. आपण सकारात्मक कमेन्स्ट करता, लेख शेअर करता तेव्हा आपसूक एक ऊर्जा मिळते. हीच ऊर्जा नवनवीन विषयांवर लिहायला प्रोत्साहित करते. तेव्हा आपलं प्रोत्साहन आम्हाला कायम मिळत राहू दे ही इच्छा ! लोभ असावा !! धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *