Breaking News
Home / मनोरंजन / लग्नात नाचणारा व्यक्ती कोलांट्या उड्या मा’रत आला आणि बघा पुढे काय केले ते, अतरंगी व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

लग्नात नाचणारा व्यक्ती कोलांट्या उड्या मा’रत आला आणि बघा पुढे काय केले ते, अतरंगी व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

लग्न म्हणजे धमाल, मजा मस्ती आणि बरंच काही. पण सगळ्यात महत्वाचा विषय असतो तो फटाके आणि ढोल-ताशे वाजवणाऱ्यांचा. लग्न म्हटलं की वाजंत्री आले आणि वाजंत्री म्हटलं की उत्स्फूर्तपणे नाचणारे लोक आले. खरं पाहिलं तर लग्न म्हणजे 2 प्रकारच्या लोकांना जास्त एन्जॉय करायला मिळतं. पहिल्या प्रकारात येतात त्या म्हणजे नवरीच्या मैत्रिणी. एकतर त्यांना लग्नात विशेष काही काम नसतं. दुसरं म्हणजे लग्नाच्या पत्रिकेत जिथे ‘व्यर्थ लुडबुड’ म्हणून लहान मुलांची नावे असतात तिथे खरंतर नवरा-नवरीच्या मित्र-मैत्रिणींची नावे टाकायला हवीत. कारण काम शून्य आणि यांची नुसती व्यर्थ लुडबुड असते. पण एक गोष्ट हे मित्र-मैत्रिणी मन लावून करतात. ती गोष्ट म्हणजे डान्स. आणि दुसरे म्हणजे नवरी-नवऱ्या कडची म्हातारी मंडळी. यांना तसेही विशेष काही काम नसते. इकडून तिकडे फिरणे, तंबा’कू खाणे आणि लग्नात आलेल्या पोरा-पोरींच्या सोयरिकी जुळवणे. मात्र काही म्हातारी एकदम अतरंगी असतात.

अगदी तरुण पोरं पण त्यांचा नाद करत नाहीत. तर ही म्हातारी माणस नाचायला सगळ्यात पुढे असतात. अर्धी-पावशेर टाकायची आणि वढ पाचची म्हणत असा झिंगाट होऊन डान्स करायचा की नादच खुळा… आपण फार क्वचितच वयस्कर मंडळींना डान्स करताना पाहतो. अशातच वृद्ध व्यक्तींचा एखादा डान्स व्हिडीओ समोर आल्यास तो बघता बघता इंटरनेटवर व्हायरल होतो. असाच एक व्हायरल झालेला व्हिडीओ आमच्याकडे आला. आता आम्ही अनेक डान्स बघितले पण ही असली डान्स स्टाईल कधी नाही पाहिली.

आता लग्नात डान्सचे खूप वेगवेगळे प्रकार असतात. काही ठिकाणी हळदीला डान्स केला जातो, लग्नात तर सगळीकडेच करतात आणि काही ठिकाणी वरातीत डान्स केला जातो. (ज्यांना वरात माहिती नसेल त्यांनी गावाकडे राहणाऱ्या कोणत्याही मित्राला फोन करून माहिती घ्या.) तर विषय असाय मंडळी… असाच एका लग्नातील म्हाताऱ्याच्या करामतीचा व्हिडीओ आमच्याकडे आला आणि आम्ही हसून हसून पागल झालो ना भो… या व्हिडीओत काही वाजंत्री जोरदार पद्धतीने ढोल वाजवत आहेत.

आता वाजंत्री लोकांमध्ये जो चांगला वाजवत असेल त्याचे कौतुक करायचे म्हणून आपण त्याच्या हातात, तोंडात 10 रूपयापासून तर आपली ऐपत असेल त्या प्रमाणे नोट देतो, अशी जुनी प्रथा आपल्याकडे आहे. असच या लग्नातील एका वाजंत्रीला एका म्हाताऱ्याला 10 रुपयांची नोट द्यावीशी वाटली. आता आपलं गप यावं, नोट द्यावी आणि अजून जोराने ढोल-ताशा बडवायला सांगायचा. पण म्हाताऱ्याला लै कंड होता आणि म्हातारा लै अतरंगी होता. म्हाताऱ्याने पेटी वाजवणार्याला द्यायची नोट आपल्या तोंडात धरली आणि डान्स केल्यासारख्या माकड उड्या मारत मारत पुढे निघालेला म्हातारा तोंडावर पडला.. एवढंच नाही तर पेटीवाला पण या म्हाताऱ्यामुळे तोंडावर पडला. नाचता नाचता अशी काही फजिती झाली की आपली हसून हसून पुरेवाट लागली.

हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.