Breaking News
Home / मनोरंजन / लग्नात फोटो काढण्याच्या नादात ह्या काकांनी अक्षता टाकण्याऐवजी जे केले ते पाहून हसू आवरणार नाही, बघा हा अतरंगी व्हिडीओ

लग्नात फोटो काढण्याच्या नादात ह्या काकांनी अक्षता टाकण्याऐवजी जे केले ते पाहून हसू आवरणार नाही, बघा हा अतरंगी व्हिडीओ

काका लोकं जितकं कॉमेडी असतात ना तितकं दुसरं कुणी सापडणारच नाही. त्यामुळं त्यांच्या नादी न लागलेलंच बरं.. हा आपुलकीचा सल्ला समजावा. अशा काकांना तुमच्या लग्नात जरा लांंबच ठेवा म्हटलं. कारण दुसरं तिसरं काहीही चालेल पण लग्नात खरेदी केलेल्या हजारोंच्या कपड्यांची अशी माती कुणामुळं झालेली बिलकुल आपल्याला चालायची नाही. काकांनी आपल्या या पोरांच्या लग्नाची जशी काशी केली तशी काशी बिलकुल करायची नसलं आणि करुन घ्यायची नसंलं तर अशा लोकांना लग्नात आमंत्रण द्यायला हक्कानं विसरलात, तरी ही चालेल. काका तुम्ही नंतर या असं ठोकून सांगा. तेच्यामुळं काकांनी लग्नात असले तसले प्रताप करण्यापेक्षा सुट्टीच घेतली तर बरं पडलं. आता हाच व्हीडिओ पहा ना. त्यात किती गोंधळ सुरूयं. काकांनी काय तर काकांना म्हणे फोटो काढायची एवढी हौस झालेली की आपण नवरा नवरीच्या डोक्यावर अक्षता ओततोय एवढं साध सोप कळू नये म्हणजे जरा अतीच झालं. नाही म्हणजे नवरा नवरी होते म्हणून थोडं आवरतं घेतलंंयं, लग्नात विघ्न नको म्हणून दुसरं तिसरं कुणी असतं तर त्यांनी पार धु धु धुतलंच असतं.

काकांची काशी केल्याशिवाय ती माणसं गप्प बसली नसती. काकांच्या या वागण्याचा एवढा मनस्ताप नवरा बायकोला झाला असेल त्यांनी पुन्हा कधीही या फोटो जेनिक काकाला बोलवताना दहा वेळा विचार केला असता. काकांच्या या सगळ्या गोष्टीची धमाल तितकीच होती की व्हीडीओ काढणाऱ्यानेही अगदी पार कंटेट मिळेपर्यंत शूट केलायं. त्या काकांना ‘कॉमेडी काका ऑफ द इअर’ हा किताब त्यांना द्यायला हवा. अहो काका तुम्ही एकदा नव्हे तर दोन दोनदा तीर्थाचा तांब्या त्या वधु वराच्या डोक्यावर उलटा केलायं. आणि एवढं होऊनही तुम्हाला अक्षता टाकूनच निघायचंयं म्हणजे कौन है ये लोग कहा से आते है, असं म्हणण्याची वेळ त्या भाबड्या नवरा बायकोवर आली असणार. काकांनी फोटो सेशन करुन काढता पाय घातला पण नवरा नवरीच्या लग्नाची जी काही काशी केलीयं, ती काका आयुष्यभर विसरणार नाहीयेत. फोटो काढायचा कीडा काही लोकांमध्ये इतका भिनलेला असतो ना की त्यांना इतरांच्या कॅमेऱ्यात फोटो काढायचे असतात खरे, पण त्यांना तितकीच हौस असते.

लग्न दुसऱ्याचं फोटो काढणारे तिसरेच आणि चमकोगिरी काकांना करायची. असं कसं चालेलं काका? दुसऱयांच्या चांगल्या आयुष्यात कीडे करायची सवय तुमची कधी जाणार काका, म्हणजे प्रथा परंपरा सगळं मान्य पण तिथे नको ते प्रकार करुन नवरा नवरीचं जे काही हसू करुन ठेवलंयं ना त्याला तोड नाही. काही व्यक्ती या वल्लीच असतात. त्या धांदरट असतात. पोरकटपणा जात नाही. काकांच्या आयुष्यातून वेंधळेपणा जायचं नाव घेत नाहीये. जिथं चांगलं काही सुरू असेल तिथं वाट लावायला पोहोचायचं कसं, याची पूरेपूर काळजी, अशी मंडळी घेत असतात. त्यांना पुढं काही सांगण्याची गरज नसते. आता मारू तरी कसा, अशा लोकाना कारण पाहूणे पण आपलेच असतात. नवरीकडचे असो वा नवऱ्या कडचे अशा लोकांना मारुन आपलीच इभ्रत बाहेर निघायची म्हणूनच काकांच्या या सगळ्या माकडचाळ्यांवर गप्प बसली. रंग मे भंग म्हणतात तसं काकांना आपल्या शुभकार्यात गोंधळ घालून ठेवला होता. नाही म्हणजे काकांना एक विचारलं असतं आपण की तुम्हाला फोटो काढून सिद्ध काय करायचंयं, की मी लग्नाला आलो होतो की मी आहेर देऊन गेलो होतो. आता तेही सांगण्याची गरज नाहीये. कारण नवरा नवरी बिच्चारे आयुष्यभर या गोष्टी विसरणार नाहीत.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *