Breaking News
Home / माहिती / लग्नात मुंडावळ्या आणि बाशिंग का बांधले जाते, बघा काय असू शकते ह्या मागचे कारण

लग्नात मुंडावळ्या आणि बाशिंग का बांधले जाते, बघा काय असू शकते ह्या मागचे कारण

महाराष्ट्रात अनलॉक ची सुरुवात झाली आणि काही काळाने लग्न समारंभांना परवानगी देण्यात आली. यात ज्यांची ज्यांची लग्न, लॉकडाऊन मुळे पुढे गेली होती त्यांनी झटपट ती लग्न उरकून घेतली. त्यात ५० पाहुण्यांनाच आमंत्रण देण्यास सांगण्यात आलं. यावरून काहींनी रुसवे फुगवे धरले तर काहींनी त्यावर विनोद केले. कारण काहीही असो, लग्नसोहळे हे पुन्हा एकदा चर्चेचा विषय झाले. एवढंच नव्हे तर बरेच वर्ष लग्न करणार नाही म्हणणार्यांनी सुद्धा लग्नाच्या बोहल्यावर चढणं पसंत केलं. त्यात मराठी सेलिब्रिटीजपैकी अनेकांनी या काळात लग्नगाठ बांधली. काही सेलिब्रिटीज येत्या काळात ही लग्नगाठ बांधतील.

ही लग्नगाठ बांधली जात असताना सगळे विधी वेळेवर आणि रितीनुसार होणं याला अनन्यसाधारण महत्व असतं. तसेच प्रत्येक कुटुंबाच्या पद्धतीनुसार हे विधी करण्याची पद्धत बदलत असते. पण यात काही गोष्टी मात्र बऱ्याच वेळेस तशाच असतात. मग त्यात काही विधी, मंगलाष्टके, मानपान आणि बऱ्याच गोष्टी. यातील एक गोष्ट म्हणजे मुंडावळ्या किंवा बाशिंग. संपूर्ण भारतवर्षात होणाऱ्या विविध लग्नांमध्ये मुंडावळ्या किंवा बाशिंग बांधलेले पहावयास मिळतात. बरं त्यातही एवढे प्रकार की एखाद्या साध्या वाटणाऱ्या गोष्टीचे एवढे प्रकार असतील, असं सहसा वाटत नाही. पण अर्थात केवळ एकदाच वापरली जाणारी ही वस्तू खास असायलाच हवी ना. त्यामुळे अगदी नैसर्गिक फुलांपासून ते रेडिमेड गोष्टींचा वापर करून बाशिंग बनवले जातात. पण कधी विचार केला आहे का की असे हे बाशिंग का बरं बांधत असतील? त्यात दोन मतप्रवाह दिसून येतात. पहिला म्हणजे लग्नसमारंभ म्हटलं कि डोक्यावर थोडा का होईना पण ताण निर्माण होतो. वेगवेगळ्या विधी आणि त्यासाठी होणारी धावपळ ह्यामुळे वधू वर ह्यांना पुरेशी झोपही मिळत नाही. त्यामुळे लग्नसराईत वधू वर हे थकलेले असतात. पण त्यामुळे त्यांना थकवा अथवा ग्लानी येऊ नये, काही शारीरिक अडचणी येऊ नये म्हणून हे बाशिंग बांधले जात असावेत. कारण बाशिंग कपाळावर बांधल्यामुळे कपाळातील आतील भागांत असलेल्या नसांवर विशिष्ट दाब पडतो, त्यामुळे जागरणामुळे झालेल्या त्रासापासून अराम मिळतो आणि कार्य सुरळीतपणे पार पडते.

तर दुसरा मतप्रवाह हा त्या बाशिंगांच्या दिसण्यावर लक्ष केंदित करतो. बाशिंग बांधले असता अर्थातच लग्नमंडपात अथवा वरातीत नवरा मुलगा आणि नवरी मुलगी उठून दिसतात. त्यांच्या आयुष्यातील महत्वाचा दिवस आणि त्यातील त्यांची उपस्थिती अधोरेखित करावी हा त्याचा उद्देश असू शकतो हा एक मतप्रवाह आहे. यापेक्षाही विविध मतं, चालीरीती आणि सबळ कारणं असू शकतात. आमच्या मराठी गप्पाच्या टीमने आम्हाला योग्य मांडणारी मतं व्यक्त केली आहेत. त्यात चुकीचे समज पसरवणे हा उद्देश नाही. मराठी गप्पावर तुम्हाला अशा वैविध्यपूर्ण विषयांवर लेख उपलब्ध होतील. त्यात प्रामुख्याने गेल्या काही काळात विविध सेलिब्रिटीज यांनी केलेल्या साखरपुड्याच्या, लग्नाच्या बातम्या असलेले लेख आपल्याला वाचायला मिळतील. आपल्याला हे लेख वाचायचे असल्यास वर उपलब्ध असलेल्या सर्च ऑप्शनचा वापर करा. त्यात लग्न असं लिहून सर्च केल्यास आमच्या टीमने केलेले लेख आपल्याला वाचायला मिळतील. तसेच वाचनासोबत व्हिडियोज पाहायला आवडत असतील तर आमचे वायरल व्हिडियोज विषयीचे लेख नक्की वाचा. त्यासाठी सर्च ऑप्शन मध्ये जाऊन वायरल असं लिहून सर्च करा. नवनवीन लेख आपल्याला उपलब्ध होतील. आपल्या वेळेसाठी धन्यवाद !

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.