Breaking News
Home / मनोरंजन / लग्नात मित्रांमुळे नवरदेव तोंडावर आपटला, पाहुन तुम्हीदेखील हसू आवरणार नाही

लग्नात मित्रांमुळे नवरदेव तोंडावर आपटला, पाहुन तुम्हीदेखील हसू आवरणार नाही

मित्र हे नालायकचं असतात. त्यांना लग्नात बोलवा पण लग्न मंडपापासून थोडंंसं लांबच ठेवा. त्यांच्या या सगळ्या गोंधळात तुमचं नाही हसं करुन ठेवलं ना तर माझं नाव लेखक म्हणून लावणार नाही. पोरांना काय द्यायचं ते द्या लग्नात काही कमी पडायला देऊ नका, पण तो मुलगी वरमाला घालत असता कुणाला उचला उचली करायचला लावू नका. हार घाला मोकळे व्हा बाजूला व्हा. सगळं कसं पद्धतशीर व्हायला हवं. कोण मोठं कोण मोठं या स्पर्धेत असे घोळ व्हायला होतात की पुन्हा असली फजिती होते ना ती आयुष्यभरासाठी लक्षात राहते. आता याच नवरदेवाचं पहा ना. लग्न ठरलं. साखरपुडा झाला. हळदही झाली. मित्रांनी हळदीत नाचून चांगल्या पैकी घराला बार बनवून टाकलंही. त्यांच्या या सगळ्या बाबतीत म्हणायचं झालं तर कुणाची कसलीही इच्छा बाकी ठेवलेली नाही. आता लग्न म्हटलं की पोरांची इच्छा मारायची नसते, नाहीतर लग्न घरात ते लोकं कामं करतचं नाहीत. त्यांच्या सगळ्या गोष्टी पूर्ण करा त्यांना वेळेत काय हवं नको ते द्यायला लागा.

त्यांना सगळं समजवून सांगा की बाबा आता सगळं तुझं भागवलंयं आता तरी लग्नात लक्षं दे नाहीतर काही तर रुसुन बसणारी मंडळीच भरपूर असतात. त्यांच्या या सगळ्या गोष्टी गावगप्पांमध्ये लग्न कार्य राहतं बाजूला. म्हणून पोरांची सगळी हौसमौज पुरवून घ्या नातेवाईकांमध्ये आत्या काकी मामा मामी यांच्याकडे नाही बघितलात तरीही चालेल कारण त्यांना देऊनही रडणारच, नाही दिलं तरीही रडणारच. कशाला पाहिजे असले लोकं त्यांना लाबंच ठेवलेलं बरं असतंयं. त्यामुळं सांगतो त्यांच्या या सगळ्या गोष्टींमध्ये गावगप्पांमध्ये पडायचं नाही. आता या पोरांनं बघा नवरदेवाचा असला बदला घेतलाय ना की तो त्याला आयुष्यभर लक्षात राहण्यासारखं आहे. त्यांच्या या सगळ्या भांडणामध्ये एक गोष्टीची कायमची भर पडली ती म्हणजे नवऱ्याला आयुष्य़भराचीू अद्दल त्यांनी घडवलीयं. मी आधीच सांगितलं होतं नवऱ्यानं किंवा नवरीनं कायमचा आपल्या लग्नमंडपापासून कायमच मित्रमंडळींना आणि धांदरटांना दूर ठेवायचं नाहीतर असं तोंडावर पडायची वेळ येते. आपली इज्जत जाते ती वेगळी आणि समोर आपणच पैसे देऊन उभे केलेल्या व्हीडिओग्राफरच्या कॅमेऱ्यात आपणच तोंडावर पडलेले कैद होतो. आणि चुकून माकून तुम्ही जर त्याचे पैसे रोखले असतील तर त्यानं तुमच्या या व्हीडिओला गावभर म्हणजे इंटरनेटच्या गावभर व्हायरल केलं म्हणून समजून जावा.

तर सदर व्हिडीओमध्ये नवरदेवाच्या मित्रांनी असं काही केलं कि, बिचार्या नवरदेवावर तोंडावर आपटायची वेळ आली. लग्न लागलं आणि नवरीमुलगी नवरदेवाला वरमाला घालणारच होती. परंतु बोलतात मित्र नेहमी अश्या कामगिरीमध्ये अतरंगीगिरी करतातच. त्यांनी लगोलग नवरदेवाला उचललं. आता काही नवरीमुलगी सहज वरमाला घालणार नाही असा मित्रांचा गोड गैरसमज झाला. परंतु पुढच्याच क्षणी हा गैरसमज फेल ठरला. असं काही घडलं कि बिचारा नवरदेव काहीही चूक नसताना सुद्धा तोंडावर आपटला आणि सर्वांसमोर त्याचं हसू सुद्धा झालं. आता हा बदला नवरदेव त्याच्या ह्या मित्रांच्या लग्नात घेणार हे तर नक्की आहे. बाकी असं काय घडलं ज्यामुळे नवरदेवावर हि परिस्थिती उद्भवली हे तुम्हांला व्हिडीओ पाहिल्यावर कळेलच. बाकी व्हिडीओ कसा वाटलं ते तुम्ही कमेंट मध्ये नक्की कळवा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.