Breaking News
Home / मनोरंजन / लग्नात मित्राने दिलेले हे अतरंगी गिफ्ट पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

लग्नात मित्राने दिलेले हे अतरंगी गिफ्ट पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

मित्र मैत्रिणी अतरंगी असतील तर आपलं आयुष्य सतरंगी झालंच म्हणून समजा. तुम्हालाही पटलं असेलच आणि आपापले अतरंगी यार दोस्त आठवले असतील. कारण हेच आमच्या बाबतीत झालं जेव्हा आम्ही एक व्हिडियो बघितला. तुम्हाला तर कल्पना आहेच की लग्नाचे व्हिडियोज किती वायरल होत असतात ते. असाच एका व्हिडियो बघताना दुसरा एक व्हिडियो बघण्यात आला. आणि नंतर जी काही धमाल आली ना, त्यास तोड नाही. पाच मिनिटांचा हा व्हिडियो पुन्हा पुन्हा करता आम्ही निदान तीन वेळा बघितला. एकदा बघून कळला होता पण मन भरण्यासाठी तीन वेळा बघितला. म्हंटलं आपल्या वाचकांनाही याविषयी माहिती द्यावी. चला तर जाणून घेऊयात.

लग्नात आपले जिगरी मित्र आले की त्यांच्याकडून मिळणारा आहेर हा काय असेल याचा नेम नसतो. पूर्वी तांब्या, कळशी, भांडी असायची. हल्ली एकेक अतरंगी आहेर देण्याकडे मित्र मैत्रिणींचा कल असतो. हा व्हिडियो तर अख्खा त्यावरच आधारित आहे. होतं असं की एका जोडप्याच्या लग्नाचे रिसेप्शन चालू असते. नवरा नवरी दोघेही तयार होऊन बसलेले असतात. मग काय नवऱ्याचे एकेक मित्र येण्यास सुरवात होते आणि धमाल सुरू होते.

पहिला मित्र येतो. नवरा त्याची ओळख नववधूशी करून देतो. तोपर्यंत ती शांत शांत असते. कदाचित लग्नाचं दडपण असेल. नवरा ही तसाच शांत भासतो. पण काही क्षणच. कारण या दोघांना आहेर दिल्यावर हा पहिला मित्र त्यांना आहेर उघडून बघायला सांगतो. नवरोबाच्या मनात काय होणार आहे याचे पडसाद उमटू लागलेले असतात. पण नवरी अनभिज्ञ असते. पण जेव्हा तो आहेर उघडून होतो तेव्हा मात्र नवरा हसायला लागतो आणि नववधू तर तोंडावर हात घेऊन हसत असते. हा आहेर म्हणजे एक खेळणं असतं. ड्रम वाजवणारा एक कार्टून. हा आहेर बघून सगळेच हसायला लागतात. बरं एवढ्यावर भागावं तर नाही. हा मित्र या आहेरासोबत फोटो ही काढून घेतो. मग येतो दुसरा मित्र. त्याचीही ओळख नववधूला करून दिली जाते. पण एव्हाना या जोडप्याला कळलेलं असतं – मित्रांनी ठरवून आहेर आणले।आहेत. त्यांचा अंदाज खराही ठरतो. हा आहेर असतो – लहान मुलांची दुधाची बाटली. समझनेवाले को इशारा काफी होता है म्हणतात. कॅमेऱ्यामागून सगळे उपस्थित या घटनेची मजा घेत असतात तर तिथे नववधू आणि नवरा लाजून चुर झालेले असतात. काय म्हणावं मित्रांना. पण मंडळी वर उल्लेख केला ना, की मित्र अतरंगी असले तर आयुष्य सतरंगी होऊन जातं. इथेही तेच होतं.

दोन आहेरांमुळे एवढी मजा येते. अजून पाच आहेर येणं बाकी असतं. तिसरा आहेर येतो तेव्हा तर हसून हसून सगळयांची मुरुकुटी वळलेली असते. तो असतो कपडे धुण्याचा ढोका. नवरदेव ही एवढा हसत असतो की हसता हसता त्याच ढोक्याने मित्राला मस्करीत फटका मारायला जातो. मग चौथा आहेर म्हणजे चिमटा असतो. आहेरात ही चिमटा आणि गंमतीदार चिमटा ही. मग जो आहेर येतो त्याने पुन्हा एकदा हास्याचे फवारे फुटतात. हा आहेर असतो – लाटणं. वर्षानुवर्ष ज्याचा वापर काही वेळेस बायकांकडून पतीला वठणीवर आणायला केला गेला आहे असं हे लाटणं. मग येणारे दोन आहेर घेऊन येतात आधीचेच मित्र. त्यात असते लहान मुलीची बॅग आणि केसांचा कंगवा. या दोहोंमुळे हे सतरंगी आहेर प्रकरण काहीसं थांबत. काहीसं म्हणण्याचं कारण अजून बरेच आहेर बाकी असतात. पण इतर उपस्थितांचा खोळंबा होऊ नये म्हणून मग सगळी मित्र मंडळी एकत्र येतात आणि एक ग्रुप फोटोसेशन होणार असताना हा व्हिडियो संपतो.

या व्हिडियोची खासियत अशी की सुरुवातीला हा व्हिडियो थोडा जास्त वेगात बघायला मिळतो आणि नंतर नेहमीच्या वेगाने. आपण जर हा व्हिडियो बघितला असेल तर ही बाब आपल्या नजरेतून सुटली नसेल. बघितला नसेल, तर नक्की बघा. तसेच आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपणास आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच आपल्यासाठी विविध विषयांवरील लेख घेऊन येत असते. त्यासाठी आपण दिलेले अभिप्राय आणि सकारात्मक सूचना यांचा आम्हाला खूप उपयोग होतो. तेव्हा आपले हे अभिप्राय आणि सूचना आम्हाला कमेंट्स मधून कळवत राहा. आमचे लेख वाचत राहा, आनंद लुटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *