आपण अनेकवेळा प्रेम कहाण्या ऐकणं किंवा जाणून घेणं पसंत करतो. अनेकवेळा त्यात प्रथमतः मैत्री होणं, मग तिचं रूपांतर प्रेमात होणं आणि यथावकाश त्याचं लग्नात रूपांतर होणं असा एक समान धागा असतो. पण हा समान धागा कितीही साधा सोप्पा दिसत असला तरी तो तसा नसतो. कारण प्रत्येक टप्प्यावर त्या त्या कहाणीतील जोडीला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलेलं असतं. काही वेळा ही आव्हानं अगदी आपल्या मनाचा आणि आपल्या जोडीतील सामंजस्याचा कस बघणारी असतात. इतकी की जेव्हा लग्न होतं तेव्हा जे समाधान आपल्याला लाभते त्याची तुलना इतर कशाशी ही करू शकत नाही आणि मग एका क्षणी आपल्या भावनांचा बांध फुटतो आणि अश्रू बाहेर येतात. अर्थातच ते आनंदाश्रू असतात हे काही वेगळं सांगायला नको. आज हे सगळं सांगायचं कारण म्हणजे आपल्या टीमने बघितलेला एक व्हिडियो होय. हा व्हिडियो काही काळापूर्वीचा आहे. पण आज काही निमित्ताने या व्हिडियोला पाहता आलं. त्यातील भावना अस्सल वाटल्या आणि म्हंटलं आपल्या वाचकांना याविषयी सांगायला हवं. त्यातूनच आजचा हा लेख आकारास येतो आहे. हा व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला लग्नाचा मंच दिसून येतो.
मंचावर उत्तम पोशाखातले वधू वर, कॅमेरामन आणि इतर काही जण असतात. एव्हाना बाकी सगळे विधी झाले असावेत असं आपल्याला गृहीत धरायला हरकत नाही. कारण एव्हाना एकमेकांना हार घालण्याची वेळ झालेली असते. त्यात वधू नवरदेवाला हार घालते. या दरम्यान आपलं लक्ष एक गाणं वेधून घेत असत. ‘मिले हो तुम हमको बडी नसिबों से’ हे नेहा कक्कर यांचं गाणं वाजत असतं. त्यांचा आवाज आणि या गाण्यातील तन्मयता कोणाच्याही भावनांना हात घालते. आज हीच बाब नवरदेवाच्या बाबतीत होते. खरं तर नवरीने हार घातल्या नंतर त्याला तसाही हार घालायला थोडा वेळ लागतो. तेव्हाच जाणवतं की आता बहुतेक हा रडू लागेल बहुतेक आणि तसच होतं. तो त्या नवरीच्या गळ्यात हार घालतो आणि त्याला राहवत नाही. तो रडत रडत तिला मिठी मारतो. तिचीही अवस्था फार वेगळी नसते. तिलाही भावना अनावर झालेल्या असतात. पण ती त्या मानाने लवकर सावरते. तसेच यात कौतुक करावंसं वाटतं ते तेथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचं ! या जोडीची कहाणी काय आहे हे आपल्याला काही कळत नाही. पण बाकीच्यांना त्याची कल्पना असावी अस जाणवतं. कारण सगळेच जण त्यांना टाळ्या वाजवून प्रोत्साहन देताना दिसतात.
कारण काहीही असो पण त्याचं नातं हे किती भक्कम आहे हेच हा प्रसंग दाखवतो. त्यामुळे त्यांच्या प्रेम कहाणीविषयी अनभिज्ञता असली तरी हे क्षण आवडून जातात. किंबहुना हेच क्षण आमच्या टीमच्या मनाला ही भिडले. कारण शेवटी सगळेच जण कधी ना कधी प्रेम करतात. काहींना त्यात यश मिळतं आणि काहींना एक आयुष्यभराची एक आठवण. पण त्याचमुळे जेव्हा एखाद्या जोडीला अगदी प्रेमाने एकत्र बघितलं की आमचं मन भरून येतं. मनापासून आपसूक अनेक आशिर्वाद आणि शुभेच्छा या जोड्यांना दिल्या जातात. पण काही वेळा हा आनंद केवळ आपल्या पुरता ठेवून उपयोगाचा नसतो. हा आनंद प्रत्येकासोबत शेअर करणं आवश्यक वाटतं.
याच भावनेतून आज आपल्या टीमने हा लेख लिहिला आहे. आज ही जोडी कुठे असेल माहीत नाही. पण आपल्या टीमकडून त्यांना त्यांच्या पूढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा ! चला तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :