Breaking News
Home / मनोरंजन / लग्नात वरमाला घालतेवेळी नवरीकडून झाली चूक, बघा नवऱ्याने रागाने काय केले ते

लग्नात वरमाला घालतेवेळी नवरीकडून झाली चूक, बघा नवऱ्याने रागाने काय केले ते

इंटरनेटवर आजकाल सगळ्याच प्रकारचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात. त्यातच नवरा-नवरीचे व्हिडीओही चांगलेच पाहिले जातात, त्यामुळे लग्नातील काहीही किस्सा जेव्हा शेअर केला जातो, तेव्हा तो लगेच व्हायरल होतो. सोशल मीडियावर लग्नातील व्हिडीओ अनेकदा व्हायरल होताना दिसतात. यामधील काही व्हिडीओंमध्ये लग्नातील धम्माल, मस्ती, गाणी, डान्स वगैरे पाहायला मिळते तर काही व्हिडीओ हे गंभीर स्वरुपाचे असतात. लग्नातील एखाद्या अपघाताचे वगैरे. परंतु सध्या एक वेगळाच व्हिडीओ चर्चेत आहे. हा व्हिडीओ पाहून हसावं की रडावं हेच तुम्हाला कळणार नाही. कारण भर लग्नात नवरा-नवरी स्टेजवरच आपापसात भिडताना दिसले. भिडताना दिसले म्हणजे त्यांनी काही भांडणं वगैरे केली नाहीत पण जे काही घडलं ते पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. सर्वसाधारणपणे काय होतं ना… बाकी कुणी असो व नसो पण लग्नावेळी वधू आणि वर बोले तो नवरा आणि नवरदेव दोघेही आनंदात असतात, नवीन आयुष्याची ती एक सुरुवात असते. दोघेही आनंदाने सगळ्या गोष्टींना सामोरे जाणार असतात, एकत्र आयुष्य काढणार असतात. स्वतःच्या लग्नात कुठलाही माणूस असू द्या… तो आनंदी असतोच असतो.

मात्र, सगळ्याच लग्नांमध्ये हे होताना दिसत नाही. काही काही लग्नामध्ये इतरही गोष्टी घडतात ज्यामुळे नवरा नवरीसह सगळ्या पाहुण्यांना लग्न लक्षात राहत. आज आमच्या टीमच्या हाती एक असा व्हिडीओ आलेला आहे, ज्या व्हिडीओमध्ये नवरा मुलगा चिडलेला दिसतो आहे, नवरीचा चेहराही रागातच दिसतो आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालेला आहे. अजून या व्हिडीओतील नवरा-नवरीच्या संसाराला सुरुवात पण झालेली नाही तरीच त्यांच्यात रुसवे फुगवे चालू आहेत. आणि हे सगळं लोकांसमोर घडत असल्याने लोकांनाही या गोष्टीचे आश्चर्य वाटत आहे. पण जेवून खाऊन झाल्यावर लग्न मंडपाच्या बाहेर गेल्यावर लोक या नवरदेव-नवरीच्या फजिती उडवणार हे नक्कीच. आता हा व्हिडीओ नेमका काय व्हायरल झाला? नवऱ्याला नवरीच्या आणि नवरीला नवऱ्याचा एवढा राग का आला? हेही जाणून घेऊयात. तर घडलं असं की, लग्न लागलं ब्राम्हणाने वधू वरांना एकमेकांना पुष्पहार घालायला लावले.

नवरीने आधी हार घातला मात्र तो नवऱ्याच्या गळ्यात व्यवस्थित पडला नाही. त्यानंतर रागावलेल्या नवऱ्याने तर त्याच्या पुढची स्टेप घेतली आणि नवरीला पण त्याच पद्धतीने हार घातला. यावर नवरी काही बोलली नाही पण रागावलेला नवरा आणि फुगलेली नवरी एकमेकांवर धुसफूस करत होते. आजूबाजूचे लोक त्या दोघांना पण समजावत आहेत, मात्र नवरा नवरी काही ऐकायला तयार नाहीत, अशी एकूण परिस्थिती तिथे घडली.

आता या सगळ्या प्रकरणात चूक कुणाची आहे, हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला व्हिडीओ बघावाच लागणार ना भाऊ… हा व्हिडिओ गेल्या काही दिवसांपूर्वी खूप व्हायरल झाला होता. त्यावर अगदी लोकांनी जबरदस्तीने लग्न लावून देताहेत का? अशाही कमेंट्स केल्या होत्या. मात्र या सगळ्यात एक गोष्ट घडली ते म्हणजे लोकांनी हा व्हिडिओ खूप एंजॉय केला. आता हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *