Breaking News
Home / मनोरंजन / लग्नामध्ये आता हेच बघायचं राहिलं होतं, महिलांच्या पंगतीतला हा व्हिडीओ पाहून तुमचा देखील विश्वास बसणार नाही

लग्नामध्ये आता हेच बघायचं राहिलं होतं, महिलांच्या पंगतीतला हा व्हिडीओ पाहून तुमचा देखील विश्वास बसणार नाही

लग्न म्हणजे राडा, धिंगाणा… चूकून झालेली मजा आणि जाणीवपूर्वक केलेली मस्ती… असं सगळं काही लग्नात होतं. कुणाच्या मागे जेवणाचा राडा असतो तर कुणाचा डोळा आहेराच्या डब्यावर असतो. लग्नात 2-3 वेळा अशा असतात की, तिथे गंमत होणार, हे निश्चित असते. पहिलं म्हणजे लग्नाची नवरदेवाची वरात. दुसरं म्हणजे लग्न लावताना नवरा-नवरीला उचलणे आणि इतरांच्या तोंडावर अक्षदा मारणे. आणि तिसरे म्हणजे गिफ्ट देण्याची वेळ. अशात काही लोकांची नजर जेवणावर असते. लग्नाला आल्या आल्या ते आचारी कुठे आहेत, काय काय तयारी झाली आहे, नेमका बेत काय आहे, हे यानिमित्ताने जाणून घ्यायचे असते. तर नवरदेवाचे मित्र वेगळ्याच टेन्शनमध्ये असतात. त्यांना दारूची सोय करायची असते. आहेर गोळा करणाऱ्या आणि माईकवर नको तितकी बडबड करणाऱ्या माणसाचा तर एक वेगळाच swag असतो. नवऱ्याकडचा आहेर मंडपाच्या उजव्या बाजूला स्वीकारला जाईल, नवरीकडचा आहेर मंडपाच्या डाव्या बाजूला स्वीकारला जाईल, असं माईकवर मपथ्य कोकलून सांगणारा माणूस कुठून बोलतो आहे, याचा नेमका अंदाज वराडी मंडळींना लवकर येत नाही.

लग्न लागल्यापासून तर शेवटची पंगत उठेपर्यंत हा माणूस आहेर देण्याविषयी माईकवरून कोकलत असतो. मधल्या काळात “आहेर स्वीकारले जाणार नाहीत” अशी टीप असायची. लग्न लागल्यावर हा माणूस पंगती कशा बसतील, हे सांगत असतो. मात्र इकडे लोकं तोपर्यंत जेवायला बसलेले असतात. काही लोक जेवताना पण आपली बाटली खिशात घेऊन बसलेले असतात. कुणी आपल्याकडे बघत नाहीये ना… हे चेक करून ते पटकन एक घोट मारून घेतात. मात्र आज सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ आला आहे, ज्यात पंगतीला जे जे लोक पितात त्यांना बियरची बॉटल देण्यात आलेली आहे. फक्त पुरुष मंडळींना नाही तर चक्क महिला मंडळी सुद्धा दा’रू पिण्यात पुढे आहेत. त्याही मस्त पैकी जेवणाच्या ताटाशेजारी बियरची बॉटल घेऊज बसल्या आहेत. खरं तर दा’रू वगैरे असे चित्र आपल्याला श्रीमंत लग्नात दिसतात. पण आजच्या या व्हायरल व्हिडीओत अगदी सर्वसामान्य लग्न आहे आणि त्यात असा सार्वजनिक रित्या दा’रू पिण्याचा कार्यक्रम चालू आहे.

सर्वसामान्य माणूस मजा करत नाही, 4 लोकांमध्ये काही वेगळी गोष्ट करायची असल्यास तो लाजतो, असे म्हटले जाते. पण या व्हिडीओत ज्या पद्धतीने सगळ्या पारंपरिक समज आणि गोष्टींना छेद देत दा’रू पिणे चालू आहे, हे खरं तर आश्चर्यकारक आहे. हा व्हिडीओ अनेकांना झोंबला असेल. असे कुठं असतं का? सार्वजनिक रि’त्या दारू कुणी पीत का? असे अनेक प्रश्न लोक उपस्थित करतील.

पण एक लक्षात घ्या… आपल्या आयुष्य आपण कस जगायचं? कशी मजा घ्यायची हे आपण ठरवायचं असतं. तुम्ही कितीही चांगले वागले तरी लोकांना काही ना काही खटकत असते. त्यामुळे जे आपल्या मनाला पटतंय तेच करा. लोकांचं काय.. कुछ तो लोग कहेंगे, लोगो का काम है कहना… आता हा व्हिडीओ तुमचंही मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *