Breaking News
Home / मनोरंजन / लग्नामध्ये आहेर दिल्यानंतर ग्रुप फोटो काढत असताना नवरीच्या नातेवाईकाने जो कहर केला ते पाहून हसू आवरणार नाही

लग्नामध्ये आहेर दिल्यानंतर ग्रुप फोटो काढत असताना नवरीच्या नातेवाईकाने जो कहर केला ते पाहून हसू आवरणार नाही

भारतात लग्नाचा सिझन आला की लोक मस्ती करण्यासाठी अतिशय उतावळे होतात. सजणं, मनसोक्त खाणं आणि भरभरून नाचणं, असं अनेकांचं प्लॅनिंग असतं. लग्नाच्या सिझनमध्ये आपली ही हौस पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न अनेकजण करत असतात. मग हे सगळं करताना आपलं हसू झालं, तरीही अनेकांना याची पर्वा नसते. त्यांना फक्त मनसोक्त मजा घ्यायची असते. खरं पाहिलं तर भारतीय विवाहसोहळे रंग, परंपरा, प्रेम, संगीत अशा विविध गोष्टींनी परिपूर्ण असतात. लग्नाचा दिवस कुटुंब आणि पाहुण्यांसाठी खरोखर आनंददायी असतो. आनंदाच्या प्रसंगी केवळ कुटुंबातील सदस्यच नाही तर मित्रमंडळी देखील पार्टीत सहभागी होतात.

कोणत्याही लग्नात डान्स नसेल तर मजा येत नाही, असं म्हटलं जातं. लग्नात मोकळेपणाने डान्स करायला सर्वांनाच आवडतं. भारतात दररोज शेकडो विवाहसोहळे होतात आणि सोशल मीडियावर याचे निरनिराळे व्हिडिओ व्हायरल होत राहततात. सध्या मात्र लग्नातील एक एकदम भारी आणि मनसोक्तपणे खळखळून हसायला लावणारा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओत नवरीच्या जवळच्या नातेवाईकाने असा काही डान्स केला आहे, तो पाहून तुम्हीही हसाल.

भारतातील लोकांना संगीत ऐकू आलं की त्यांचे पाय थिरकायला लागतात असं म्हटलं जातं. मग भारतातील लग्नसोहळा हा डान्सशिवाय कसा संपन्न होणार. लग्न कोणाचं पण असो आणि कधी पण खास डान्ससाठी एक सोहळा असतो. आजकालच्या लग्नात वधू-वरसोबत कुटुंबातील इतर सदस्य पण आपला जलवा दाखवतात. या खास संगीत कार्यक्रमासाठी वधू-वर, नातेवाईक कोरियोग्राफर बोलून डान्स शिकतात आणि मग स्टेवर परफॉर्म करतात. आपण सोशल मीडियावर असे जबरदस्त डान्सचे व्हिडीओ पाहिले आहेत. असाच एक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूबवरही शेअर करण्यात आला आहे. या व्हायरल व्हिडीओत आपल्याला दिसून येईल की, नवरा – नवरीसोबत फोटो काढण्यासाठी काही नातेवाईक स्टेजवर गेले आहेत. मात्र बरोबर नवरी आणि नवऱ्याच्या मध्ये थांबलेल्या एका नातेवाईकाला गाणे ऐकू येताच तो स्टेजवरच डान्स करायला सुरू करतो. बाकीचे नातेवाईक त्याला थांबवण्यासाठी प्रयत्न करतात पण हा भाऊ ऐकतच नाही. 1-2 वेळा मध्ये थांबल्यासारखे करतो पण पुन्हा नाचायला सुरू करतो.

नवरीला जरा लाजल्यासारखे होते नवरा मात्र हसत असतो. पुढे काय काय धमाल होते, हे तुम्हाला व्हिडीओ पाहून कळेलच. या नातेवाईकाला नाचण्याची हौस आहेच पण त्याचा अतरंगी डान्स पाहूनच समजतं की या लग्नातील स्टेजवर डान्स करण्यामागे त्याचा नेमका उद्देश काय आहे. या नाचणाऱ्या काकांना आपला जबरदस्त डान्स सादर करून लग्नाचे स्टेज अगदी डान्स फ्लोअर करून तिथे जलवा करायचा होता.

पाहुण्यांनी पूर्णपणे भरलेल्या या काकांना भर स्टेजवर आपला डान्स सर्वांना दाखवायचा होता. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला आपल्या टॅलेंटनं प्रभावित करणं, हा त्यांचा उद्देश होता. पण खरं म्हणजे हे काका याच कारणाने खूप व्हायरल झाले आहेत. हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.