Breaking News
Home / मनोरंजन / लग्नामध्ये नवरदेवाच्या मित्रांनी भर मंडपातच सर्वांसमोर केला अतरंगी डान्स, पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल

लग्नामध्ये नवरदेवाच्या मित्रांनी भर मंडपातच सर्वांसमोर केला अतरंगी डान्स, पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल

सध्याचं वातावरण काहीसं वेगळंच झालंय. कधी थंडी तर कधी अवेळी पाऊस. त्यामुळे कधी कधी सकाळी सकाळी मुंबईत जागं झालं तरी महाबळेश्वरला आल्याचा भास अनेकांना गेल्या काही दिवसांत झाला असेलच. आम्हालाही झालाच. पण या सगळ्या वातावरणात एका गोष्टीने मात्र वातावरण अगदीच गरम ठेवलं आहे. ही गोष्ट म्हणजे आपल्या आजूबाजूला होणारे लग्न सोहळे. धडाधड म्हणावेत अशा पद्ध्तीने लग्न होताना आपण बघतो आहोत. त्यामुळे प्रत्येक आठवड्यात निदान एकदा तरी एखाद्या ओळखीच्या माणसाचं लग्न हे असतंच असतं.

बरं आपल्याला जमेल तसे आपण लग्न समारंभांना उपस्थित राहत असतोच असतो. याचं कारण हल्लीच्या काळात आमंत्रण मिळणं म्हणजे तसं प्रत्येकालाच मिळतं अस नाही. त्यामुळे एकतर आपल्याला आमंत्रण असेल तर आपण त्याचा मान राखायला हवा. तसेच दुसरी गोष्ट म्हणजे यानिमित्ताने नेहमीच्या दगदगीच्या आयुष्यातून थोडा वेगळा वेळ मिळतो. थोडी धावपळ होते पण एकदा का त्या वातावरणात गेलं की सगळं विसरायला होतं. त्यात लग्नसोहळे म्हणजे एकापेक्षा एक किस्से आणि मनोरंजन यांनी परिपूर्ण अशी जागा असते. त्यात नवरा नवरीवाले जर मजा मस्ती करणारे असतील तर बघायलाच नको.

मग काय डीजे असतोच असतो आणि डान्स फ्लोअर सुदधा असतो. त्यात अजून डान्स दिवाने असतील तर डान्स सादर करणार्यांना ही निमंत्रण हे असतंच. मग हे प्रोफेशनल डान्सर्स आले की अजून मजा येते. कारण त्यांना जसा डान्स करता येतो तसंच आपल्या परीने मनोरंजन ही करता येतं. त्यामुळे उपस्थितांना ही मजा वाटतेच. एवढंच काय पण हा डान्स परफॉर्मन्स कोणी रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला की अजून धमाल येते. अशीच धमाल आज आपल्या टीमने अनुभवली. Step Up अशा नावाने युट्युब चॅनेल असणाऱ्या एका डान्स ग्रुपचा एक जुना व्हिडियो बघण्यात आला. बरं जुना असला तरी जबरदस्त वायरल झालेला असा हा व्हिडियो आहे. आठ लाखांच्या आसपास व्ह्यूज या व्हिडियोने मिळवले आहेत. म्हंटलं आपणही हा व्हिडियो पाहुच. आणि तेच बरं झालं. कारण यातील परफॉर्मन्स बघून आम्हाला खूप मजा आली. या ग्रुपने हा मस्तीभरा परफॉर्मन्स देताना बी बॉइंग हा डान्स प्रकार वापरल्याचं प्रथमदर्शनी दिसून येतं. यात सगळे सहभागी मुलं एकेक करून येतात आणि त्यांच्या आवडत्या डान्स मुव्ह्ज करून दाखवतात. बरं या डान्स मुव्ह्ज दाखवताना आधीच्या व्यक्तीने केलेल्या डान्स पेक्षा त्या उजव्या असाव्यात हा ही कल असतोच.

त्यामुळे हा परफॉर्मन्स उत्तरोत्तर बहरत जातो. पण आपण असे परफॉर्मन्स हे सहसा डान्स शोज आणि रियालिटी शोज मधून तर कधी कधी पुरस्कार सोहळ्यांतून बघत असतो. त्यामुळे लग्नात असं काही होणं हे काहींसाठी नवीनच असेल. पण मंडळी या मुलांची ऊर्जा आणि उत्साह यांमुळे आपल्या मनात हे अस सगळं लग्नात कसं वगैरे प्रश्न येत नाहीत. उलट त्यांचा परफॉर्मन्स पुन्हा पुन्हा पहावा असं वाटतो. बरं हा परफॉर्मन्स वायरल झाल्यानंतर ही हा ग्रुप सातत्याने परफॉर्मन्स देत आला आहे. अजूनही काही लग्नात ते असा परफॉर्मन्स देताना दिसतात. पण अर्थात या काळात बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलंय. त्यामुळे त्यांच्या डान्स मुव्ह्ज आणि स्टेप्स या अजून मस्त जबरदस्त झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे नवीन व्हिडियोज ही आवडतातच. पण शेवटी जुन्या व्हिडियोची मजाच काही और असते. त्यामुळे त्यांचे नवीन व्हिडियोज बघण्यागोदर आम्ही पाहिलेला जुना व्हिडियो बघा. त्यात एवढे लक्ष व्ह्यूज लाभलेला व्हिडियो आहे. तेव्हा ही संधी सोडू नका. या व्हिडियोचा जरूर आनंद घ्या.

तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *