Breaking News
Home / मनोरंजन / लग्नामध्ये नवऱ्याने सर्वांसमोर असं काही केलं कि नवरी रागाने स्टेजवरून खाली निघून गेली, बघा नक्की काय घडलं ते

लग्नामध्ये नवऱ्याने सर्वांसमोर असं काही केलं कि नवरी रागाने स्टेजवरून खाली निघून गेली, बघा नक्की काय घडलं ते

आपल्या टीम नेहमीच विविध विषयांवर लिहीत असते. व्यक्त होत असते. पण त्यातही लग्न हा आमच्या टीमचा आणि अगदी आमच्या वाचकांचा म्हणजे आपला ही आवडीचा विषय आहे. आणि का नसावा? जर सगळा सोहळा व्यवस्थित पार पडला, तर याच्यासारखा दुसरा नेत्रदीपक सोहळा नसतो. इतकंच काय तर मनाला समाधान देणारा असा सोहळा ही असतो. कारण आपल्या जुन्या जाणत्यांनी म्हणून ठेवलेलं आहेच. घर पाहावं बांधून आणि लग्न पाहावं करून !

कारण हा सोहळा अगदी अथपासून ते इतिपर्यंत व्यवस्थित पार पाडणं म्हणजे तारेवरची कसरत असते. त्यात जरा काही इकडंच तिकडे झालं की डोलारा हलायला लागतो. मग कोणाचं मानपान राहील तरी धावपळ होते. बरं याच सोबत मंडपवाले, लायटिंगवाले, गेला बाजार डीजेवाला, केटरर आणि अशा बऱ्याच मंडळींना सांभाळायचं असतं. बरं एवढं सगळं करून अचानक एखादी गोष्ट मध्ये झाली नाही असं होत नाही. पण जेव्हा अस काही अघटित स्वतः नवरदेवाकडून वा नवरी कडून होतं तेव्हा? त्या क्षणांची आपण कल्पना ही करू शकत नाही. खरंच करू शकत नाही. कारण स्वतःच्या लग्नातच नवरदेव वा नवरी आगळीक कशाला करतील. पण शेवटी प्रत्येक गोष्टीला अपवाद हा असतोच.

असाच एक अपवाद आज आपल्या टीमने बघितला. अर्थातच स्वतः नाही, तर व्हिडियोच्या मार्फत बघितला. पण त्यातून एक तर कळलं की जोशात असताना डोकं शांत ठेवून वावरलेलं चांगलं. नाही तर मस्करीची कुस्करी व्हायला वेळ लागत नाही. होतं काय, तर या व्हिडियोत दिसणारं लग्न ऐन भरात आलेलं असतं. लग्नाचा मंच मस्त सजवलेला असतो. पाठीमागे हृदयाच्या आकाराची फुलांची सजावट असते. बसायला पांढरी शुभ्र आसन व्यवस्था असते. त्यावर ही लाल आकाराचे दोन बदाम दिसून येतात. एकूण काय तर टिपटॉप व्यवस्था असते. तसेच नवरा नवरी ही उत्साहात असतात. त्यांची देहबोलीच सगळं सांगत असते. वधू लाजत मुरडत उभी असते. ती वेळ नवरा बायकोने एकमेकांना घास भरावण्याची असते. ती नववधू एक पेढा किंवा लाडू हातात घेते आणि नवरोबाला भरवते. अर्थात त्यातही नाजूकसं लाजण असतं. नंतर नवरदेवाची वेळ असते. तो तिला घास भरवायला जातो. सुरुवातीला नवरी लाजते.तोंड फिरवते. मग उपस्थितांकडून ‘ए लडकी’ म्हणून बोललं जातं. जेणेकरून तिने तो घास खावा. मग शेवटी नवरी नवऱ्याच्या हातून घास घेते. इथपर्यंत सगळं व्यवस्थित असतं. अगदी नेहमी लग्नात बघतो तसंच सगळं हसत खेळत चाललेलं असतं.

पण याचवेळी बहुधा ती नवरी तोंडातून तो गोड पदार्थ खाली टाकते असं वाटतं. किंवा कदाचित तो तिच्या तोंडातून खाली पडला ही असावा अशी ही एक शक्यता आहे. किंवा तिच्या तोंडातून काहीच पडलं नसावं अशी एक शक्यता आहे. पण काय घडलं कळत नाही, कारण नवराई उलटी उभी असते. कॅमेऱ्याकडे तिची पाठ असते. पण या क्षणात नवरा मुलगा असा काही झपाटा मारतो आणि पुढे येतो की चट्कन काय होतं कळत नाही. तो तिच्या बखोटीला धरतो आणि तिची मान मागे खेचतो. त्यामुळे उलटी उभी असूनही तिचा चेहरा काही प्रमाणात काही क्षण दिसून जातो. या वेळात हा नवरा मुलगा खाली पडलेलं किंवा खाली ठेवलेलं काही तरी तिच्या तोंडात कोंबतो. त्याचा आवेश असा असतो की पूर्ण ताकदीनिशी तो हे करतो. हे सगळं घडत असताना वऱ्हाडी मंडळी हसत असतात. बहुधा जे होतं ते इतक्या पटकन होतं की त्यांना काही कळत नाही. नवरी मुलगी हे सगळं मस्करीत घेईल अस त्यांना वाटलं असावं. पण हे अस अचानक वागणं यांमुळे ती नवरी मुलगी आपला घुंगट मंचावरच फेकून देते. आजूबाजूला गोंधळ असतो पण एका आवाजावरून ती हंबरडा फोडत असावी असं वाटतं. पण धड काही सांगता येत नाही. बरं हा एक व्हिडियो आहे. याचा दुसरा भाग ही आहे.

या दुसऱ्या भागात ही नवरी उपस्थितांमधून निघून जाते हे दिसतं. पण सुरुवातीलाच ! नंतर ती कुठे जाते ते कळत नाही. पण एव्हाना नवऱ्या मुलाचा चेहरा ही उतरलेला असतो. असो. बहुधा हा सगळा प्रकार मस्करी म्हणून सुरू झाला असावा पण, वर म्हटल्याप्रमाणे मस्करीची कुस्करी व्हायला वेळ लागत नाही. तेच इथे दिसतं. आता या विषयावर इतर माहिती नसल्याने जास्त काही बोलता येत नाही. असो. सांगायचा मुद्दा काय ! लग्नाच्या त्या धामधुमीत कधी काय होईल हे सांगता येत नाही. पण जे काही होतं, त्यामुळे चर्चा तर नक्कीच होते. असो.

बरं मंडळी, हा होता आपल्या टीमने लिहिलेला लेख ! आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *