Breaking News
Home / मनोरंजन / लग्नामध्ये नागीण डान्स करणं दोन तरुणांना पडलं भारी, व्हिडीओचा शेवट पाहून हसू आवरणार नाही

लग्नामध्ये नागीण डान्स करणं दोन तरुणांना पडलं भारी, व्हिडीओचा शेवट पाहून हसू आवरणार नाही

आपल्या टीमने आजतागायत लग्न आणि त्याचे वायरल व्हिडियोज यावर अगदी मुबलक लेखन केले आहे आणि यापुढेही करत राहूच. त्यातही या सोहळ्यांतील डान्स, नवरा नवरीची एन्ट्री या विषयांवर तर अगदी विपुल प्रमाणात लेखन झालेलं आहे. त्यामुळेच आपल्या टीमला काही तरी वेगळं पण लग्नाशी संबंधित विषयावर लेखन करावंसं वाटत होतं. पण विषय काही धड मिळेना. म्हणजे विषय असायचे पण त्यात अतरंगी आणि अनपेक्षित असं काही नसे. आता त्याच त्याच प्रकारच्या व्हिडियोज बद्दल लिहिलं तर वाचक कंटाळातील हे लक्षात घेऊन आम्ही ते विषय टाळले. पण इच्छा तगडी असेल तर पूर्णही होतेच. आमच्या बाबतीत ही तसच झालं आणि आज आमच्या टीमने एक व्हिडियो पाहिला.

हा व्हिडियो लग्नातील वाटत असला तरी मंडपातील नाहीये. कारण सहसा आपण जे व्हिडियोज पाहतो ते मंडपात घडणाऱ्या घटनांचे असतात. तसेच हा वायरल व्हिडियो ही नाहीये. पण यातील जी गंमत आहे ती इतर कुठेही दिसणार नाही. काय आहे यात असं ? यात आहेत दोन व्यक्ती. आता लग्न मंडपातील व्हिडियो नसला तरी मंडपाच्या बाहेरचा असावा. कारण सगळीकडे आपल्याला बँडवाले आणि इतर लोकं दिसून येतात. वर्हाडी मंडळी असावी असं यातून दिसून येतं.

असो. तर व्हिडियो होतो सुरू. बँडवाले आहेत म्हंटल्यावर त्यांचं त्यांचं वाजवणं सुरू होतं. तेवढ्यात हे दोन तरुण समोरासमोर येतात. बँडवाले ही मग सगळ्यांची आवडती धून वाजवायला सुरुवात करतात. होय, नागीण डान्स करतो ना आपण सगळे तीच धून ते वाजवत असतात. या धूनच काय आकर्षण आहे ते माहीत नाही पण ती लग्नाच्या वरातीत वगैरे वारंवार ऐकायला येते. पण या धूनचं एक वैशिष्ट्य आहे. ही धून ऐकून आपोआप आपल्या मनातले नागोबा जे काही जागे होतात ना की विचारू नका. काही तर गडबडा लोळतात या गाण्यावर. आपणही याचा अनुभव घेतला असेलच. त्यामुळे या व्हिडियोत हेच होणार असं आपण गृहीत धरणार एवढयात विपरीत घडतं. एकाच्या अंगांत जरा चावरे नागोबा आलेले असतात. ते दोन्ही हातांनी दुसऱ्याला डसायला जातात. बरं ही मस्करी समोरच्याने मजेत घ्यावी अशी त्यांची अपेक्षा असते. पण नाही ना. दुसऱ्या तरुणाला पहिल्या तरुणाने आपल्याला मुद्दामहून मा’रलं अस वाटतं. आता राग आला की मस्करीची कुस्करी व्हायला वेळ लागतो होय. मग काय दोघेही भिडतात.

बरं सुरुवातीला अगदी ‘फणी’ पध्दतीने आणि मग हातघाईवर येऊन लढतात. त्यांची ही लढाई बघून हसायला येतं. पण सगळ्यात जास्त हसायला येतं ते पियानो/कॅसिओ वाल्याने शेवटी गंमतीशीर धून वाजवल्याने. आपणही हा व्हिडियो पूर्ण बघितला असेल तर आपल्याला त्याची ही हुशारी जाणवली असेल. पण त्यासाठी पूर्ण व्हिडियो बघायला हवा. अर्धवट बघून त्याची मजा येत नाही. त्यात व्हिडियो आहे केवळ काही सेकंदांचा. त्यामुळे आपला वेळही वाया जात नाही. पण धमाल मात्र भरपूर येते. तेव्हा आपण हा व्हिडियो बघितला नसेल तर जरूर पहा. त्याचा आनंद घ्या.

आपल्याला असाच आनंद हा लेख वाचताना ही आला असेल अशी अपेक्षा आहे. आपल्यासाठी आमची टीम नेहमीच उत्तम आणि विविध विषयांवर आधारित लेख घेउन येत असते. आपणही आम्हाला उत्तम प्रतिसाद देत असता. आपला हाच प्रतिसाद आमच्या पुढील लेखांना ही मिळू द्या. लवकरच एका नवीन विषयासह भेटूच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य न वाचलेले लेख ही वाचा. ते आठवणीने शेअर करा आणि आपल्याला हा आनंद सगळयांना वाटा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *