Breaking News
Home / मनोरंजन / लग्नामध्ये मित्रांनी नवरदेवाला दिलेले हे गि’फ्ट्स पाहून तुम्हीही हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

लग्नामध्ये मित्रांनी नवरदेवाला दिलेले हे गि’फ्ट्स पाहून तुम्हीही हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

मराठी गप्पाच्या लेखांमध्ये असलेले डान्स व्हिडियोजवरील लेख हे सगळ्यांत जास्त लोकप्रिय ठरत असल्याचं आम्हाला दिसून आलं आहे. त्यांच्या खालोखाल क्रमांक लागतो ते लग्नातील वायरल व्हिडियोज वरील लेखांचा. मग ते नाचत येणारी नवराई असो वा आपल्या होणाऱ्या बायकोसाठी गाणं म्हणणारा नवरदेव यांच्यावरील व्हिडियोज चे लेख. पण केवळ नवरा आणि नवरी यांच्यामुळेच सगळी गंमत थोडी येते. खरी गंमत तर नवरा नवरीची मस्करी करण्यात असते. त्यात आघाडीवर असतात आपले नालाय’क वाटणारे पण तेवढेच सच्चे असणारे मित्र. अशाच काही जिगरी मित्रांचा एक व्हिडियो आमच्या टीमने पाहिला आणि मग काय, त्याविषयीचा हा आजचा लेख तयार होतो आहे.

तर तुम्हाला कळलं असेलंच की हा वायरल व्हिडियो आहे एका लग्नातला. लग्नात जसं विधींना आणि पंगतीला महत्व असतं, त्याचप्रमाणे महत्व असतं ते रिसेप्शनला. या लग्नाचंही रिसेप्शन चालू होतं असतं. त्यात येतात ते नवऱ्याचे जिगरी आणि खट्याळ दोस्त. कसं कळतं ? नवऱ्याचे हावभाव आणि देहबोलीतून कळतं की. आता हे काय काय अतरंगीपणा करणार आहेत असेच भाव नवऱ्याच्या चेहऱ्यावर असतात. त्याच्या मनीचे भाव पुढच्या मिनिटांत सत्यात उतरताना ही दिसतात. पहिला मित्र येतो तोच मुळी हातात खेळण्यातला बॉल घेऊन. त्याचा बॉल हवेत उडवत नवरदेव पुढच्या मित्राकडे वळतो. तर हा दुसरा मित्र अगदी त्याच्यापेक्षा पुढचा. किंबहुना त्या ग्रुपमधला सगळ्यात अतरंगी मित्र असावा. त्याने आपल्या मित्रासाठी लहान मुलांची चुपणी आणलेली असते. नवरदेव त्याची ही भेट उडवून लावतो. पण मित्र हुशार. त्याने लहान मुलांची दुधाची बाटली ही आणलेली असते. या सगळ्यांत बाजूला उभ्या असलेली नववधु मात्र लाजून लाजून चुर झालेली असते. पण ही तर सुरुवात असते.

पुढे पुढे जो मित्र येतो तो काही ना काही अशीच भेटवस्तू आणतो, ज्यामुळे नवरदेवाची मस्करी व्हावी. त्यात लहान मुलांची खेळणी असतात, एक जण लहान मुलांचे कपडे आणतो, एक जण लहान मुलांचे बूट पण आणतो. शेवटचा तर कहर करतो. थेट बाहुलीच आणतो. काय बोलणार या अतरंगी मित्रांना. नवऱ्याची अवस्था पण काही वेगळी नसते. एका मित्राच्या पार्श्वभागावर लाथेचा प्रसाद देण्यासाठी तर पाय ही उठतो. पण त्यांनी केलेली ही मस्करी म्हणजे जिवाभावाच्या मैत्रिखातर हे नवरदेवाला ही कळत असतं, त्यामुळे तोही ही सगळ्या गोष्टी मस्करीत घेतो. आपल्यालाही जाणवतं की ते. कारण आपलेही मित्र असेच अतरंगी आहेत आणि आपणही कोणाच्या फ्रेंडलिस्ट मधले अतरंगी मित्र आहोत.आणि आपणही लग्न गाजवली असतीलच ना. शेवटी काय तर गुण जुळले की प्रेम होतं आणि अवगुण जुळले की मैत्री. असो. या नवरदेवाच्या आणि त्याच्या मित्रांच्या घनिष्ठ मैत्रीला नजर नको लागो हीच इच्छा.

आपल्याला हा लेख आवडला असल्यास नक्की शेअर करा. निदान मराठी गप्पाची टीम आणि वाचक म्हणून आपणात असलेल्या आपल्या मैत्रीसाठी तरी नक्कीच करा. तसेच आपल्या टीमने लिहिलेल्या नवीन लेखांनाही वाचा आणि ते शेअर करा. आपल्या वाचकमैत्री साठी मनःपूर्वक धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :