Breaking News
Home / मनोरंजन / लग्नामध्ये वधूने नवऱ्याला वरमाला घालत असताना घडला अजब प्रकार, पाहून हसू आवरणार नाही

लग्नामध्ये वधूने नवऱ्याला वरमाला घालत असताना घडला अजब प्रकार, पाहून हसू आवरणार नाही

लग्नाचे वायरल व्हिडियोज म्हंटलं की आपल्या सगळ्यांचे चेहरे खुललेले असतात. त्यात आपली टीम या विषयावर जेव्हा जेव्हा लिहिते तेव्हा तेव्हा वाचकांचा उदंड प्रतिसाद बघायला मिळतो. त्यासाठी आम्ही आपले आभारी आहोत. पण मंडळी एक गोष्ट आहे जी आपण ही मान्य कराल. की आपल्या समोर अनेक वेळेस लग्नाचे वायरल व्हिडियोज म्हणून नवरा नवरीने केलेला डान्स किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी, मित्रांच्या गोतावळ्याने केलेला डान्स येतात. आपणही ते आवडीने बघतो. पण म्हणून लग्नात एवढंच होतं का?

उत्तर आहे नक्कीच नाही. अहो लग्न म्हंटलं म्हणजे डान्स सोबतच एकापेक्षा एक मजेशीर गोष्टी असतात. या मजेशीर गोष्टींमध्ये पहिला क्रमांक असतो तो मानपानाचा. अर्थात ही मजा नवरा नवरीच्या पालकांना घेता येत नाही. कारण त्या बिचाऱ्यांची यात ससेहोलपट होत असते. पाहुण्यांचा मान राखावा तर ते म्हणणार उशिरा मान दिला आणि मान दिला नाही तरी मान वाकडीच राहते. असो. पण एकेकांचे नखरे यानिमित्ताने बघायला मिळतात आणि हसायलाच येतं.

त्यानंतर येतात काहीही काम न करता बरंच काही काम केलं आहे असं दाखवणारे. त्यांचा अभिनय म्हणजे असा काही असतो की विचारता सोय नाही. सिनेमात गेले तर ऑस्कर पक्काच समजावा. पण या सगळ्यांच्या उप्पर मजा खरं तर येते ती खुद्द नवरा नवरीची. खरं तर त्या बिचाऱ्यांची कीव यावी अशाही काही वेळा येतात. कारण त्या दोघांच्या आयुष्यातला मोठा प्रसंग एक सोहळा म्हणून पार पडत असतो. अशावेळी मनावर ताण येणं साहजिक आहे. त्याचमुळे की काय पण अनेक लग्नात वधू वरांपैकी कोणी तरी चक्कर येऊन पडल्याचं ऐकिवात येतं. पण या व्यतिरिक्त काही वेळ स्वतः वधू वर हेच स्वतःच्या वागण्याने गंमत निर्माण करतात की हसून हसून वेड लागेल. काही वेळेस चूक त्यांचीही नसते म्हणा. आता आजच आपल्या टीमने पाहिलेल्या व्हिडियोचं उदाहरण घ्या. व्हिडियो सुरू होतो तेव्हाच आपल्या लक्षात येतं की यातले नवरदेव म्हणजे शब्दशः लंबू टांग आहेत. त्यामुळे त्यांच्या समोर उभी असलेली नवरी अगदीच लहान खुरी वाटते. त्यात तिच्या देहबोलीतून ती लाजाळू ही वाटते.

व्हिडियो सुरू होतो आणि तेवढ्यात नवरा नवरीने एकमेकांना हार घालायची वेळ येते. खरं तर यावेळी अनेक लग्नात नवरा नवरीला उचलून घ्यायला मित्र मंडळी, नातेवाईकांचा गोतावळा असतो. पण इथे काही गरज पडत नाही. कारण भावोजी एवढे लंबू असतात की ताईला असंही त्यांच्या गळ्यात माला टाकता येत नाही. तिची ती गडबड पाहून हसूच येत म्हणा आणि तिची कीव पण येते. तेवढ्यात तिच्या बाजूला उभी असलेली मुलगी जी तिची करवली असावी बहुधा तिला काही तरी सांगते. यावेळी पुन्हा ताईकडून माला गळ्यात टाकण्याच्या प्रयत्न केला जातो. बऱ्याच अंशी तो यशस्वी ही ठरतो. असो. अशा गंमती जंमती या होत असतात. आपणही अनेक लग्नांना हजेरी लावली असेल तर आपणही काही किस्से स्वतःच्या डोळ्यांसमोर घडताना पाहिले असतीलच. या लेखाच्या निमित्ताने या सगळ्या किश्श्यांच्या आठवणी मनात पुन्हा एकदा तरळून गेल्या असतील हे नक्की.

चला तर मंडळी, आपण या आठवणींचा आस्वाद घ्या. आम्ही हा लेख आता संपवतो. पण एक मात्र नक्की की लवकरच एका नवीन विषयासह आपली भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख आपले वाचायचे राहिले असतील, ते वाचून घ्या. त्यांचा आस्वाद घ्या. तसेच आपलं प्रोत्साहन आम्हाला मिळत राहू दे ही सदिच्छा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.