आपल्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न म्हणजे कोणत्याही आई वडिलांसाठी महत्वाचा क्षण. ज्या आपल्या लेकरांना आपण जपलं, लाडात वाढवलं ती आज आयुष्यातल्या एका नवीन पर्वात पदार्पण करणार आहेत हे बघून पालकांना आनंद होतोच. मुलांच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करताना ही पालक मंडळी मग आपल्या मुलांच्या लग्नात अगदी आनंदाने सहभागी होतात. आता तर हल्ली लग्नसमारंभ हे सोहळ्यांप्रमाणे साजरे केले असल्याने त्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यात सगळ्यांत जास्त आकर्षण असतं ते डान्सचं. संगीत समारंभाच्या निमित्ताने प्रत्येक जण मस्त मस्त डान्स करत असतात. त्यात मग आई वडील कसे पाठी राहतील. त्यातही सादर होणारा डान्स हा स्वतः त्यांनी बसवलेला असेल तर अजून गंमत. अशीच गंमत अनुभवायला मिळते एका वायरल व्हिडियोत. जवळपास चाळीस लाख लोकांनी हा व्हिडियो पाहिला आहे आणि अनेकांना तो आवडला ही आहे. या व्हिडियो विषयी लिहिलं तर आपल्या वाचकांना ही आवडेल हा विचार करून आपली टीम आजचा हा लेख लिहीत आहे. चला तर जाणून घेऊयात या व्हिडियो विषयी.
हा व्हिडियो आहे एका भारतीय वडील आणि मुलीचा. ते कदाचित परदेशस्थ भारतीय असावेत. या लग्नाची जय्यत तयारी झालेली असते. व्हिडियोत आपल्याला छान सजलेला राजेशाही मंडप दिसतो. कॅमेरामन हा विविध अँगलनी शूटिंग करत असल्याने या मंडपाची भव्यता आणि देखणेपण लक्षात येतं. त्यास साजेसा असा राजेशाही पेहराव केलेली वडील आणि मुलीची जोडी मंडपाच्या मध्यभागी असते. व्हिडियो सूरु होत असताना अरिजित सिंघ यांच्या एका प्रसिद्ध गाण्याची धून वाजत असते. त्यावर छान अशा हस्तमुद्रा करत आपली ताई डान्स करत असते. तर वडील त्यांच्या एन्ट्री ची वाट बघत असतात. मुलीकडून क्यू मिळाल्यावर ते ही मंडपाच्या मध्यभागी येतात. एव्हाना ‘तेरा यार हुं मैं’ या गाण्याचे बोल कानावर पडत असतात. हातांचा वापर उत्तमरीत्या करत ही जोडी डान्स करु लागते. मग त्यात गाण्याच्या शब्दांनुसार स्टेप्स करत करत दोघांचा डान्स पुढे सरकतो. त्यांचे खेळकर हावभाव आपल्याही चेहऱ्यावर हास्य निर्माण करतात. गाणं जस जसं पुढे जातं, तस तसं या दोघांमधली केमिस्ट्री आपल्या समोर येते. हा डान्स दोघांनी बसवला असल्याने एकमेकांना काय छान जमेल याचा बरोबर विचार केलेला दिसून येतो. त्यामुळे काकांना डान्स स्टेप्स पेक्षा जास्तीत जास्त अभिनयाची धुरा दिलेली दिसून येते, तर ताई जास्तीत जास्त डान्स स्टेप्स करत असते.
त्यात ‘तू जिते, मैं हार जाऊं’ आणि ‘आजा करे वही शरारते, तू भाग जाए, मैं मार खाऊं’ वर दोघांनी केलेलं सादरीकरण आवडून जातं. डान्सच्या पलीकडे जाऊन त्या दोघांच्या चेहऱ्यावर जो आंनद असतो तो महत्वाचा वाटतो. पुढेही काही क्षण दोघांचा डान्स सुरू असतो. या व्हिडियोत कौतुक करावंसं वाटतं ते कॅमेरामनचं. मंडपाच्या विविध बाजूंचा उत्तम वापर करत केलेलं चित्रीकरण यांमुळे व्हिडियो हा एखाद्या चित्रपटातला वाटतो. अर्थात या वडील मुलीच्या जोडीने केलेल्या डान्स मुळे या व्हिडियोला चार चांद लागतात हे नक्की. आपल्या टीमला तर हा व्हिडियो आवडला. आपणही हा व्हिडियो पाहिला असल्यास आवडला असेल.
तसेच आपल्या टीमने यावर लिहिलेला हा लेखही आवडला असेलच अशी अपेक्षा आहे. आपली टीम आपल्या वाचकांना केंद्रस्थानी लिहून लेखन करत आलेली आहे आणि यापुढेही तसंच लेखन करत राहील. आपणही आजतागायत आपल्या टीमला प्रोत्साहन आणि पाठिंबा देत आलेले आहात. येत्या काळातही आपण हा पाठिंबा आणि प्रोत्साहन आपल्या टीमला देत राहाल हे नक्की. लेखांवरील सकारात्मक प्रोत्साहनपर कमेंट्स, लेख शेअर करणं यातून आपला जो लोभ आम्ही अनुभवत आहोत तो यापुढेही कायम असू द्या ही विनंती. मनःपूर्वक धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :