लग्नात नवरा नवरी, त्यांचे पालक आणि अगदी वऱ्हाड्यांनी डान्स करतानाचे व्हिडियोज आपण पाहिले असतीलच. हे व्हिडियोज पुढे वायरल होतात हे ही आपण अनुभवलं असेल. अर्थात यातील जे व्हिडियोज सगळ्यांत जास्त स्टायलिश असतात ते आपसूक आपल्या लक्षात रहातात. आज आपल्या टीमने असाच एक स्टायलिश डान्स व्हिडियो बघितला. त्यातील एकंदर वातावरण आमच्या टीमला खुप भावलं. तुम्हालाही याविषयी जाणून घ्यायला आवडेल अस वाटलं आणि त्यातूनच हा लेख लिहिला जातो आहे. चला तर मग जास्त वेळ न दवडता, या व्हिडियो विषयी जाणून घेऊयात.
हा स्टायलिश डान्स व्हिडियो जवळपास दोन ते तीन वर्षे जुना आहे. या व्हिडियोत आपल्याला एका शाही लग्नात नवरा नवरीच्या स्नेह्यांनी केलेला डान्स दिसून येतो. व्हिडियो सुरू होतो तेव्हा प्रथमतः त्या लग्नातील सजावट आपलं लक्ष वेधून घेते. छताला असलेली फुलांची आरास शाही आणि मनमोहक असते. सोबतच डान्स फ्लोअर तर इतका जबरदस्त सजलेला असतो की विचारू नका. डान्स फ्लोरच्या काचांतून दिसणारी सजावट मस्त वाटते. पण हे तर झालं सजावटीबाबत. आपल्या या व्हिडियोतील महत्वाच्या व्यक्ती यावेळी डान्सची तयारी करत असतात. सुरुवातीला येणारा मुलांचा ग्रुप डान्स फ्लोअर वर तयार उभा असतो. पाठीमागे ताकी ताकी हे गाणं वाजत असतं. पण ती केवळ गाण्याची टेस्टिंग होत असते. पण काहीच क्षणांत मुख्य परफॉर्मन्स सुरू होतो. यात आपल्याला प्रामुख्याने ९० च्या दशकातील गाण्यांवर डान्स होताना बघायला मिळतो.
याची सुरुवात होते पाच जणांच्या ग्रुपने. यातील चार जण खाली बसलेले असतात. तर एक मित्र वर उभा राहून त्यांच्या डोक्यावर ड्रम सेट वाजवल्याचा अभिनय करत असतो. तर पाठीमागे उभा मुलगा गिटार घेऊन उभा असतो. या गाण्यातील शब्द वाजू लागतात आणि हा गिटारवाला मुलगा समोर येतो. त्या मुलाचा अंदाज खरंच खूप स्टायलिश म्हणावा असाच असतो. तसेच गिटार मधून बाहेर पडणारी रोषणाई त्यात भर घालते. अर्थात या रोषणाईने काही क्षणांसाठी का होईना त्या डान्स फ्लोअरला चिटकून बसलेली मंडळी आणि खासकरून मुलं चट्कन बाजू होतात. पण या मुलाचा डान्स खूप छान होतो. सलमान खान यांच्या ‘ओ ओ जाने जाना, ढुंडे तुझे दिवाना’ या गाण्यावर हा मुलगा डान्स करतो. आधीच हे गाणं लोकप्रिय आणि त्यात या मुलाने केलेला डान्स यांमुळे सोहळ्यात रंगत भरते. मग येते ती एक जोडी. ‘निंद चुराई मेरी, किसने ओ सनम’ या नटखट गाण्यावर ही जोडी मस्त परफॉर्मन्स देते. त्यांच्यातील ट्युनिंग जबरदस्त असतं. मग त्यांच्या पाठोपाठ येतात ती दोन मुलं आणि एक मुलगी. ही तिकडी सुद्धा मस्त डान्स करते. ‘काली काली आँखे, गोरे गोरे गाल’ या सुप्रसिद्ध गाण्यावर ही मंडळी मस्त स्टेप्स करत डान्स करतात.
एक मस्त ऊर्जा या सगळ्यांच्या परफॉर्मन्समुळे भरून राहिलेली असते. त्यात भर घालायला अजून एक जोडी अजून एक मस्त हिंदी गाणं घेऊन येते. ‘बडे मियाँ, छोटे मियाँ’ चित्रपटातील ‘चलो इश्क लडाए’ हे गाणं आपण ऐकत असतो. या दोघांचा या गाण्यावर डान्स करण्याचा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद म्हणावा असाच. पण यानंतर येणारी जोडी मात्र या सगळ्यांमध्ये खूपच लोकप्रिय असल्याचं दिसून येतं. कारण ती जोडी डान्स फ्लोअरवर आल्यापासून ते जाईपर्यंत, उपस्थित प्रत्येक जण या जोडीला प्रोत्साहन देत असतो. किंबहुना ते येतात तेव्हा सगळ्यांत मोठा जल्लोष झालेला आपण अनुभवतो. ही जोडी ‘चुराके दिल मेरा, गोरिया चली’ या गाण्यावर डान्स परफॉर्मन्स देते. आता एवढ्या जोडयांनी डान्स केल्यावर मग वेळ असते फक्त गर्ल्स ग्रुपची. यातील तीन मुली आपल्या समोर येतात आणि ‘पिया की गली भूल आयी’ या गाण्यावर डान्स करतात. त्यांचा डान्सही चांगला होतो. एव्हाना आपण सहा डान्स परफॉर्मन्स पाहिलेले असतात. पण अजून या व्हिडियोत दोन डान्स परफॉर्मन्स बाकी असतात. त्यातील एक हा पुन्हा एकदा जोडीकडून केला जातो. या परफॉर्मन्सची सुरुवात करणारा, ड्रम सेट वाजवण्याचा अभिनय करणारा मुलगा आता स्वतः दाखल झालेला असतो. यावेळी ‘कैसे कहुं मैं ओ यारा ये प्यार कैसे होता हैं’ या सदाबहार गाण्यावर डान्स बघायला मिळतो.
आता वेळ असते ती शेवटच्या ग्रुपची आणि तो असतो गर्ल्स ग्रुप. जवळपास पाच जणी यात परफॉर्मन्स द्यायला येतात. ‘दिल ले गयी, दिल ले गयी’ या मस्त गाण्यावर तेवढाच मस्त डान्स करतात. त्यांचा डान्स संपन्न होतो आणि त्या स्टेज वरून जात असताना पुन्हा ताकी ताकी हे गाणं ऐकू येतं आणि हा व्हिडियो संपन्न होतो. हरून राज (Haroon Raj) यांनी कोरिओग्राफ केलेला हा डान्स परफॉर्मन्स आपल्या सगळ्यांना खूपच आवडून जातो. आपल्या टीमला तर आवडलाच आहे. आपणही जर का हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्यालाही आवडला असणार यात शंका नाही. जर नसेल बघितला तर जरूर बघा आणि मस्त डान्स परफॉर्मन्सचा आनंद घ्या.
तसेच मंडळी, आमच्या टीमने लिहिलेल्या प्रत्येक लेखाला आपण जो उदंड प्रतिसाद देत आहात त्याबद्दल धन्यवाद. आपल्या या उदंड प्रतिसादामुळे आमच्या टीमला नवनव्या विषयांवर लेखन करण्याची ऊर्जा मिळत राहते आहे. यापुढेही आपला हा प्रतिसाद आणि सोबतच प्रोत्साहन मिळत राहू दे. आपली टीम आपल्या वाचकांसाठी नेहमीच उत्तमोत्तम लेख आणत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आमच्या टीमचे आपण न वाचलेले लेख जरूर वाचा. आनंद घ्या. आठवणीने सगळे लेख शेअर करा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!
बघा व्हिडीओ :