Breaking News
Home / मनोरंजन / लग्नाला काउंटरवर बाटली फोडायला अशी माणसं ठेवू नका, नाहीतर तुमचेसुद्धा असं दिवाळं निघेल

लग्नाला काउंटरवर बाटली फोडायला अशी माणसं ठेवू नका, नाहीतर तुमचेसुद्धा असं दिवाळं निघेल

आयुष्यात आपण बऱ्याच गोष्टी कमावतो आणि गमावतो सुदधा ! पण या कमवण्यात आणि गमावण्यातील सगळ्यांत महत्वाचा घटक कोणता असावा तर माणसं. अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर आपला मित्र परिवार. तसे आपल्या ओळखीचे बरेच असतात. पण वेळप्रसंगी जीवाला जीव देणारे आणि धावून येणारे फक्त मित्र असतात. पण त्यातही काही जण असे असतात की ज्यांना कुठेही नेलं तरी किस्से घडतातच.

तुम्ही त्यांना किती सांगा, त्यांचा एखादं तरी किस्सा होतोच. अशा लोकांनी अगदी ठरवलं ना, की काहीही विशेष करायचं नाही तरी काही तरी होतंच. त्यामुळे कधी कधी यांचं सोबत असणं म्हणजे त्रास असतो पण बऱ्याच वेळा ती गंमत असते. त्यात ही मंडळी, सुकलेला गळा ओला करायला बसली, की किस्सा होणारच होणार. कधी कोणाची हे कळ काढतात तर कधी कोणी तरी यांची कळ काढलेली असते. आणि अगदी काहीच नाही तर फुटकं नशीब असतंच. आणि ते जास्त फुटलं असेल तर बाटली ही फुटते. पण कधी कुठे कशी फुटते हे महत्वाचं. आमच्या टीमने बघितलेल्या व्हिडियोतल्या सारख मात्र नको व्हायला. हा व्हिडियो म्हणजे चुकीच्या वेळी दुर्दैवाने साथ द्यावी असा प्रकार आहे.

व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला एक जण उभा असलेला दिसतो. तसेच त्या भावाचे बाकीचे मित्र आजूबाजूला बसलेले, पहुडलेले दिसतात. आता खरंच मित्र असतात की घसा ओला करायचा म्हणून मैत्री असते ते माहीत नाही. पण पुढची घटना घडल्यावर ही मैत्री काय टिकेल असं वाटत नाही. कारण व्हिडियो सुरू झाल्यासोबत उभा असलेला माणूस हातात बाटली घेतो. तिचं सील अगदी पक्कं असतं. त्यामुळे नुसत्या हाताच्या पंजाने ते उघडत नाही. मग काय हा भाऊ आपलं डोकं आणि कोपर वापरायला घेतो. पण फक्त कोपर चालतं. डोकं ही चालतं, पण किती जोर लावावा हे कळत नाही. त्यामुळे कोपर त्या बाटलीच्या तळावर जोरात लागतं. आता जी मंडळी, ‘घेतात’, त्यांना एकही थेंब वाया गेलेला चालत नाही. बाकी वेळ, पैसे काहीही वाया जाऊदे. त्यावेळी त्यांना काही वाटणार नाही. पण त्यांना आवडणाऱ्या गोष्टींचा थेंबनथेंब वेचून वेचून पीतील. पण इथे तर पूर्ण बाटलीच्या तळभागाचा तुकडा उडतो. ज्याचा थेंबनथेंब साठवावा असं त्यांना वाटतं, ते सगळं द्रव्य, वाया गेलेलं असतं. बरं सगळीकडे उडालेले असत. बहुधा जी काचेचे तुकडे ही उडतात.

या उभ्या माणसाच्या जवळच झोपलेली व्यक्ती ही डोळ्यांना हात लावत, डाव्या बाजूला वळते. देव करो आणि फक्त डोळ्यात द्रव्यच गेलेलं असो. अन्यथा बाका प्रसंग उदभवू शकतो. असो. आता पुढे काय होतं हे माहिती नसल्याने पुढे काही भाष्य करता येत नाही. पण एक मात्र खरं की काहींच बॅडलकच खराब असतं आणि ते वेगवेगळे किस्से घडवून जातं.

असो, तर मंडळी, हा होता आपल्या टीमने लिहिलेला लेख ! आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *